महाराष्ट्र सरकार ने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी बऱ्याच योजना सुरु केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे “माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना” ही एक आर्थिक सहाय्यक योजना आहे, ज्यात महाराष्ट्र सरकार ने मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणा पर्यंत सर्व खर्च उचला आहे. ही योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू केली आहे. ह्या योजने बद्दल अजून माहिती हवी असेल तर पुढे वाचत राहा.
आपण ह्या लेखामध्ये ह्या योजनेबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत, व जर तुम्हाला ह्या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल, तर कुठला ही पाऊल उचलण्या आधी अधिकृत दस्तावेज लक्षपूर्वक वाचा. आम्ही आपल्यापर्यंत फक्त माहिती पोहचवत आहोत.
“माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना” महाराष्ट्र सरकार मुलींना 50 हजार रुपये!
योजनेचे नाव: “माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना”
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी-
माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच लाभार्थ्याला दोन मुली असने आवश्यक आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 7.50 लाख (सात लाख पन्नास हजार फक्त) पेक्षा कमी असावे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही योजना फक्त 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे. मुलींचे जन्म नोंदणी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्या कार्यालयात केले असावे.
मुलीच्या जन्मानंतर १ वर्षांत माता / पिताने कुटुंब नियोजन शत्रक्रिया केली असावी आणि त्याचे प्रमाणपत्र सादर केले असावे.
माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजने अंतर्गत मिळणारे लाभ –
ही योजना मध्ये खालील लाभ आहेत:
- एक मुलीसाठी, पालकांनी कुटुंब नियोजन शत्रक्रिया केलेली असेल तर, मुलीच्या नावाने रु. 50,000 बँकेत मुदत ठेवण्यासाठी अनुदान मिळतील. ही रक्कम मुलीला वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल.
- दोन मुलींसाठी, पालकांनी कुटुंब नियोजन शल्यक्रिया केलेली असेल तर, प्रत्येक मुलीच्या नावे रु. 25,000 बँकेत मुदत ठेवण्यासाठी अनुदान मिळेल. ही रक्कम मुलींना वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल.
- जर दोन मुलींपैकी एका मुलीचा जन्म 1 ऑगस्ट 2017 पूर्वी झाला असेल तर हि योजना एका मुलीसाठीच लागू होईल.
- हे रक्कम बँकेत मुदत ठेवण्यासाठी अनुदान मिळल्यावर, त्यावरील व्याज मुलीला वय वर्ष 6, १२ आणि १८ व्या वर्षी काढता येईल.
मुलीला शिक्षण संपूर्ण करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी हा लाभ घेतला जाऊ शकतो.
माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजनेसाठी Apply कसे करावे –
ह्या योजनेसाठी खालील प्रक्रिया पालन करावी:
- मुलींच्या जन्मानंतर, पालकांनी आंगणवाडी सेविका कडे प्रपत्र-‘अ’ आणि ‘ब’ मध्ये (जे लागू असेल ते) भरून घ्यावं (अर्ज इथून डाउनलोड करू शकता, किव्वा स्वतः मिळवू शकता)
- त्यासोबत उपर्युक्त अटी/शर्ती अनुसार नमूद दस्तावेज सादर करण्यात यावेत.
- आंगणवाडी सेविका ने संबंधित लाभार्थ्यांकडून भरून घेतल्या अजून आंगणवाडी पायांकरणकर्ता / मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावे, त्यामुळे बँकेत मुदत ठेवण्यासाठी अनुदान मिळेल.
अर्ज कसा करावा ह्याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत दस्तावेज लक्षपूर्वक वाचा.
माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजनेसाठी लागणारे महत्वपूर्ण दस्तावेज
ही योजना साठी खालील दस्तावेज आवश्यक आहेत:
- मुलींचे जन्म प्रमाणपत्र
- कुटुंब नियोजन शल्यक्रिया प्रमाणपत्र
- पालकांचा आधार कार्ड
- पालकांचा वार्षिक उत्पन्न दाखला
- मुलींचे बँक खातेची माहिती
निष्कर्ष
माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजना हे एक चांगली आणि उपयोगी योजना आहे, ज्यात महाराष्ट्र सरकार मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदत करते आहे. हे योजना कुटुंब नियोजनाचे प्रचार करून, मुलींचे जन्मदर वाढविण्याकरिता, लग्नासाठी, व मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारून देते. या योजनेसाठी पात्र असलेले सर्व नागरिक हे योजनेचा लाभ घेऊन, मुलींचा विकास करून, देशाचे विकास करू शकतील.
महत्वपूर्ण सूचना – योजनेमध्ये बदल होऊ शकतात, म्हणूनच योजनेमध्ये अर्ज करण्या पूर्वी योजनेशी संबंधित अधिकृत दस्तावेज लक्षपूर्वक नक्की वाचा
योजनेसम्बंधित दस्तावेज –
https://womenchild.maharashtra.gov.in/var/www/html/wcdm/upload/uploadfiles/files/Majhi%20Kanya%20Bhagyashree%20Scheme.pdf