स्वयंपाकासाठी काही खास टिप्स

Kitchen tips in Marathi

मैत्रिणींनो आपण नेहमी विचार करतो की आपणांस Kitchen tips – स्वयंपाकासाठी नवनवीन टिप्स व डिशेशची माहिती मिळावी तर आज आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक करतांना काही खास टिप्स ज्यांचा वापर तूम्ही आरामाने आपल्या किचन मध्ये करू शकता.

Kitchen Tips

स्वयंपाकासाठी काही खास टिप्स – Kitchen tips in Marathi

1) टमाटरचा पल्प पटकन् काढण्यासाठी-

टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी व ज्युस साठी करता येतो.

2) नासलेल्या पोळीत ताजेपणा आणण्यासाठी-

नासलेल्या पोळयांना कुकरमध्ये 1-2 शिट्टया देवून उकडून घ्याव्यात व तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या अशा पोळया रूचकर व नरम लागतात यास खाण्यासाठी आरामात वापरू शकता.

3) लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी-

उन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार उर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवून चवहीन होतात. त्यासाठी लिंबूना निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रिजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहातात.

4) नारळास दोन समान भागात तोडण्यासाठी-

जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे.

5) नरम व मोकळा भात बनवण्यासाठी –

तांदुळ शिजवतांना कुकर मध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो.

6) कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी –

पुऱ्या च्या  कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल घाला.

7) कुरकुरीत भजे बनविण्यासाठी –

मिश्रणात मक्याचे पीठ घालावे.

वरील उपाय करून तुम्ही नक्कीच आपला वेळ वाचवु शकता.

या टिप्स् ने वाचेल किचन मधला टाइम – New Kitchen Tips for the Home

 •  इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदुळ मिसळावे याने इडली चांगली नरम येते.
 • उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते.
 • पोळयांच्या डब्यात अद्रकाचे एक दोन काप ठेवल्यास पोळया नरम राहतात.
 • वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थीत आहे की नाही हे माहित करण्यासाठी मिश्रणाचे एक दोन थेंब एका कपभर पाण्यात टाकावे जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते.
 • कुरकुरे भजे बनविण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पिठ टाकावे.
 • अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्यास उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिळवावे. अंडयाचे द्रव्य बाहेर येणार नाही.
 • कारल्यामधील कडुपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्धा तासासाठी फ्रिजमधे ठेवा.
 • हिरव्या भाज्या कापल्यावर त्यांना प्लास्टीक डब्यात ठेवु नये.
 • कांदा दोन भागात कापून त्यास थंड पाण्यात ५-१० मिनीटे ठेवल्यास कापतांना डोळयात अश्रु येत नाहीत.
 • बटाटे आणि कांदे एकत्र साठवु नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात.
 • बटाटयाचे चिप्स बनवितांना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत त्याने ते फार क्रिस्पी बनतात.
 • भेंडी ची भाजी बनवतांना त्यात १-२ लिंबुच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही.
 • पुरी किंवा भजे तळतांना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल.
 • पनीर ला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात.
 • हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.

तर ह्या होत्या काही किचन साठी टिप्स अश्याच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी कनेक्ट रहा माझीमराठी सोबत.

धन्यवाद!

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी स्वयंपाकासाठी काही खास टिप्स असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top