कढी चावल बनविण्याची विधी

Kadhi Chawal Recipe in Marathi

पंजाबी प्रांतातल्या लोकांची खवय्येगिरी सर्वदुर सुपरिचीत आहे. तिथले लोक दुधा तुपाचे शौकीन असल्याने खुप तंदुरूस्त आणि तगडे दिसतात. सरसो का साग, मक्के दि रोटी, लस्सी, अश्या पदार्थांची नावं तर आपण नेहमीच चित्रपटांमध्ये आणि इतरत्र ही ऐकत आलो आहोत. पंजाबी लोकांच्या डिश बनवायला खुप कठीण जरी नसल्या तरी पध्दत मात्र वेगळी पहायला मिळते.

कढी चावल नावाचा पदार्थ पंजाबी घरांमधे खुप चवीनं खाल्ला जातो. लहान मुलं आणि तरूण वर्ग याला खुपच पसंत करतो. पंजाबात तर कढीचावल रोज बनवला जातो. आज आपण कढीचावल कसा बनवायचा ते बघणार आहोत.

Kadhi Chawal Recipe in Marathi

कढी चावल बनविण्याची विधी – Kadhi Chawal Recipe in Marathi

पंजाबी जेवणाची चवच खुप न्यारी असते. जो एकदा याची चव घेईल तो कधीही ती विसरणार नाही. जर तुम्हाला गरम गरम भातासोबत पंजाबी कढी खायला मिळाली तर तुम्ही म्हणाल क्या बात है ! निश्चितच तुम्हाला आनंद होईल कारण साधारणतः आपण जशी कढी बनवतो त्यापेक्षा ही पंजाबी कढी बनविण्याची पध्दत बरीच वेगळी आहे. तीला बनवणे कठीण नाही फक्त मसाल्यांचे प्रमाण जर बरोबर असेल तर जेवण खुप स्वादिष्ट बनतं.

पंजाबी लोक चटपटा आणि मसालेदार जेवण जेवतात पण आज जी कढी आपण बनवणार आहोत त्यात बिलकुल मसाले नाहीत मात्र बिनामसाल्याची असली तरी ही कढी अतिशय स्वादिष्ट बनते, यात जे पकोडे टाकले जातात ते चवीला अगदीच वेगळे असतात कारण त्यात कांदा, अद्रक आणि मिरचीचा स्वाद तुम्हाला येईल. चला तर मग बनवुया कढी चावल.

Ingredients of Kadhi Chawal
कढी चावल साठी लागणारी सामग्री:

कढी बनवण्याकरता सामग्री

  • अर्धा कप दही
  • 3 चमचे बेसन
  • 1 चमचा तेल
  • 4 लाल मिरच्या
  • 1 चमचा सरसो चे बिज
  • चिमुटभर हिंग
  • अर्धा चमचा मेथीदाणे
  • 1 चमचा अद्रक पेस्ट
  • 1 चमचा लसुण पेस्ट
  • अर्धा चमचा कापलेली हिरवी मिरची
  • दिड चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • 2 ते 3 कप पाणी
  • चविनुसार मीठ

पकोडा बनवण्याकरता सामग्री

  • 2 ते 3 कप बेसन
  • 1 चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा खाण्याचा सोडा
  • 1 कापलेला कांदा
  • 1 चमचा हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  • 2 चमचे कापलेली कोथिंबीर
  • चविनुसार मीठ
  • तळण्याकरता तेल

चावल बनवण्याकरता तेल

  • 1 कप तांदुळ
  • 3 ते 4 कप पाणी
  • 1 चमचा मीठ

Kadhi Chawal Recipe
कढी चावल बनविण्याचा विधी:

पकोडा बनविण्याची विधी:

मिश्रण बनवण्याकरता एक भांड घ्या त्यात लाल तिखट, बेसन, मीठ, खाण्याचा सोडा, कांदा, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आणि कोथिंबीर टाका.

आता या मिश्रणात थोडे थोडे पाणी टाकत राहा आणि घट्ट मिश्रण तयार करा.

तळण्याकरता कढईत तेल गरम करून घ्या, आता छोटे छोटे मिश्रणाचे गोळे तेलात सोडा, तळतांना या गोळयांना हलवत राहा. जोवर सोनेरी रंग येत नाही तोवर गोळे तळा. आता सगळया मिश्रणाचे असेच गोळे बनवुन घ्या. तळल्यानंतर त्यांना पेपर वर काढुन घ्या कारण जास्त तेल त्यात राहायला नको.

कढी बनवण्याची विधी:

एका मोठया भांडयात दही, बेसन, आणि थोडे पाणी घ्या आणि गाठी पडणार नाही असे मउ मिश्रण तयार करा.

आता मिश्रणात लाल तिखट हळद आणि मीठ टाका.

कढईत तेल गरम करा त्यात जीरे, मेथीदाणे, आणि हिंग टाका. मेथी दाणे फुटायला लागल्यावर त्यात हिरवी मिरची, अद्रक, आणि लसणाची पेस्ट टाका. चांगले हलवत राहा आणि नंतर फेटलेले दही टाकत राहा आणि दुस-या हाताने हलवत राहा. मिश्रणाला चांगले मिक्स करा, चांगले उकळायला लागल्यानंतर गॅस मंद करा. मंद आचेवर 10 ते 15 मिनीटे शिजु दया.

सव्र्ह करण्यापुर्वी त्यात पकोडे टाका आणि कोथींबीरी ने सजवा.

चावल बनवण्याची विधी:

तांदुळ चांगले धुवुन घ्या आणि बाजुला ठेवा. एका पातेल्यात पाणी घेउन चांगले उकळुन घ्या, जेव्हां पाणी चांगले उकळायला लागेल तेव्हां त्यात चविनुसार मीठ टाका. 15 मिनीटे तांदुळाला शिजु द्या नंतर मंद आचेवर गॅस करून तांदुळाला मउ होउदया. आता एका भांडयात हे चावल घेउन सव्र्ह करेपर्यंत झाकुन ठेवा.

आता चावल ला गरमागरम पंजाबी कढी सोबत सव्र्ह करा.

Read More:

लक्ष्य दया: Kadhi Chawal – कढी चावल रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top