Home / Recipes / मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer Recipe in Marathi

मटर पनीर एक उत्तर भारतीय डीश असुन ज्याला हिरवे मटर आणि पनीर च्या मदतीने बनवले जाते. मटर पनीर ला तुम्ही भात, पोळी, पराठा, नान, किंवा पुरी सोबत देखील सव्र्ह करू शकता. बरेचसे लोक आपल्या घरात होणा.या पाटर्यांमधे देखील मटर पनीर चा समावेश करतात आणि लोक मोठया आनंदाने आणि चवीने मटर पनीर चा आस्वाद घेतात.

पनीर मटर मसाल्याला अधिक घट्ट, स्वादिष्ट आणि क्रिमी बनवण्याकरता काजु आणि क्रिम चा उपयोग केला जातो. मटर पनीर बनवण्याच्या या पध्दतीत तुम्ही क्रीम चा उपयोग नाही केला तरीही चालेल. मटर पनीर बनवीण्याच्या ब.याच पध्दती आहेत परंतु आज इथे आम्ही तुम्हाला सर्वात सोपी आणि त्वरीत बनवता येणारी रेसीपी सांगणार आहोत. मटर पनीर पराठा किंवा नान सोबत खाण्यात आणखीन स्वादिष्ट लागते. चला तर पाहुया मटर पनीर कसे बनवायचे ते.

मटर पनीर बनवण्याची विधी – Matar Paneer Recipe in Marathi

Matar Paneer

Ingredients of Matar Paneer
मटर पनीरसाठी लागणारी सामग्री:

1) 250 ते 300 ग्रॅम पनीर
2) 1 कप मटर (हिरवे आणि ताजे)
3) 1 ते दिड कप पाणी
4) अर्धा चमचा जीरे
5) अर्धा चमचा हळद
6) 1 चमचा लाल तिखट
7) 1 चमचा गरम मसाला पावडर
8) 1 चमचा मलाई (एैच्छिक)
9) अर्धा चमचा साखर (एैच्छिक)
10) 2 ते अडीच चमचे तेल किंवा तुप
11) सजवण्याकरता कोथिंबीर
12) चविनुसार मीठ

मसाला बनवण्याकरता लागणारी सामग्री:

1) 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो
2) 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
3) 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
4) अर्धा इंच अद्रक बारीक चिरलेले
5) 2.3 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळया
6) 2 चमचे बारीक चिरलेली कोथींबीर
7) 10 ते 12 काजु कापलेले
8) 4 ते 5 बंदे काळे मिरे
9) 2 ते 3 लवंगा
10) अर्धा इंच संपुर्ण न कापलेली कोथींबीर

Matar Paneer Recipe
मटर पनीर बनविण्याचा विधी:

वर दिलेले सर्व मसाले मिक्सर मधुन चांगले बारीक करून घ्या आणि मुलायम पेस्ट तयार करा. मिक्सर मधुन बारीक करतांना पाणी टाकण्याची आवश्यकता नाही. बारीक केल्यानंतर मिश्रण बाजुला ठेउन द्या. आता एका कढईत तेल किंवा तुप गरम करा. त्यात अर्धा चमचा जीरे टाकुन तडतडु द्या.

आता त्यात तयार केलेली मसाला पेस्ट टाका. टाकल्यानंतर सलग हलवत राहा. मसाला टाकल्यानंतर हलवतांना लक्ष ठेवा, जेव्हां मसाला तडतडायला लागेल तेव्हां त्याला तुम्ही अर्धे झाकु देखील शकता. आता 10 ते 12 मिनीटांपर्यंत त्याला शिजु द्या आणि नंतर गॅस मंद करावा. लक्षात असुदया की मिश्रणात तेल वेगळे दिसायला हवे.

आता त्यात सगळे कोरडे मसाले टाका – हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, टाकल्यानंतर चांगले मिक्स व्हायला हवे.

जर तुम्ही क्रिम किंवा मलई टाकणार असाल तर तुम्ही आत्ता टाकु शकता. टाकल्यानंतर मिश्रणाला चांगल्या पध्दतीने मिसळा. आता मिश्रणात मटर टाका आणि मिक्स होउ दया. आता मिश्रणात पाणी आणि चवीनुसार मीठ टाका.

आता कढई ला चांगल्या त.हेने झाका आणि जोपर्यंत मटर शिजत नाही तोपर्यंत शिजवत राहा.

जेव्हां तुम्ही झाकण काढुन मटर शिजले की नाही हे पाहाल तेव्हां जर तुम्हाला वाटले की गे्रव्ही थोडी घट्ट आणि कमी आहे तर तुम्ही त्यात थोडे पाणी सुध्दा टाकु शकता. परंतु पाणी टाकल्यानंतर त्याला परत गरम करणे आवश्यक आहे.

आता त्यात पनीर चे तुकडे टाका आणि मंद आचेवर 5 ते 10 मिनीटं शिजु द्या जोवर पनीर चे तुकडे पुर्णपणे शिजत नाही. हलकासा गोडसरपणा येण्याकरता तुम्ही त्यात थोडी साखर देखील टाकु शकता. (साखर पनीर टाकण्यापुर्वी टाकावी)

पनीर ला जास्त वेळपर्यंत शिजवु नका त्यामुळे ते लिबलीबीत किंवा जास्त कडक होण्याची भिती असते. आता मटर पनीर ला कोथींबीर टाकुन सजवा.
गरमा गरम मटर पनीर ला पोळी, पराठा किंवा भाता सोबत सव्र्ह करा.

नोट:

1) मटर पनीर जर तुम्ही कुकर मध्ये बनवणार असाल तर त्यात पहीले जीरं टाका त्यानंतर मसाला पेस्ट. जेंव्हा त्यात हलकेसे तेल सुटायला लागेल तेव्हां त्यात मटर टाकावे आणि चवीनुसार मीठ टाकावे आणि अंदाजे दिड ते 2 कप पाणी टाकावे. आणि आता कुकर चे झाकण लावा आणि शिटी झाल्यानंतर मटर चांगले शिजले असे समजावे. गे्रव्ही घट्ट झाल्यास तुम्ही त्यात आपल्या अंदाजाने पाणी देखील टाकु शकता.

2) जर टोमॅटोने गोड पणा आला नाही तर तुम्ही त्यात थोडी साखर टाकु शकता.

Read More:

लक्ष्य दया: Matar Paneer – मटर पनीर रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Check Also

Upma Recipe

उपमा बनविण्याची विधी – Upma Recipe in Marathi

Upma Recipe in Marathi मित्र हो आपण नेहमी पोहे, इडली, डोसा, हे पदार्थ नाश्त्याला खाउन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *