Home / Recipes / जिलबी बनविण्याची विधी | Jalebi recipe

जिलबी बनविण्याची विधी | Jalebi recipe

Jalebi – जिलबी अर्थात मराठीत जिलबी म्हणुन ओळखला जाणारा हा पदार्थ खुप प्रसिध्द आहे तो त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे देखील. खरं तर हा असा पदार्थ आहे जो बनवण तसं फार सोप आहे आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये ब-यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन आपल्याला करता येईल.

जिलबी बनविण्याची विधी – Jalebi recipe

Jalebi Recipe

या गोड पदार्थाला गरम किंवा थंड असे दोन्ही प्रकारे सव्र्ह केल्या जाउ शकते. खातांना ही हलकी कुरकुरीत आणि गोड लागते. साखरेच्या पाकात कधीकधी सायट्रिक अॅसिड आणि लिंबाचा रस देखील घालतात किंवा कधीकधी रोज वाॅटर देखील मिसळल्या जातं. जिलबी ला दही रबडी आणि कधी कधी उत्तर भारतात केवरा सोबत देखील खाल्ले जाते.

या जिलबी ला वेगवेगळया नावाने देखील संबोधल्या जातं आणि वेगवेगळया पध्दतीने बनवल्या सुध्दा जातं जसं इमरती, चेन्ना, जलेबी.

Ingredients of Jalebi
जिलबीसाठी लागणारी सामग्री:

 • 2 कप मैदा
 • अर्धा चमचा तांदळाचे पीठ
 • अर्धा चमचा बेकिंग पावडर
 • 2 चमचे दही
 • 1 कप गरम पाणी
 • अर्धा चमचा केसर
 • 3 कप साखर
 • 2 ते 3 कप पाणी
 • अर्धा चमचा इलायची पावडर
 • 1 चमचा गुलाब जल
 • तळण्याकरता तुप किंवा खायचे तेल

Jalebi Recipe
जिलबी बनविण्याचा विधी:

मैदा, तांदळाचे पीठ, बेकिंग पावडर, दही आणि 3 कप पाणी एका भांडयात टाकुन त्याला चांगल्या प्रकारे मिसळुन घ्या. मिसळल्यानंतर त्याला चांगले फेटुन घ्या.
मिसळल्यानंतर उरलेल्या पाण्याला देखील त्यात टाका आणि एक चमचा केसर पावडर टाका आणि मुलायम होईपर्यंत फेटा. फेटल्यानंतर 2 तास ठेउन दया. उपयोग करण्यापुर्वी देखील एकदा फेटा.

साखरेला पाण्यात टाकुन चांगला घट्ट पाक तयार करा. चांगला पाक तयार होण्याच्या 1 मिनीटा आधी त्यात केसर आणि इलायची पावडर टाका.

आता कढईत तेल किंवा तुप गरम करा आणि गोलाकार चकलीच्या आकाराच्या छोटया छोटया जिलब्या त्यात सोडा. एका वेळी काहीच जिलब्या तळया. जिलबीला तोपर्यंत तळत राहा जोपर्यंत त्याचा रंग हलका सोनेरी होत नाही आणि ती कुरकुरीत होत नाही.

तळल्यानंतर त्या जिलबील बाहेर काढा आणि किचन पेपर वर ठेवा जेणेकरून त्यातील तेल किंवा तुप निघुन जाईल आणि त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवा. 4 ते 5 मिनीटे त्यात ठेवल्यानंतर बाहेर काढा.

शेवटी पाकातुन काढुन सव्र्ह करा गरमागरम जिलबी.

जिलबी बनवण्याकरता लागणारी टिप्स – Tips for making Jalebi
 • खाण्याचा सोडा जास्त टाकु नका.
 • फेटतांना तुमचा अंदाज चुकायला नको नाही तर जर पीठ पातळ झाले तर जिलबी देखील पातळ आणि सरळ सरळ बनायची.
 • तयार पिठाला घेर येणं खुप आवश्यक आहे. तर तुम्हाला अस वाटेल की पिठाला घेर येत नाही तर तुम्ही त्यात वाळलेले खमीर देखील टाकु शकता.
 • जिलबी तळतांना मंद आचेवर तळल्यास जिलबी कुरकुरीत होईल.
 • जिलबीवर तुम्ही पिस्त्याचे तुकडे बदामाचे तुकडे, दालचीनी पावडर, कोको पावडर, आणि साखरेची पुड देखील टाकु शकता.
 • लिंबाचा रस साखरेच्या पाकाला कडक होउ देत नाही. आवश्यकतेनुसार तुम्ही त्यात लिंबाच्या रसाची मात्रा कमी जास्त करू शकता.
 • जिलबीवर दुधावरची साय टाकुन देखील तुम्ही ती सव्र्ह करू शकता.

Read More:

लक्ष्य दया: जिलबी बनविण्याची विधी – Jalebi recipe रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

About Editorial team

Check Also

Chicken Biryani

घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चिकन बिरयानी बनविण्याची विधी | Chicken Biryani Recipe

Chicken Biryani खवय्येगिरी करता आपला भारत फार प्रसिध्द आहे वेगवेगळया प्रांतातील पक्वान्न बनवुन त्यावर ताव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *