नवीन शैक्षणिक धोरण 2020

New Education Policy 2020

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने सन 2020 मध्ये पारंपारीक शैक्षणिक पद्धतीत काही अमुलाग्र बदल घडवत “प्रत्येकास शिक्षण” या विचारांना धरून नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. या बदलांमधून चांगल्यात चांगले आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. 2022-23 या शैक्षणिक सत्रापासून नवीन धोरण अंमलात आणले जाईल. तर काय आहेत बदल आणि त्यातील काही ठळक मुद्दे आपण या लेखात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नवीन शैक्षणिक धोरण 2020 – New Education Policy 2020 in Marathi

तर त्यातील काही ठळक मुद्दे –

 • पात्र व प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि त्यासाठी त्यांचे चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण. केंद्राच्या शैक्षणिक विभागाचे विशेष लक्ष त्यावर देण्यात येईल.
 • बाल्यावस्थेतील विद्यार्थ्याची काळजी आणि त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासोबतच दर्जेदार शिक्षणावर भर दिला जाईल.
 • मुलभूत साक्षरता आणि संखाशास्त्र यावर विशेष लक्ष.
 • तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन, लवचिकता, धैर्य, साहस, खेळ या आणि ईतर सर्वसमावेशक विषयांचा समावेश या नवीन शैक्षणिक पद्धतीत करण्यात आला आहे.
 • वेगवेगळ्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू तयार व्हावे या उद्देशाने विशेष अभ्यासक्रमाचा समावेश.
  प्रादेशिक भाषा व त्यांचा अभ्यास अश्या प्रादेशिक विषयांचा समावेश.
 • तंत्रज्ञान शिक्षणावर विशेष भर. उदा. आजच्या काळाचे महत्व ओळखून प्रोग्रामिंगसाठी कोडींग व त्यासारख्याच अनेक विषयांचा समावेश आणि यासह असेच काही विषय अनिवार्य करण्यात आले आहेत.
 • दर्जेदार उच्च शिक्षण आणि समान संधी.
 • दर्जेदार विद्यापीठे आणि महाविद्यालये ज्यामधून शिक्षणाचा स्थर उंचावला जावा.

प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक बदललेले स्थर – 

प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक हे वयोमानानुसार जे स्तर होते त्यातही प्रामुख्याने बदल करण्यात आला आहे तो बदल आपण थोडक्यात जाणून घेऊयात

 • पहिला टप्पा – पायाभूत शिक्षण (प्राथमिक ) – वय वर्षे 3-6 उदा. नर्सरी, आंगणवाडी किंवा बालवाटिका त्यानंतर वर्ग 1 ते 2 वय वर्षे 6 ते 8
 • दुसरा टप्पा – पूर्व माध्यमिक व माध्यमिक – वर्ग 3 ते 5 वय वर्षे 8 ते 11 आणि वर्ग 6 ते 8 वय वर्षे 11 ते 14.
 • तिसरा टप्पा – उच्च माध्यमिक – वर्ग 9 ते 12 वय वर्षे 14 ते 18.
  अशा प्रकारचे काही बदल करण्यात आले आहे.

तर आजच्या या लेखात आपण थोडक्यात नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

तर अशाच नवनवीन माहितीसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

FAQ –

प्र. १. केंद्र सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण कोणत्या वार्षिक सत्रापासून सुरु झाले?

उ. 2022-23 या शैक्षणिक सत्रापासून.

प्र. २. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे?

उ. प्रत्येकास शिक्षण.

प्र. ३. तांत्रिक शिक्षणात कोणता विषय अनिवार्य राहणार आहे?

उ. कोडींग हा विषय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here