Home / Recipes / ज्वारीची भाकरी बनविण्याची विधी | Jwarichi Bhakri

ज्वारीची भाकरी बनविण्याची विधी | Jwarichi Bhakri

ज्वारी हि कार्बोहायड्रेड आणि हाइ कॅलरी ने संपन्न असते. ज्वारी लस मुक्त असते. साधारणतः ज्वारीची भाकर हातानेच बनवली जाते. भारताच्या ग्रामीण भागात आज आणि आत्ता हि यास मुख्य भोजन म्हणूनच खातात ते ज्वारीची भाकर / Jwarichi Bhakri तिखट चटणी कडी, कांदा तसेच हिरव्या मिरच्यासोबत खातात. ग्रामीण लोक ज्वारीचा आटा विकत न घेता ज्वारीस उन्हात चांगल्याप्रकारे सुखवून जवळच्या दळनयंत्रातून दळून घेतात. ताजा आटा मगच भाकरी साठी वापरतात.

Jwarichi Bhakri

ज्वारीची भाकरी / jwarichi bhakri

ज्वारीची भाकर आपल्या शरीर स्वास्थासाठी फार लाभदायक मानल्या जाते. याचा उत्तम स्वाद घेण्यासाठी यासोबत गरम पिठल,झुणका तसेच हिरव्या मिरचीचा ठेचा वाढला जातो. चला मग भाकर बनवण्याच्या विधीबद्दल जाणू या.

Ingredients of Jwarichi Bhakri
ज्वारीची भाकरीसाठी लागणारी सामग्री :-

  1. ज्वारीचा आटा – १ कप
  2. पाणी – भिजवण्यासाठी आवश्यकतेनुसार
  3. मीठ – स्वादानुसार

Jwarichi Bhakri Recipe
ज्वारीची भाकरी बनविण्याचा विधी:-

एका भांड्यात १/२ कप पाणी घ्या पाण्याला गरम होऊ द्या पाणी जास्त गरम होऊ द्या. पाणी उकडले पाहिजे पाण्यात बुडबुडे दिसायला पाहिजेत. आता कोपरामध्ये ज्वारींचा आटा घ्या त्यात उकडल्या पाण्यापैकी अर्धे पाणी घाला. आट्याची चांगली कणिक करण्यासाठी मोठ्या चमच्याचा वापर करू शकता. आट्यात चिकटपणा न येण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतो. कन्नड भाषेत याला जीगातु असे म्हणतात.

आट्यात गरम पाणी टाकल्यावर त्याची चांगली मळून करून कणिक बनवा. थोड्या वेळेसाठी हि कणिक मोकळी ठेवून द्या. नंतर तयार कणकेचा गोळा घेवून त्याचा मोठ्या आकाराचा बॉल बनवा ज्याची आपण भाकर बनवू.

आट्याच्या गोळ्याला भाकरीच्या आकारासाठी गोळा हातात घेवून हळू हळू दाबून भाकरीचा आकार द्या भाकरीचा आकार बिघडला तर तो निट करा हातांचा वापर न करता लाटनाच्या मदतीने पण भाकरीला आकार देता येतो. पारंपारिक पद्धतीने ज्वारीची भाकर हि फक्त हातानीच बनविली जाते.

आता चुलीवरील गरम तवा चांगला गरम झाला कि नाही हे थोडे पाण्याचे थेंब टाकून बघा. तवा गरम झाल्यावर भाकर त्यावर ठेवा. भाकर चांगली भाजू द्या त्यावर भाकरीच्या वरच्या बाजूस थोड पाणी शिंपडून पाणी सुखेपर्यंत वाट बघा. नंतर भाकर पलटून ठेवा. लक्ष्यात ठेवा कि भाकरीला भाजण्यात वेळ लागतो त्यामुळे भाकर चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूस भाजून घ्या.

तयार गरम भाकर तुम्ही सुक्या भाजी सोबतही खाऊ शकता परंतु भाकर हि पारंपारिकरित्या झुणका वांग्याचे भरीत आणि हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबातच खातात.

आम्ही आशा करतो कि, गरम गरम ज्वारीची भाकरीची चव तुम्ही कधीच विसरणार नाही

लक्ष्य दया :- ज्वारीची भाकरी / Jwarichi Bhakri रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

About Editorial team

Check Also

Stuffed Mirchi Pakora

भरवा हिरव्या मिरचीचे भजे बनवण्याची विधी | Stuffed Mirchi Pakora Recipe

Stuffed Mirchi Pakora भजे पावसाळयात खायला फार आवडतात भारतीय कुटूंबात भजे बरेचदा बनवले जातात. हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *