पालक सूप बनविण्याची विधी

Palak Soup Recipe

आज आम्ही तुम्हाला पालक सूप/Palak Soup बनविण्याची विधी सांगणार आहोत. आजच्या काळात बरेच आरोग्याची काळजी करणारे लोक सूप खाणे पसंद करतात. विशेष रुपात जेव्हा थंडीचा व पावसाचा ऋतू असतो. तेव्हा सूप ह्यावेळी आणखीच चवदार लागतो.

Palak Soup Recipe

पालक सूप बनविण्याची विधी – Palak Soup Recipe In Marathi

चला तर मग जानुया पालक सूप कसे बनविले जाते. हे सूप आरोग्यासाठी फारच लाभदायक मानले जाते. तरीही बरेच जन सूप नापसंत करतात. लहान मुलांना सूप फार आरोग्यदायी असते. हे लवकर पचते आणि त्यातील पोषके पटकन मिळविले जातात.

पालकापासून बरेच डिशेस बनविले जातात. त्यापैकी पालकाचे सूप एक सुंदर पदार्थ मानले जाते.

पालकसूप बनविण्याचे साहित्य घरातच मिळते.

Ingredients of Palak Soup
पालक सूपसाठी लागणारी सामग्री :-

  • १.५ ते २ कप कापलेला पालक
  • १ ते ४ बारीक कापलेला हिरवा कांदा
  • ४-५ लसून पाकळ्यांना बारीक कापून
  • १ चम्मच बेसन
  • १ चम्मच जिरे पावडर
  • १ तेजपान
  • २ कप पाणी
  • १.५ चम्मच बटर
  • क्रीम
  • किसलेले पनीर
  • काळे मिरे बारीक पिसलेले
  • मीठ व हिरवा सांभार

Palak Soup Recipe
पालक सूप बनविण्याचा विधी:-

सर्वप्रथम धुतलेली व चिरलेली पालक फ्रीज मध्ये ठेवावी.

पॅनमध्ये १ चमचा बटर घेवून त्यात १-२ मिनिटे तेजपान तळ तळू द्या.

त्यात कापलेला लसण व कांदा बारीक कापलेला सोडा त्यांना जळू द्यायचे नाही. कांदा लसण हलके लाल होईपर्यंत भाजा यात फ्रीजमधील कापलेला पालक घाला. ४-५ मिनिटे लावत राहा. यात मीठ व काळे मीठ घाला यात बेसन घाला. १ मिनिट हे मिश्रण चांगले हलवा यात २ कप पाणी घाला. यातील तेजपान काढून घ्या.

हे मिश्रण गॅसवर चांगले उकडू द्या. ४-५ मिनिटे गॅस कमी तापावर ठेवा. त्यात वरून जिरपूड घाला हे मिश्रण चांगले घट्ट होत असल्यास गॅस बंद करा. ह्यात क्रीम टाकून चांगले ढवळा. यात थोडी १/२ चम्मच साखर घाला. हे थंड होऊन झाल्यावर ब्ल्यंडर मध्ये घालून याचा मुलायम पातळ असे सूप होऊ द्या. हे मिश्रण परत गॅसवर ठेवा यात काळ मीठ व बारीक काळे मीर पूड घाला. वरून किसलेल्या चीजने हे सजवा. थोड क्रीम हि ठेवा.

नोट:

यातील साखर पालकाचा रंग कायम ठेवतो. ताज्या पालकास जास्त वेळ शिजवू नका. तर मग स्वादिष्ट पालक सूप चा आनंद घ्या.

पालक सोबत क्रीम ठीक राहते परंतु आम्ही यात बेसन मिळविले आहे. याने ग्रेवी घट्ट होईल. काळी मिर पूड मुळे हे सूप थोड तिखट होईल.

हे सूप सरळ खाऊ शकता किंवा ब्रेड सोबतही खाण्यास मजा येते.

1 thought on “पालक सूप बनविण्याची विधी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top