Kadai Chicken – कढई चिकन हा उत्तरी भारतीय पर्वतीय भागातील एक पदार्थ आहे. यास गोश्त कढई असेही म्हणतात.
कढई चिकन बनविण्याची विधी – Kadai Chicken Recipe
Ingredients of Kadai Chicken
कढई चिकनसाठी लागणारी सामग्री:
- चिकन तुकडे – 250 ग्रम
- शिमला मिर्च – 1 पाव (चौकोनी कापून)
- कांदे – 2 बारीक लांब चिरून
- टमाटर – 1-2 पेस्ट करून
- तेल – गरजेनुसार
- 1 कापलेली लाल मिर्च
- कांदा पेस्ट – 1 चमचा
- आलं लसूण पेस्ट – 1 चमचा
- स्वादानुसार मीठ
- गरम मसाला – 1 चमचा
- काश्मिरी तिखट – आवश्यकता नुसार
- काजू – 10 – 15 ( गरम पाण्यात 10 -15 मिनिटे भिजवलेली)
- हिरवा सांभार
- जीर – 1 चमचा
Kadai Chicken Recipe
कढई चिकन बनविण्याचा विधी:
सर्व प्रथम काजूची पेस्ट बनवून घ्या. एक कढई मध्ये तेल घ्या. त्यात शिमला मिरची कापलेला कांदा 10 मिनिटे होऊ द्या. ते तांबूस रंगाचे झाल्यास एका प्लेट मध्ये काढून घ्या. आता त्याच कढईत तेल घेऊन त्यामध्ये आलं लासन पेस्ट, काश्मिरी लाल तिखट, जीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगल परत. ध्यानात ठेवा कि पेस्ट जळता कामा नये. आता त्यात चिकन चे तुकडे टाका व 5 मिनिटे होऊ द्या.
ग्रेवी चांगली झाली कि त्यात टमाटर पेस्ट टाका, त्यात गरम मसाला घाला आणि 10 -15 मिनिटे मिश्रण चांगले होऊ द्या. त्यात तळलेली शिमला मिरची व कांदा घाला. आता काजू पेस्ट घाला व थोड पाणी घाला व 15 मिनिटे होऊ द्या.
15 मिनिटानंतर वरून मीठ व आवश्यकता असल्यास गरम मसाला घाला. आणि त्यावर बारीक चिरलेला हिरवा सांभार टाका तयार कढई चिकन भात व पराठ्यांसोबत सर्व्ह करा.
Read More:
लक्ष्य दया: कढई चिकन / Kadai Chicken रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Very Nice Kadai Chicken Recipe