नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय | Nail Care Tips

आपल्या आरोग्याबद्दल आपण म्हणावं तितकं जागरूक नसतो. रोजच्या आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला सवडच होत नाही. पण आपल्या धकाधकीच्या दैनंदीनी मध्ये थोडा वेळ का होईना आपण स्वतःकरता काढायला हवा आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी.

आपली नखं आपल्या आरोग्याविषयी बरच काही सांगतात. म्हणुन आपल्या नखांची काळजी घेणं आणि त्यांना स्वच्छ करणं खुप आवश्यक आहे. इथे नखांना स्वस्थ आणि स्वच्छ ठेवण्याचे काही उपाय – Nail Care Tips दिले आहेत.

Nail Care Tips

नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय – Nail Care Tips

1) आपला आहार नखांच्या संरचनेत मुख्य भुमिका निभावतो. तुम्हाला तुमच्या आहारात सर्व पोषकतत्वांचा समावेश करायला हवा, ज्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, आणि झिंक असायला हवे. या सोबतच तुमच्या आहारात दुध, अंडी, भुईमुगाच्या शेंगा, बदाम असे पदार्थ असावेत. तसच तुमच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश देखील असावा.

2) 1 चमचा जिलेटिन घ्या त्याला उकळत्या पाण्यात टाका. आता त्याला थंड होउ द्या आणि आपल्याकरता फळांचा ज्युस बनवतांना त्यात उपयोगात आणा. असे आपण एक आठवडा देखील करू शकता. असे केल्याने तुमच्या नखांची संरचना योग्य त.हेने होईल.

3) आपल्या नखांना गरम ऑलिव्ह तेलात बुडवा. असे 10 दिवस रोज किमान एक वेळेला तरी करा. यामुळे तुमची नखं स्वस्थ आणि स्वच्छ राहातील.

4) आपल्या नखांवर रोज लिंबाची साल किंवा लिंबाच्या रसाने मालिश करा आणि काही वेळानंतर धुवुन टाका, यामुळे नखांवर असलेले डाग निघुन नखं स्वच्छ आणि स्वस्थ होतील.

5) नखांवर त्वचा मउ ठेवणारी क्रिम किंवा व्हॅसलीन ने मसाज करा असे केल्याने नखांमध्ये रक्तप्रवाह चांगल्या त.हेने होईल. आणि नखं एकदम फ्रेश दिसतील.

6) जैतुन आणि बदामाच्या तेलाने नखांना मसाज करा यामुळे आपली नखं आकर्षित आणि चमकदार दिसतील.

7) गरम पाण्यात थोडे मीठ टाकुन त्यात आपल्या नखांना कमीत कमी 5 मिनीटे बुडवुन ठेवा. नंतर नखांना चांगल्या प्रकारे पुसुन त्वचा मऊ करणारी क्रिम लावा.

काय करावे आणि काय टाळावे – Do’s And Don’ts:

1) डीटर्जंट, क्लिंजर आणि इतर कपडे धुण्याच्या पावडर ला थेट नखांच्या संपर्कात आणु नये.

2) हातात नेहमी हातमोजे असुद्या, जेव्हांही घरचे काही काम करत असाल तेव्हां हातातील मोजे घातलेले असुद्या यामुळे तुमची नखं खराब होणार नाहीत.

3) नेहमी चांगल्या गुणवत्तेची नेल पाॅलीश वापरावी. आपल्या नखांवर कधी कधीच नेल पाॅलीश लावावे, नेहमी वापरू नये.

4) अंघोळीनंतर रोज आपली नखं स्वच्छ करावीत यामुळे नखं स्वच्छ आणि मुलायम राहातील.

5) बाजारात नखांकरता मिळणारी प्रसाधनं देखील तुम्ही तुमच्या नखांकरता वापरू शकता.

6) तोंडाने नखं कुरतडण्याच्या सवयीपासुन लांब राहा.

7) जास्तीत जास्त पाणी प्या आणि चिंतांपासुन लांब राहा.

हे होते काही सोपे उपाय आपल्या नखांना वेगळं, संुदर आणि स्वस्थ ठेवण्याचे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी  Nail Care Tips असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय- Nail Care Tips तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट: नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय – Nail Care Tips या लेखात दिलेल्या घरगुती उपायाबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here