नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे २ हजार होतील खात्यात जमा, कोणाला मिळणार याचा लाभ?
शेतकऱ्यांसाठी आणि जे शेतकरी नमो किसान योजनेचे लाभार्थांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सरकार कडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पहली किस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

शिर्डी मध्ये या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होईल आणि या योजनेतून महाराष्ट्र राज्यातील जवळपास 80 ते 90 लाख शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत प्रत्येकी २ हजार प्रमाणे निधी वाटप होईल. कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहिती नुसार कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्याला भरपूर लाभ मिळेल.
कृषी विभागाने मोहीम हाती घेऊन ‘नमो किसान’ आणि ‘प्रधानमंत्री किसान’ योजनेअंतर्गत येणाऱ्या जवळपास 2 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करून जवळपास ९ लाख ५८ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी, आणि 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी करून अशा एकूण 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांची माहिती update करण्यात आली.
PM Kisan 15th Installment Date | |
PM Kisan Yojana Check |