लस्सी / Lassi हे एक पारंपारिक पंजाबी पेय आहे. या लोकप्रिय क्रिमी, गोड दहीच्या पेयास पंजाबी लोक आपल्या दैनिक आहारात समावेश करतात.
पंजाबी लस्सी बनविण्याची विधी – Lassi Recipe in Marathi
लस्सी भारतातील उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि सर्वात जास्त पंजाब मध्ये पिल्या जाते. कारण हे पेय मुळचे पंजाबीच आहे.
लस्सी मुख्यतः तीन प्रकारची असते.
१.मिठाची २.गोड 3.मसाल्याची
मातीच्या मडक्यात पिणे जास्त पसंत केले जाते. गोड लस्सी फार भारी असते. कारण यात जास्त दूध क्रीम व साखर असते. लस्सी बनविण्यासाठी ताजे व घट्ट दहीचा वापर केला जातो. उत्तर भारतातील लोक सकाळी नित्याने नास्त्यासोब्त याचे सेवन करतात.
दही मध्ये खुपसारे पोषके असतात जसे कि प्रोटीन, कॅल्शीयम, म्याग्नेशियम आणि B12 आणि B6 जीवनसत्वे या सर्व पोषकामुळे शरीराला बराच फायदा होतो. दही अन्न पचवण्यास मदत करते. तसेच यातील कॅल्शियम दात आणि हाडांच्या कार्यक्षमतेत वाढ करून त्यांना मजबूत बनवितो. दही आपण सरळ हि खाऊ शकतो परंतु लस्सी बनवून पिल्याने यातील पोषक तत्वे अधिक गतीने शरीरास पोषण देतात. लस्सिला काही आधुनिक लोक दहीशेक पण म्हणतात.
भारतात अलग अलग ठिकाणी भिन्न भिन्न पद्धतीने लस्सी बनविली जाते. परंतु त्यात दही हा पदार्थ एकच असतो.
उत्तरी भारतीय आणि पंजाबी लोक गोड लस्सी पितात तर गुजराती व दक्षिण भारतीय लोक मिठाची लस्सी बनवून पितात.
मिठाच्या लस्सीत पुदिना, धनिया व जिरेपूड टाकतात. उन्हाळ्यात लोक नेहमीच थंड लस्सीचा वापर एनर्जी ड्रिंक म्हणून करतात. लस्सी कोणत्याही मोसमात पिता येते.
चला लस्सी बनविण्याची विधी जानुया
Ingredients of Lassi
लस्सी साठी लागणारी सामग्री :-
- ताजे घट्ट दही – २ १/२ कप
- साखर १/२ कप
- बर्फाचे तुकडे गरजेनुसार
- दूध – १/२ कप
- ताजे दूधक्रीम २ चम्मच
- विलायची व सुका मेवा
Lassi Recipe
लस्सी बनविण्याचा विधी:-
-दही आणि साखर चांगल्या प्रकारे मिळवून घ्या.
-मिक्सरच्या पॉट मध्ये हे मिश्रण टाकून त्यात बर्फाचे तुकडे टाका.
-त्यात दुध व दुधक्रीम टाका.
-विलायची बारीक करून टाका
-मिक्सर फिटवून मिश्रण एकजीव होऊ द्या.
-ग्लास मध्ये काढून त्यावर दुधाचे क्रीम व सुका मेवा बारीक करून टाका. थंड लस्सी तयार आहे.
टिप्स
- दही व दूध ताजे असावे.
- लस्सी बनविताना ताजे पदार्थच वापरावे.
- दही व इतर पदार्थ चांगल्याप्रकारे मिळविण्यासाठी मिक्सरचा वापर करावा.
- घट्टपणा कमी करण्यासाठी जास्त बर्फ किंवा पाणी घाला.
- लस्सीमध्ये केसराचा वापर अधिक स्वाद व रंगासाठी करता येतो.
- लस्सीमध्ये वाटेल तितके दूध क्रीम टाका.
- दूधक्रीम फेटू नये.
तर मग नक्कीच लस्सीचा स्वाद घ्या व आरोग्य चांगले बनवा.