Onion Benefits
कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ – Onion Benefits in Marathi
कांद्याचे काही महत्वपूर्ण फायदे – Onion Benefits in Marathi खाली दिलेले आहेत.
- दुखणे, सुजणे व मासपेशी ताठरने ह्या व्याधी दूर करणे.
- कांदा पोटातील कृमी नष्ट करण्यास एक नैसर्गिक प्रतिजैविक मानले जाते.
- जठरातील फोड होऊ देत नाही, सोबतच अपचनाची समस्या, पोटातील वायू वाढणे ह्या समस्या दूर करतो.
- मूत्रवर्धक पाचक, संक्रमणाशी, टॉनिक आणि उत्तम उत्तेजक रुपात कांदा खाल्ला जातो.
- कोलेस्ट्रोल आणि उच्च रक्तदाब आणि इतर हृदयविकारात शरीरास बळ देतो.
- शरीरात गाठी होणे व कर्करोगास मदत करणाऱ्या तत्वांचा नाश करतो.
- रक्तास घट्ट करतो, रक्त शुद्ध करण्यास सहाय्यक ठरतो.
- कफ, सर्दी, तापापासून वाचवतो.
- शरीरातील रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रित करतो. दातांच्या सडण्यापासून वाचवतो.
कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ – Benefits of Onion in Marathi
१. बाळंत बाईने कांदा खाल्ल्यास स्तनात दुधाची वृद्धी होते.
२. खाण्यासोबत कच्चा कांदा खाणे आरोग्यदायी मानले जाते.
३. रोज कांदा सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
४. लाल कांदा सेवनामुळे निद्रानाश हि समस्या पूर्णपणे दूर केली जाते.
५. कांदा बारीक करून पिसून त्याच्यात शहद समप्रमाणात मिळवून त्यास कुत्रा चावलेल्या जखमेवर लावतात त्यामुळे जखम लवकर बरी होते. जैविक संक्रमण रोखले जाते.
६. 15 ml कांदा रस मोहरीच्या 10 ml तेलात मिळवून त्यात शहद २ चम्मच मिळवून दिल्यास सापाचे डसने बरे होते.
७. कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिळवून २-3 थेंब कानात टाकल्यास कानातील वेदना दूर होतात.
८. कांद्याच्या रस कपाळावर, पायाच्या व हाताच्या तळावर लावून कांदा रस ५० ml व शहद २ चम्मच मिळवून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.
९. केस काळे राहण्यासाठी कांदा रस आंघोळीच्या पाण्यात मिळवून त्याने डोके धुतल्यास केस काळे होण्यास मदत मिळते.
१०. रोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते.
११. लाल कांदा कापा. त्यावर निंबू रस चोळा व खाण्यात वापरा यामुळे अजीर्ण समस्या दूर होईल. लहान मुलांना कांदा रसाच्या ५-६ थेंबात शहद मिळवून दिल्यास त्यांच्या पोटाच्या कृमिचा नाश होतो.
१२. ६० ग्राम पांढरा कांदा कापून त्यात दही मिळवावे ताजे ताजे खावे. ४-५ वेळा खाल्ल्यास एसिडीटी चा त्रास होणार नाही.
Kandyache Fayde
१३. लहान मुलांमध्ये हगवणीच्या वेळी त्रास कमी करण्यासाठी नाभीवर लावल्यास २-3 वेळा परत लावल्यास हा त्रास कमी होतो.
१४. कांदा रसात गाडी साखर बारीक करून एकत्र करून उन्हात ठेवावे नंतर रोज सकाळी २ चम्मच हे मिश्रण कोमट पाण्यासोबत खावे. मूतखड्यापासून आराम मिळेल.
१५. कांद्याचा रस एका डबीत कापूस भरून त्यात ओतावा नंतर वेळोवेळी त्याचा गंध नाकाद्वारे घेत राहिल्यास अस्तमाचा त्रास कमी होतो.
१६. उष्माघातामुळे जर डोकेदुखी होत असेल तर कांदा रस काढून डोक्यावर त्याचा लेप लावावा. तळहात पायावर लावल्यास लवकर आराम मिळतो.
१७. रोज कांदा खाल्ल्यास दातांचे दुखणे कमी होते. दात ठणकत असेल तर कांदा पेस्ट ठणकेवर ठेवावे त्यामुळे आराम मिळेल.
१८. खाण्यात रोज कांदा वापरला तर हृदयासंबंधी बरेच विकार दूर होतील. शरीरात रक्ताचा पुरवठा योग्य गतीत करण्यास कांदा मदत करतो.
१९. कांद्याची पेस्ट त्वचारोगावर लावल्यास तो रोग बरा होण्यास मदत मिळते.
२०. कांदा रस उकडून त्यास त्वचेवर लावल्यास त्वचेवरील संक्रमण दूर होतात.
Kandyache Fayde
२१. कांदा फोडून प्रभावित नासिका समोर ठेवून जोरात श्वास घेतल्यास नाक फुटणे हि समस्या दूर होते.
२२. समान मात्रेस कांदा रस व अद्रकास मिळवून शहदा सोबत घेतल्यास उलटीची समस्या दूर होते.
२३. रक्तातील शुद्धता वाढवण्यासाठी १० ग्राम साखर व १ चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड ५० ग्राम कांदा रसात मिळवून घेतल्यास फायदा होतो.
२४. कांदा रसासोबत शहद घेतल्यामुळे सर्दी व कफ कमी होतो.
२५. गाठीतून पस येत असेल किंवा सुजली असेल तर कांदा बारीक करून गाठीवर लावल्यास आराम मिळतो.
२६. एक कांदा आगेत भाजून त्याचा गर पिसून त्यात थोड मीठ घालून पिल्यास पोटातील वायू कमी होतो.
वरील सांगितलेले उपाय कोणत्याही वैद्यकीय सल्ल्यावरून दिलेले नाहीत याकरिता कोणताही उपाय योजण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
कांद्याचे प्रकार – Types of Onion
साधारणतः कांद्याचे अनेक प्रकार भारतात आढळतात. त्यापैकी सुका पांढरा कांदा व लाल सुका कांदा हे प्रमुख प्रकार आहेत. कांदा हिरवा असतानाही खाण्यायोग्य असतो.
लाल कांदा:
हा बाहेरून लाल गुलाबी रंगाचा असतो. हा जात तिखट व तीव्र मानला जातो. हा कांदा कच्चा व शिजवून तसेच भाजूनही खाल्ला जातो. हा कांदा बरेच दिवस साठवता येतो.
पांढरा कांदा:
हा कांदा पांढरा असतो. हा कांद्याचा प्रमुख प्रकार आहे. हा लाल कांद्यापेक्षा कमी उग्र व थंड असतो. या कांद्याचा वापर कच्चा खाण्यात जास्त होतो. हाही आपण सर्व प्रकारे खाऊ शकतो.
हिरवा कांदा:
कांद्याचे रोपटे असते. मुळाशी कांदा व वर त्याची हिरवी पाल असते. हिवाळ्यात यास लोक खाण्यास जास्त पसंत करतात. हा पूर्णपणे ओला कांदा म्हणून ओळखला जातो. याचा खाण्यासाठी लोक जास्त वापर करतात. तळलेल्या पदार्थावर हा सलाद म्हणून वापरतात.
कांदा जर सरळ कच्चा खाल्ला गेला तर त्याचा फायदा सरळ मिळतो. जर ह्यास शिजवून किंवा तळून खाल्ल्याने यातील पोषके टिकून राहतात नाही. कांदा आपल्यास अत्यंत लाभदायी मानल्या जातो..
khup chaan mahiti milali . aabhari aahot.
Atishay upukt mahiti. Dhanyawad. Marathit asalyamule la lagech kalato.