काजू कतली बनविण्याची विधी

काजू कतली / Kaju Katli ज्या काजू स्लाईस असून त्यांना आपण काजू कतली किंवा काजू बर्फी असे हि म्हणतो. काजू कतली हे एक अत्यंत लोकप्रिय भारतीय व्यंजन आहे. हा एक गोड पदार्थ आहे जो बर्फी सारखाच घट्ट दुधात व साखरेत सुखा मेवा घालून तयार केला जातो.

Kaju Katli Recipe

काजू कतली बनविण्याची विधी – Kaju Katli Recipe in Marathi

केसर काजू कतली मध्ये उच्च दर्ज्याचे केसर वापरल्या जाते. केसर मुळे यास एक खास स्वाद व दर्जा मिळतो. हि मुख्यतः उच्च वर्गीयांची आवडती बर्फी मानली जाते.

अगदी कोरड्या काजूंना मिक्सर मधून त्याची पावडर तयार केली जाते.साखरेचा एक तारी पाकात दूध व शुद्ध देशी तुपात हि काजू पावडर घालून घट्ट झाल्यावर पसरट भांड्यात ओतून सुख्या मेव्याच्या तुकड्यांनी सजवले जाते. काजू कतली मुख्यतः डायमंड शेप मध्ये कापली जाते. यामुळे यास एक शाही लूक येते.

काजू कतली चा रंग पांढरा असतो त्यातील काजू व दुधामुळे हा रंग मिळतो तर केसर काजू कतली थोडी पिवळसर पांढरी असते.
काजू कतलीचा रंग त्यात मिळवलेल्या खास पदार्थांमुळे मिळतो.

संपूर्ण भारतात काजू कतली पसंत केली जाते. बिकानेरी खवय्यांनी याचे शुगर फ्री वर्जन सादर केले आहे. जे लोक फार पसंत करत आहेत. चला तर मग जाणू या काजू कतली कशी बनवितात?

काजू कतली तयार कशी करायची विधी

Ingredients of Kaju Katli
काजू कतलीसाठी लागणारी सामग्री :-

  • १ कप दूध ( क्रीमवाले )
  • २५० ग्राम सुके काजू
  • १ १/२ कप साखर पूड
  • १ कप पाणी
  • १ मोठे चम्मच तूप
  • सुका मेवा बारीक केलेला

Kaju Katli Recipe
काजू कतली बनविण्याचा विधी:-

सर्व प्रथम काजू पूर्णपणे कोरडे आहेत. याची खात्री करून घ्या. काजू घेवून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या काही तुकडे राहिल्यास ते काढून घ्या.

गॅसवर नॉन स्टिक पॅन ठेवा.

त्यात साखर पूड व १ कप पाणी घेवून त्याला चांगले घट्ट होवू द्या. त्यात काजू पावडर व दूध आणि तूप घाला.

मिश्रण ४-५ मिनिटे चांगले ढवळा गॅसवर मंद करा काजू लाल व्हायला नको.

एका पसरट व समतळी ताटात चांगले तूप परतून लावा.

Homemade Kaju Katli Recipe in Marathi

हे मिश्रण त्यात ओता व समतळी पसरवा कतलीस जास्त थोपटू नका.

थर समान असावा त्यावर सुका मेव्याच्या बारीक तुकड्यांना पसरावा धारदार चाकूने यात डायमंड आकाराचे काप लावा.

त्यावर चांदीचा वर्क चढवा. चांगले थंड होण्यासाठी यास १५-२० मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. नंतर बाहेर काढून त्याचा नीटपणे चकत्या वेगळ्या करा.

अशाप्रकारे हि शाही थाटाची काजू कतली यास बर्फी म्हणू शकतो.

हि साधारणतः सामान्य तापमानात ४-५ दिवस टिकते. फ्रीज मध्ये यापेक्षा काही दिवस टिकते.

सूचना

  1. फक्त दूधच यात मिळवा. तेही योग्य त्या प्रमाणात
  2. वाटल्यास दुधाचा वापर न केल्यास हि चालेल.
  3.  साखरेचा वापर चवीप्रमाणे करता येईल. परंतु जास्त साखर यास खराब करू शकते.

तेव्हा काजू कतलीचा आस्वाद घ्या अन आपल्या पाहुण्यांनाही खावू घाला. बघा नक्कीच तुम्हाला याबद्दल प्रशंसा मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top