टेस्टी आणि पौष्टिक “पालक पनीर” ची भाजी रेसिपी

Palak Paneer bhaji

मुलांना हिरव्या भाज्या खाऊ घालणे किती कठीण काम आहे हे त्या आईलाच माहित असते. तुम्ही कितीही समजुत घातली आणि कितीही पोषणमुल्यांचे महत्व समजवुन सांगितले तरीही मुलं आवडीने हिरव्या भाज्या खातील याची काहीही शक्यता नाही. मुलांना बटाटा जेवढा आवडतो आणि अगदी रोज जरी दिला तरी त्यांची तक्रार नसते पण तेच जर तुम्ही पालक किंवा मेथी खाउ घालाल तर मुल नाक मुरडतात.

मित्रमैत्रीणींना, लहान मुलांना चांगलं आणि पौष्टीकतेने परीपुर्ण खाउ घालणं तसं अवघडच काम आणि त्यातही पालक असेल तर मुलं आधीच नाकं मुरडतात. चला तर आम्ही तुमच्या या समस्येवर उपाय शोधलाय तो म्हणजे तुम्हाला घरबसल्या पालकपनीर ची रेसिपी सांगुन. पालक पनीर भारतीय हॉटेल्स मध्ये आढळुन येणारी एक प्रसिध्द डिश आहे. ही भारतीय डिश पालक आणि पनीर चा उपयोग करून बनवली जाते. आणि आपण मोठया आनंदाने या डिश चा आनंद घेतो.

टेस्टी आणि पौष्टिक पालक पनीर ची भाजी रेसिपी – Palak Paneer Recipe in Marathi

Palak Paneer Recipe in Marathi

Ingredients of Palak Paneer
पालक पनीरसाठी लागणारी सामग्री:

  1. पालकाच्या 4 जुडया बारीक चिरलेल्या
  2. 2 चमचे पेस्ट केलेले अद्रक
  3. बारीक केलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या
  4. 2 कप दुध
  5. 3 चमचे फेटलेली क्रिम
  6. 1 चमचा गरम मसाला पावडर
  7. 1 चमचा कोरडी मेथीची पानं (कसुरीमेथी)
  8. कापलेले पनीर
  9. 3 मोठे टोमॅटो मिक्सरमधुन काढलेले

Palak Paneer Recipe
पालक पनीर बनविण्याचा विधी:

पालकाला चांगले धुवुन घ्या. त्यानंतर उकळुन घ्या, हिरवी मीरची बारीक करून घ्या. पालकाला कमीत कमी 10 मीनीटे उकळुन घ्या, त्याला थंड होउ द्या, अर्धा मिनीटं मेथीच्या कोरडया पानांना तव्यावर परतुन घ्या. पानं जळायला नको, कढईत तेल गरम होउ द्या त्यात आल्याची पेस्ट परतुन घ्या.

त्यात टोमॅटो ची प्युरी टाका आणि तोपर्यंत परता जोवर तेल सुटत नाही. त्यानंतर त्यात पालकाची पेस्ट आणि कोरडी मेथी ची पानं मिसळा. त्यानंतर दुध टाका. नंतर चवीनुसार गरम मसाला पावडर आणि 3 चमचे क्रीम आणि कापलेले पनीर चे तुकडे टाका. चवीनुसार मीठ टाका आणि 10 मिनीटं शिजु द्या. सव्र्ह करण्या आधी त्यात 1 चमचा लोणी ईच्छा असल्यास टाका.

पालक पनीर ला गरम गरम पराठयांसोबत सव्र्ह करा.

तुमची चवदार पालक पनीर डीश तयार आहे.

Read More:

लक्ष्य दया: Palak Paneer – पालक पनीर रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here