महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे, ज्या मुळे राज्याच्या गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या क्षेत्रात व जीवनामध्ये प्रोत्साहन मिळणार. त्याचे नाव “लेक लाडकी योजना” आहे. या योजनेमुळे मुलींना आर्थिक मदत मिळेल, जेणेकरून त्या शिक्षण घेऊ शकतील. या लेखात तुम्हाला या योजनेबद्दल सर्व माहिती मिळेल. तुम्ही या योजनेतील लाभ कसा मिळवावा, अर्ज कसा करावा, हे सर्व तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरू करूयात.
कोण करू शकतो अर्ज?
या योजनेतील लाभ घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले पात्रे पूर्ण करावे लागतील:
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
- योजनेसाठी फक्त मुली पात्र.
- तुमच्या कुटुंबात पिवळा किंवा केसरी रंगाचा राशन कार्ड असणे आवश्यक.
- लाभार्थी च बँकेत खात असणं आवश्यक.
- वयाच्या १८व्या वर्षापर्यंत मुलीला योजनेचा लाभ घेता येईल.’
अर्ज कसा कराव?
या योजनेतील लाभ घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले Steps Follow करावे लागतील:
तुम्हाला या योजनेतील अर्ज फॉर्म भरायला लागेल. परंतु या फॉर्मची ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. फॉर्म सुरु होतील तेव्हा कळविण्यात येईल.
ह्या योजनेबद्दलचे अपडेट जसे येतील तसे आम्ही तुम्हाला कळवणार, तरी तुम्ही माझी मराठी सोबत जुळून राहा, आणि ह्या योजनेबद्दल वाचत राहा.
तसेच पुढची प्रक्रिया सुद्धा पुढे कळविण्यात येईल तर तुम्ही माझीमराठी सोबत जुळून राहा!
लाभ काय आहे?
या योजनेमुळे तुम्हाला खुपच लाभ होऊ शकतो. या योजनेतील लाभ म्हणजे:
- मुलीचा जन्म झाल्यावर सरकार 5000 रुपये देते.
- मुलगी पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर सरकार 4000 रुपये देते.
- मुलगी सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर सरकार 6000 रुपये देते.
- मुलगी अकराव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर सरकार 8000 रुपये देते.
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75000 रुपये मिळतील.
योजनेमध्ये Apply करण्याकरिता काही टिप्स –
या योजने करता अर्ज कराल तेव्हा ह्या काही टिप्स तुमच्या कामात येतील –
- या योजनेतील अर्ज फॉर्म भरायला वेळोवेळी अनेक ऑनलाइन वेबसाइट वरून जाऊ नका आणि फसू नका. फॉर्म फक्त अधिकृत वेबसाईट वरतीच मिळेल (नंतर कळेलच).
- या योजनेतील अर्ज भरताना वेळोवेळी सर्व कागदपत्रे नीट चेक करा. काहीही चूक झाली तर पुढे प्रोब्लेम होऊ शकतात.
महत्वाची सूचना –
योजने मध्ये बदल होऊ शकतात, म्हणूनच या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी योजनेशी संबंधित अधिकृत वेबसाईट वरती जाऊन एकदा नक्की वाचा.
I have 3 daughter’s I am also deserve to this yojana
Please lavkrat lavkr sanga ya yojne chi mahiti.😊