Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

McDonald’s च्या यशाची कहाणी

बरेचदा आयुष्यात आपण एखादे काम किंवा एखादा नवा व्यवसाय सुरू करतो तेव्हां आपल्याला पुसटशी देखील कल्पना नसते की भविष्यात या सुरू केलेल्या कामाचे स्वरूप काय राहाणार आहे? आपण ते करत जातो आणि कधी कधी “न भुतो न भविष्यती” असे यश मिळते ज्याची कधी कुणी कल्पना देखील केली नाही.

आपल्याला असे देखील बरेचदा ऐकायला मिळते की एखादयाकडे चाकरी करत राहाण्यापेक्षा स्वतःचा छोटाच का होईना पण व्यवसाय करावा. न जाणो पुढे त्याला यश मिळालं तर शेकडो हातांना आपणच काम देणारे ठरू, पण आपण जोखीम घ्यायला घाबरतो आणि त्यामुळे मागे पडतो काहीतरी पोटापुरते काम करत आयुष्य पुढे जात राहाते.

पण जे जोखीम उचलतात आणि जे होईल ते बघुन घेउ असा विचार करून व्यवसायात उतरतात ते पुढे इतिहास रचतात. अशी बरीच उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेतच, त्यातलेच एक उदाहरण म्हणजे “मॅकडोनाल्ड”  होय! कुणी विचार केला होता की दोन बांधवांनी सुरू केलेले हे छोटेसे रेस्टॉरंट पुढे करोडो लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे ठरेल? पण तसं घडलं आणि प्रत्येक देशात आणि प्रत्येक राज्यात, मोठमोठया शहरात यांनी आपला व्यवसाय विस्तारत नेला आणि आज आपल्याला त्याचं भव्यदिव्य असं रूपडं बघायला मिळतय!

कसा वाढला या मॅकडोनाल्ड चा विस्तार त्याबद्दल आपण जाणुन घेउया….

McDonald’s च्या यशाची कहाणी – McDonald’s Story in Marathi

McDonald's Story
McDonald’s Story

आपल्याला कदाचित कल्पना नसेल की दिवसाला 65 मिलीयन पेक्षा अधिक लोकं मॅकडोनाल्ड मधे खातात, आणि हे वाचुन देखील तुम्ही नक्की आश्चर्यचकीत व्हाल की मॅकडोनाल्ड कंपनी प्रतिदिवशी 100 मिलीयनहुन अधिक बर्गर लोकांपर्यंत पोहोचवते! ही मॅकडोनाल्ड ची रेस्टॉरंट श्रृंखला कॅलीफोर्निया शहरातील एका छोटयाश्या परिवारातील दोन बांधवांनी सुरू केली.

“मॅकडोनाल्ड”  आज जगातील प्रमुख रेस्टॉरंट पैकी एक गणल्या जाते. 1940 च्या दशकाच्या सुरूवातीला रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी ‘स्पीडी सेवा प्रणाली’  सुरू करत एक रेस्टॉरंट ची सुरूवात केली प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या रेस्टॉरंट मधे हॅम्बर्गर तयार करून विकलं जायचं.

आजुबाजुच्या हॉटेल्समधे तासंतास वाट बघणा.या खवय्यांनी जेव्हा या स्पिडी सेवा प्रणालीला अनुभवलं त्यावेळी ते संपुर्णतः समाधानी तर झालेच पण या नव्या प्रयोगामुळे मॅकडोनाल्ड बंधुंची ख्याती देखील सर्वदुर पसरत गेली.

आता तुम्ही नक्कीच विचार कराल की यांची प्रसिध्दी झाल्यामुळे यांनी लगेच आपला व्यवसाय वाढवला असेल , हो ! असं घडलं परंतु त्वरीत नाही याला या बांधवांनी बराच वेळ घेतला. पुढे त्यांनी मॅकडोनाल्डच्या दुस.या एका शाखेकरता नोंदणी केली, या दरम्यान शिकागो मधील व्यवसायी ‘रे क्रोक’ या बांधवांना दक्षिणी कॅलिफोर्नियात आपला व्यवसाय विस्तारण्याकरता सहाय्य करत होते.

1950 च्या दशकाच्या अंतापर्यंत कंपनी 9 रेस्टॉरंट मधे विस्तारीत झाली आणि वेगानं एक प्रमुख फ्रेंचायसी बनली. रे क्रोक ने या छोटयाश्या रोपटयाला पुढे खुप मोठया प्रमाणात वाढवलं. पुढच्या पन्नास वर्षात मॅकडोनाल्ड ने दहा रेस्टॉरंट पासुन प्रगती केलेला हा व्यवसाय जगभरात पसरला आणि त्याचे रूप आज आपल्यासमक्ष आहे.

मॅकडोनाल्ड चे आज जगभरात जवळजवळ 34,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट आहेत जे आपल्या अव्दितीय चवीमुळे लोकांना बांधण्यात यशस्वी ठरलेत. मॅकडोनाल्ड चे रेस्टॉरंट इंडोनेशिया आणि मिस्र सारख्या देशात देखील आपल्या मांसाहारी विशिष्ट चवी आणि पदार्थांकरता प्रसिध्द झाले आहेत.

वेगानं विस्तारत गेलेल्या या कंपनीला विश्लेषकांच्या कौतुकाला आणि संस्कृति रक्षकांच्या रोषाला देखील बळी पडावे लागले, त्यांच्या मते मॅकडोनाल्ड कंपनी ने अश्या देशांमधे देखील प्रवेश मिळवला जे याकरता कधीच इच्छुक नव्हते.

कंपनीच्या नैतिकतेला एकीकडे ठेवले तर वैश्विक फ्रंचायसी बघता या कंपनीची सफलता निर्वीवादच आहे आणि शतकातील सर्वात यश मिळवणा.यांपैकी आजघडीला मॅकडोनाल्ड चे यश सर्वांसमोर आहे.

गेल्या काही वर्षांपासुन मॅकडोनाल्ड ने फास्ट फुड इंडस्ट्रीतील ब.याच गोष्टींकडे आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे विशेषतः युवापिढीला समोर ठेउन व्यंजन बनवण्यात आता ते लक्ष्य देतायेत.

1970 च्या काळात आपली नवी चव लोकांच्या जिभेवर आणुन ठेवणारा मॅकडोनाल्ड नक्कीच प्रशंसेला पात्र आहे. कॅलिफोर्नियातील एका छोटयाश्या रेस्टॉरंट पासुन मॅकडोनाल्ड ने सुरू केलेला हा प्रवास रेस्टॉरंट श्रृंखलेत बदलला आणि आज इथपर्यंत येउन ठेपला आहे हे अमेरिकेच्या सर्वात यश मिळवणा.या गोष्टींपैकी एक आहे.

कॉर्पोरेट संस्कृती पासुन ते अल्ट्रा कुशल खादयापर्यंत मॅकडोनाल्ड एक अभिनव यशापैकी एक मोठे उदाहरण होय!

Previous Post

जाणून घ्या २३ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Next Post

जाणून घ्या २४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

KFC Colonel Sanders Story
Startup

KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची कहाणी

मित्रांनो अशी उदाहरणं आपण किती पाहीली आहेत की ज्याला सगळं सेट,  अर्थात आयतं, काहीही कष्ट न करता मिळालं आणि तो...

by Editorial team
October 11, 2022
Kunwer Sachdev Sukam
Success Story

सु-काम कंपनीचे फाउंडर “कुंवर सचदेव” यांच्या यशाची कहाणी

मित्रहो आज आम्ही एका यशस्वी व्यावसायिकाच्या जीवन कथेवर प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या कथेस वाचुन तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरून जाईल. तूम्हीही यशाची...

by Editorial team
October 26, 2020
Next Post
24 October History Information in Marathi

जाणून घ्या २४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

TV cha Shodh Koni Lavla

“टिव्ही” चा शोध कसा लागला आणि त्याचा निर्माता कोण?

25 October History Information in Marathi

जाणून घ्या २५ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Dasara Wishes in Marathi

दसऱ्या चे मराठी एस एम एस (SMS)

26 October History Information in Marathi

जाणून घ्या २६ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved