पनीर ढोकला बनविण्याची रेसिपी

Paneer Dhokla

पनीर आणि पनीर पासुन बनवण्यात येणाऱ्या रेसिपी सर्वांनाच आकर्षीत करतात. हॉटेल मधे देखील पनीर च्या इतक्या रेसिपी आणि इतके प्रकार उपलब्ध असतात की विचारायलाच नको.

लहान मुलांमधे देखील पनीर खुप प्रिय असतं, इतर कोणत्याही भाज्यांना मुलं नाही म्हणतात पण पनीर ची भाजी म्हंटल विचारायलाच नको. पनीर पासुन बनणारे पदार्थ सर्व वयोगटातील लोक आवडीने खातात.

पनीर ढोकळा या पदार्थाला जास्त सजवण्याची गरज नाही कारण लहान मुलं सहज ढोकळयाला चटणीसोबत खातात. आणि म्हणुन तुमच्या मुलांकरता देखील पनीर चा ढोकळा एक छान डिश आहे. विशेषतः रात्री च्या जेवणात तुम्ही पनीर ढोकळा बनवु शकता.

 पनीर ढोकला बनवण्याची रेसिपी – Paneer Dhokla Recipe in Marathi

Paneer Dhokla

इन्स्टंट पनीर ढोकळा बनवण्याकरता लागणारी सामग्री – Ingredients of Paneer Dhokla

  • २ कप बेसन
  • दिड कप ताजे दही
  • १ टेबलस्पुन साखर
  • अध्र्या लिंबाचा रस
  • चिमुटभर हिंग
  • १ चमचा टिस्पुन सोडा बाईकार्बोनेट
  • ३ टेबलस्पुन तेल
  • अर्धा चमचा हळद
  • मीठ चवीनुसार

सजवण्याकरता:

  • ४ टेबलस्पुन साखरेचे पाणी २ टेबलस्पुन साखर आणि ३ टेबलस्पुन पाणी
  • किसलेले नारळ
  • २०० ग्रॅम बारीक किसलेले पनीर

फोडणीकरता:

  • ३ टेबलस्पुन तेल
  • अर्धा टिस्पुन मोहरी
  • ४ – ६ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • काही वाळलेल्या लाल मिरच्या

पनीर ढोकळा बनविण्याची विधी – Paneer Dhokla Recipe

बेसनात दही मीठ, साखर, लिंबाचा रस, हिंग, २ टेबलस्पुन तेल आणि हळद टाकुन घट्ट घोळ तयार करा. १५ मिनीटे तसाच राहु द्या. एका पॅनमधे १ टेबलस्पुन तेल आणि २ टेबलस्पुन पाणी टाकुन गरम करा, उकळी आल्यानंतर सोडा बाईकार्बोनेट टाका आणि तयार मिश्रणात हे मिश्रण टाकुन द्या.

तेल लावलेल्या भांडयात हे मिश्रण टाकुन वाफेवर शिजवा. थंड झाल्यानंतर साखरेचे पाणी टाका. छोटया छोटया आकारात कापुन घ्या. ढोकळयाच्या दोन तुकडयांमधे एक पनीर स्लाईस ठेवा. एका पॅन मधे तेल गरम करा. मोहरी, हिरवी मीरची आणि लाल मिरची टाकुन फोडणी तयार करा आणि ढोकळयावर पसरवुन टाका. किसलेले नारळ आणि कापलेली कोथींबीर टाकुन सजवा.

तर हि होती पनीर ढोकळ्याची रेसिपी आवडल्यास या लेखाला आपल्या परिवारात शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top