Brahmand
ब्रम्हांड म्हटलं कि आपल्या समोर बरेच प्रश्न उभे राहतात. काय असेल ब्रम्हांड? ब्रन्हांडात किती ग्रह तारे असतील?
पूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती करोडो वर्षापूर्वी झालेली आहे. ज्यामध्ये हजारो लाखो सूर्यमाला असून करोडो ग्रह तारे आहेत. आपल्या सूर्यमालेत सगळ्या ग्रहांची गती हि वेगवेगळी आहे. प्रत्येक ग्रहावर वेळेची गती सुद्धा वेगवेगळी आहे.
ज्याप्रमाणे पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण चक्कर लावण्यासाठी ३६५ दिवसांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाला त्याचा एक वेगळा कालावधी आहे.
पृथ्वीचे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला जवळजवळ २४ तासांचा कालावधी लागतो यालाच विज्ञानाच्या भाषेमध्ये परिवलन असे म्हणतात. तसेच पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात.
आजही बरेच असे शोध बाकी आहेत, ज्यामुळे आपल्याला ब्रम्हांडाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल.
आज या लेखात आपण पाहणार आहोत ब्रम्हांडातील काही रोचक बाबी. चला तर जाणून घेऊया त्या रोचक गोष्टी ज्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल.
“काही गोष्टी पृथ्वीच्या बाहेरच्या!” – Interesting Facts about Universe in Marathi
१) सूर्यामध्ये लाखो पृथ्वी सामावू शकतात:
सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा तारा म्हणून ओळखल्या जातो. सूर्यामुळे आपल्या पृथ्वीवर काही काळ उजेड उपलब्ध राहतो.
अवकाश शास्त्रज्ञाचं अस मत आहे कि सूर्यावर दररोज बरेच बॉम्बस्फोट होत असतात. ज्यामुळे तिथे उर्जा उत्पन्न होत राहते.
सूर्य हा प्रत्येक ग्रहाच्या आकारमानाने खूप मोठा आहे. आपल्या पृथ्वीच्या आकारमानाने सूर्य एवढा मोठा आहे कि आपल्या पृथ्वीच्या आकाराचे लाखो ग्रह सूर्यामध्ये सामावू शकतात.
२) मंगळावर आहे आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी पर्वतरांग:
आपल्याला पृथ्वीवरील सर्वात लांब तसेच सर्वात मोठी पर्वतरांग हि हिमालयात भेटून जाईल.
जिथे बऱ्याच लोकांनी त्या पर्वतरांगेला सर सुद्धा केले आहे. त्याच प्रमाणे आपल्या सुर्यामालेतील सर्वात मोठी पर्वतरांग हि मंगळ ग्रहावर मिळाली आहे.
ज्याची उंची जवळजवळ २६ किलोमीटर आहे तसेच ६०० किलोमीटर लांब अशे त्या पर्वताचे आकारमान आहे.
ह्या पर्वताची उंची हिमालायापेक्षा तिप्पट आहे. म्हणून ह्या पर्वतरांगेला आपल्या सूर्यमालेतील सर्वात लांब तसेच सर्वात लांब पर्वत रांग म्हणतात.
३) अवकाशात ताऱ्यांची संख्या अनंत आहे:
लहानपणी जेव्हा आपण घराच्या छतावर किंवा बाहेर झोपायचो तेव्हा प्रत्येकाने आकाशातील ताऱ्यांची मोजमाप नक्की केली असणार, पण जेव्हा लहानपणी आपण ताऱ्यांची मोजणी करत होतो तेव्हा आपल्याला आठवत असेल आपल्याला ते शक्य नव्हत.
त्याच प्रमाणे या पृथ्वीबाहेर म्हणजेच आपल्या सुर्यामालेतील ताऱ्यांची संख्या एवढी आहे कि आजपर्यंत त्यांची मोजमाप कोणीच करू शकले नाही.
अवकाशात अनंत,अगणिक, तारे आहेत. ज्यामुळे त्यांची मोजणी करणे खूप कठीण आहे.
४) पृथ्वीवर असलेली पूर्ण लोकसंख्या कमीच:
लोकसंखेच्या दृष्टीकोनाने पाहिले असता आपला देश जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. पण आपल्या देशाची लोकसंख्या सोडा हो,
जर आपण जगाची तुलना केली कि आपल्या पृथ्वीवरील लोकसंख्या आणि ब्रम्हांड, तर ब्रम्हांडासमोर आपल्या पृथ्वीची पूर्ण लोकसंख्या हि एका साखरेच्या कणासारखी दिसेल. तर विचार करू शकता कि या ब्रम्हांडात आपण कुठे येतो.
५) पृथ्वीच्या बाहेरील जग शांत आहे:
पृथ्वीवर पाणी असल्यामुळे वातावरण चांगल्या प्रकारे उपस्थित आहे. आणि या वातावरणामुळे आपण पृथ्वीवर जगू शकत आहे.
तसेच गुरुत्वाकर्षण असल्यामुळे जमिनीवर चालू शकतो. पण पृथ्वीच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे गुरुत्वाकर्षण नाही तसेच कोणतेच वातावरण उपस्थित नाही आहे.
बाहेरील जग हे पूर्णपणे शांत आहे. तिथे आपण पृथ्वीवर चालतो तसे पायांनी चालू शकत नाही.
तिथे आपण फक्त तरंगू शकतो. तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे संभाषण करता येत नाही.
कारण संभाषण करण्यासाठी माध्यम हवे असते. आणि अवकाशात कोणत्याही प्रकारचे माध्यम उपलब्ध नाही.
६) सगळ्यात मोठा ग्रह गुरु:
आपल्या सूर्यमालेत एकूण नऊ ग्रह आहेत, ज्यामध्ये गुरु हा सूर्यापासून पाचव्या क्रमांकाचा ग्रह आहे.
गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. ज्यामध्ये पृथ्वीसारख्या हजारो पृथ्वी सामावू शकतात. या ग्रहावर जीवसृष्टी उपलब्ध नाही. या ग्रहावर नेहमी वादळे चालूच असतात.
तसेच या ग्रहावर तापमान हे हजारो सेल्सियस पर्यंत आहे. या ग्रहावर जो लहान ठिपका नेहमी आपल्याला दिसून येतो तो ठिपका दुसर तिसर काही नसून ते तिथे चालू असलेले जोराचे वादळ आहेत.
७) चंद्रावर 1 करोड वर्ष राहू शकतात आपल्या पाऊल खुणा:
आपण विचार करत असाल कि असे कसे शक्य आहे, कि एवढे दिवस आपल्या पाउलखुणा जतन राहू शकतात.
पण हो मित्रहो आपण योग्यच वाचल आहे, आपण आपल्या पाऊल खुणा चंद्रावर जतन ठेवू शकता.
यामागचे कारण काय असेल तर ते म्हणजे वातावरण ! कारण चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण उपलब्ध नाही.
तसेच वारा पाणी सुद्धा नाही मग कश्या प्रकारे आपल्या पाउल खुणा पुसल्या जातील.
म्हणून तिथे आपल्या पाऊलखुणा करोडो वर्षापर्यंत तिथे तशाच राहू शकतात.
८) प्लुटो ग्रह अमेरिकेपेक्षा लहान आहे:
आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह आणि सर्वात लहान ग्रह हा प्लुटो आहे. ज्याचे आकारमान बाकीच्या ग्रहांपेक्षा खूप लहान आहे. ह्याला पूर्ण सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणून ओळखण्यात येते. प्लुटो एवढा लहान ग्रह आहे कि आजच्या अमेरिकेपेक्षाही लहान आहे. आकारमानाने प्लुटो पेक्षा अमेरिका हा मोठा देश आहे.
९) पृथ्वीपासून दूर जातोय चंद्र:
हो खरच! चंद्र जात आहे पृथ्वी पासून दूर. आपण विचार करत असाल हे कसे शक्य आहे तर मित्रहो खरचं चंद्र हा पृथ्वीपासून दूर जात आहे.
एका शोधात हे समोर आले आहे कि प्रत्येक वर्षी चंद्र हा ३.८ सेमी पृथ्वीपासून दूर जात आहे.
आणि काही वर्षांनी चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर असेल
तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण जाणुन घेतल्या पृथ्वीच्या जगाबाहेरील काही अलौकिक आणि अविश्वस्नीय गोष्टी ज्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल. आणि आपल्याला आपले ज्ञान वाढविण्यात मदत होईल. आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
आणि सोबतच आपला अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका. कारण आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.
Thank You!