असा असेल 2020 चा मुंबई इंडियन्स चा संघ. हा मोठा खेळाडू आहे संघाबाहेर.

IPL Mumbai Indians Team 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे IPL २०२० भारतामध्ये होत नसून ती दुबई येथे होणार आहे, पण यावर्षीची IPL ची ट्रॉफी कोण स्वतःच्या नावावर करेल काही सांगितल्या जात नाही, पण प्रत्येक संघ हा २०२० च्या IPL साठी सज्ज आहे.

आपणही कोणत्या न कोणत्या टीम ला समर्थन करत असणारच ना आपल्या महाराष्ट्रात क्रिकेटचे खूप फॅन पाहायला मिळतात, मग ती IPL च्या कोणत्याही टीमचे असो, पण आपण आज एका अश्या संघाविषयी माहिती पाहणार आहोत ज्या संघाने IPL ची ट्रॉफी ४ वेळा स्वतःच्या नावावर केलेली आहे.

असा असेल 2020 चा मुंबई इंडियन्स चा संघ. हा मोठा खेळाडू आहे संघाबाहेर – IPL Mumbai Indians Team 2020

IPL Mumbai Indians Team 2020
IPL Mumbai Indians Team 2020

ती आपल्या महाराष्ट्राची टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स ने आतापर्यंत स्वतःच्या नावावर ४ ट्रॉफी केल्या आहेत,

आज त्या मुंबई इंडियन्स मध्ये कोणते खेळाडू २०२० ची IPL खेळण्यासाठी तयार असतील आपण ते पाहूया.

अशी असणार मुंबई इंडियन्स ची १५ जणांची टीम.

Mumbai Indians Team 2020
Mumbai Indians Team 2020

१) रोहित शर्मा (कर्णधार)
२) क्विंटन डी कॉक
३) क्रिस लिन
४) सूर्यकुमार यादव
५) हार्दिक पांड्या
६) कृणाल पंड्या
७) राहुल चहर
८) ईशान किशन
९) आदित्य तारे
१०) जसप्रीत बुमराह
११) ट्रेंट बोल्ट
१२) किरोन पोलार्ड
१३) अनुकुल रॉय
१४) जेम्स पैटिनसन
१५) अनमोलप्रीत सिंह.

या प्रकारे राहणार आहे मुंबई इंडियन्स ची टीम. टीम मध्ये कोणताही मोठा बदलाव नसून फक्त काही नवीन खेळाडूंना संधी दिल्या गेली आहे, त्याचबरोबर यावर्षी मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्याला पीच वर पाहायला मिळणार नाही.

पण त्याच्या योर्कर ची भरपाई करताना जसप्रीत बुमारह आपल्याला दिसेल. IPL २०२० चा पहिला सामना मुंबई आणि चेन्नई या दोन टीम मध्ये खेळला जाणार आहे, सिझन १३ ची सुरुवात मागच्या वर्षीच्या फायनल टीम मध्ये खेळवल्या जाणार आहे,

२०२० ची IPL हि १९ सप्टेंबर पासून सुरु होऊन १० नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आठ टीम मध्ये टक्कर होणार आहे, आणि जो या आठ टीम पैकी सर्वात चांगले प्रदर्शन करेल तोच २०२० च्या IPL चा विजेता बनणार.

IPL मधील आपली आवडती टीम कोणती आहे. आम्हाला Comment मध्ये सांगायला विसरू नका, आपल्याला इतर टीमच्या खेळाडूंची यादी हवी असेल तर आम्हाला कळवा, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top