मुरुमांवर घरगुती उपाय

मुरूम / Pimples सामान्यपणे कधीही कुणाही मानसाला येऊ शकतात. मुरूम त्वचेची जळ जळ आणि सुजन यामुळे होतात. ज्यामध्ये त्वचेवर तेलाची मात्रा सुद्धा वाढत जाते आणि त्वचेवर सुज येऊ लागते.

त्वचेत तेलाचा स्त्राव जास्त झाल्यामुळे सुद्धा मुरुमाची समस्या होते. मुरूम साधारणपणे चेहरा, गळा, पाठ आणि खांद्यावर येतात. हे काही गंभीर समस्या नाही परंतु मुरूम माणसाला खूप त्रास देतात.

मुरुमांना ठीक करण्यासाठी बाज़ारात खूप लोशन आणि औषधे उपलब्ध आहेत परंतु यामध्ये मुरुमांना / Acne दूर करण्यासाठी खूप वेळ लागतो.यापेक्षा तुम्ही काही नैसर्गिक उपाय अवलंबून कमीत कमी वेळात मुरुमांपासून मुक्तता मिळवू शकता.

Pimplesमुरुमांवर घरगुती उपाय / Pimples Treatment At Home Marathi

मुरुमांपासून मुक्तता मिळविण्यासाठी 10 सोपे उपाय खाली दिलेले आहेत –

आइस (बर्फ) –

बर्फाचा उपयोग कमीत कमी वेळामध्ये त्वचेचे लालसरपण, सुजन आणि मुरूम कमी करण्यासाठी करू शकता. बर्फ प्रभावित जागेवर रक्त प्रवाहास विकसित करतो आणि त्वचेच्या गड्ड्यानाही भरून काढतो. आणि चेहऱ्यावरून धूळ आणि तेल हटवून चेहऱ्याला साफ़ करतो. तुम्ही बर्फाचे टुकडे किंवा बर्फ किसून हि उपयोग करु शकता.

 1. बर्फाच्या तुकड्यांना एका कपड्यामध्ये लपेटून घ्या आणि त्याला चेहऱ्याच्या प्रभावित भागावर हलक्या हाताने काही वेळ पर्यंत लावत रहा.
 2. लावल्यानंतर काही वेळ आराम करा आणि पुन्हा या प्रक्रियेस करा.

निम्बू / Lemon –

मुरुमांपासून मुक्तता मिळविण्यासाठी एक आणखी सोपा उपाय निम्बुच्या रसाचा उपयोग करू शकता, ज्यामध्ये विटामिन सी भरपूर असते. निम्बूचा रस कमीत कमी वेळामध्ये मुरुमास सुकवितो. परंतु लक्ष्यात ठेवा चेहरयाववर नेहमी ताज्या निम्बूच्या रसाचाच उपयोग करा, खूप दिवसापर्यंत डब्ब्यात बंद निम्बूचा रस वापरू नका. निम्बूच्या रसाचा उपयोग करण्याचे दोन प्रकार आहेत.

 1. निम्बू चा रस कापासामध्ये भिजवा आणि झोपायाच्या आधी मुरुमावर लावा.
 2. तुम्ही एक चमचा निम्बू च्या रसामध्ये एक चमचा दालचीनी पाउडरसुद्धा मिळवू शकता आणि त्याला मुरुमाच्या जागेवर लावून रात्रभर राहू द्या.
 3. सकाळी गरम पाण्याने चेहऱ्यास चांगल्या प्रकारे साफ करून घ्या. कोमल त्वचेसाठी हा उपाय जास्त लाभकारी नाही ठरणार.

चहाच्या रोपट्याचे तेल –

चहाच्या रोपट्याचे तेल मुरुमाना दूर करण्यासाठी खूप लाभदायक आहे.

यामध्ये सर्व एंटीबैक्टीरियल असतात जे त्वचेसाठी हानिकारक बैक्टीरिया सोबत लढू शकतील आणि त्वचेची रक्षा करू शकतील.

या सोबतच , आरामदायक तत्व म्हणजे मुरुमामुळे होणारा लालसरपणाही कमी करतो.

याच्या सोबतच हा काळी फुंसी आणि पांढरी फुंसी यालाही कमी करतो.

 1. चहाच्या रोपट्याच्या तेलामध्ये कापसाला पूर्णतः भिजवा आणि पुन्हा त्याला प्रभावित जागेवर लावा नंतर 15 ते 20 मिनीटमध्ये चेहऱ्याला साबण न लावता धुवून घ्या.
 2. किंवा चहाच्या रोपट्याच्या तेलाचे काही थेंब 1 चम्मच एलोवेरा जेल मध्ये मिळवा.
 3. तयार मिश्रणास मुरूम आणि डागावर लावा , 15 ते 20 मिनीट पर्यंत लावून ठेवल्यानंतर साबण न लावता स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

नोट – जर तुमची त्वचा कोमल असेल तर स्वच्छ आणि शुद्ध चहाच्या रोपट्याच्या तेलाचाच उपयोग करा.

टूथपेस्ट –

रोज़ सकाळी तुम्ही ज्या टूथपेस्ट चा उपयोग दात स्वच्छ ठेवण्यासाठी करता त्याचा उपयोग तुम्ही मुरूम ठीक करण्यासाठी सुद्धा करू शकता. जर बर्फाचा उपाय केल्यानंतर तुम्ही हा उपाय कराल तर हा खूप प्रभावशाली होईल. या उपायाला अंगीकारण्यासाठी तुमची टूथपेस्ट पांढरीच असावी , जेल टूथपेस्ट चा उपयोग करणे सोडा.

 1. झोपण्याआधी पांढरया टूथपेस्टला चेहऱ्याच्या प्रभावित भागावर हलक्या हातांनी लावा.
 2. सकाळी, आपल्या चेहऱ्याला पाण्यानी धुवून घ्या आणि धुतल्यानंतर आपल्याला आपल्या चेहरयावर याचा प्रभाव दिसून येईल.

जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या प्रक्रियेस दिवसाच्या वेळात पुन्हा करू शकता. परंतू लक्ष्यात ठेवा पांढरी टूथपेस्ट कमीत कमी अर्धा ते एक तासापर्यंत चेहऱ्याच्या मुरुमावर लावून ठेवायला पाहिजे.

बाष्प ( वाफ ) –

चेहऱ्याला वाफ देणे कधीही आपल्यासाठी लाभदायक होवू शकते , परंतु साधारणपणे मुरूम असलेल्या चेहऱ्यावर लाभदायक ठरतो.

वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील गड्डे उघडतात आणि तुमची त्वचा सहज श्वास घेवू शकते. यामुळे चेहऱ्यावर असलेले तेल ,बसलेली धूळ आणि हानिकारक बैक्टीरिया सुद्धा कमी होतात.

 1. कोण्या मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करा आणि पाणी पूर्णपणे गरम झाल्यानंतर चेहरयाला टॉवेल किंवा कोण्या मोठ्या कपड्याने झाकून घ्या काही मिनिटांपर्यंत वाफ घेत रहा.
 2. वाफ घेतल्यानंतर आपल्या चेहऱ्याला कोमट पाण्याने धुवून घ्या.

लसुन –

लसून एक एंटीवायरल, एंटीफंगल, एंटीसेप्टिक आणि एंटीओक्सिडेंट तत्व आहे जो चेहऱ्यावर मुरुमांना ठीक करतो. लसुनमधील सल्फर मुरुमांना ठीक करतो.

 1. ताज्या लसणाच्या 2 पाकळ्यांना दोन भागात कापा.
 2. यानंतर कापलेल्या पाकळ्यांना मुरुमाच्या भागावर घास आणि त्याला पाँच मिनीट पर्यंत राहू द्या आणि यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहऱ्याला धुवून घ्या.
 3. दिवसा खूप वेळा तुम्ही या प्रक्रियेस करू शकता.

रोज़ लसुनाची एक पाकळी खाल्ल्याने तुमचा रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तही स्वच्छं राहते.

परंतु जास्त प्रमाणात सुद्धा लसुनाचे सेवन करू नका कारण यामुळे आपल्याला पोटासंबंधी आजार होऊ शकतात.

बेकिंग सोडा / Baking Soda –

पिम्पल्स पासून मुकी मिळविण्याचा आणखी एक सोपा आणि घरगुती उपाय बेकिंग सोडा आहे, कारण यामुळे चेहरयाचे तेल कमी होते आणि चेहऱ्यावर लागलेली धूळ कमी होते आणि हा डेड स्किन सेल्स ला सुद्धा मारून टाकतो.

 1. 1 चमचा बेकिंग सोडयामध्ये थोडे पाणी आणि निम्बूचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.
 2. लावण्या आधी आपल्या चेहऱ्याला चांगल्याप्रकारे धुवून घ्या.
 3. आता घट्ट पेस्ट प्रभावित जागेवर लावा आणि लावल्यानंतर याला पूर्णतः सुकून जाऊ द्या. कधीही बेकिंग सोडयाला आपल्या चेहरयावर जास्त वेळेपर्यंत लावून ठेवू नका कारण यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
 4. 3. यानंतर आपल्या चेहऱ्याला हलक्या गरम पाण्याने धुवून घ्यावे.
 5. या प्रक्रियेस दिवसातून 2 ते 3 वेळा करा.

शहद / Honey –

शहद नैसर्गिक एंटीबायोटिक चा चांगला स्त्रोत आहे, ज्यामुळे आम्ही चेहऱ्यावर होणाऱ्या इन्फेक्शन ला कमी करू शकतो.

 1. कापसाच्या तुकडयांना शहदमध्ये चांगल्या प्रकारे भिजवा आणि सरळ त्याला प्रभावित जागेवर लावा आणि जवळपास अर्धा ते एक तासापर्यंत लावून ठेवावे.
 2. यानंतर कोमट पाण्याने चेहऱ्याला साफ़ करा.
 3. दिवसातून खूप वेळा या प्रक्रियेस करा.

काकडी –

काकडी मध्ये भरपूर प्रमाणात पोटेशियम आणि विटामिंस असतात जसे कि A, C आणि E याबरोबरच यामध्ये त्वचेस थंड करण्याचाही गुण असतो.

 1. एक किंवा दोन ताज्या काकडीला तुकड्यामध्ये कापून जवळपास एक तासापर्यंत पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
 2. यामुळे काकडीमधील आढळणारे पोषक तत्व, विटामिंस A आणि पोटेशियम पाण्यामध्ये स्थानांतरित होतात.
 3. यानंतर पाण्याला गाळून पिवून घ्यावे किंवा त्या पाण्याचा उपयोग तुमचा चेहरा धुण्यासाठी सुद्धा करू शकता.
 4. एका काकडीस किसून तुम्ही फेस मास्क सुद्धा बनवू शकता.
 5. या मास्कला आपल्या चेहऱ्यावर लावा आणि लावल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत सुकल्यानंतर चेहऱ्याला कोमट पाण्याने धुवून घ्यावे.
 6. यामुळे चेहऱ्याची धूळ स्वच्छं होवून जाईल आणि हानिकारक बैक्टीरिया सुद्धा दूर होवून जातील.

पपई –

पपई मध्ये मुरुमांना दूर करणारे खूप पोषक तत्व आहेत. त्याचबरोबर हे एंटीओक्सिडेंट, विटामिन A आणि एंजाइमचा सुद्धा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्याची मुरुमाची समस्या दूर होते. आणि चेहरा मुलायम आणि कोमल राहतो.

 1. पपईला तुकड्यामध्ये कापून किसा आणि त्याला मुरुमाच्या जागेवर लावावे.
 2. लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटापर्यंत राहू द्या आणि नंतर साबाणाशिवाय वापरलेल्या पाण्याने धुवून घ्यावे.
 3. याचा उपयोग करून तुम्ही प्रभावशाली फेस मास्क सुद्धा बनवू शकता, यासाठी आपल्याला पपईचे काही तुकडयामध्ये थोडेसे शहद टाकावे लागेल नंतर याचे मिश्रण बनवून याला आपल्या चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करा.
 4. यानंतर त्याला सुकेपर्यंत राहू द्या आणि सुकल्यानंतर साबण न वापरता धुवून घ्या.

वरीलप्रमाणे घरगुती उपायांना वापरून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये मुरुमापासून सुटका मिळवू शकता.

5 COMMENTS

 1. मला नाकावर व नाकाच्या कोपर्‍यावर खूप इन्फेक्शन होतायत मला हे खूप त्रासदायक ठरते यावर उपाय सांगा

 2. माझ्या चेहरयावर खूप मुरूम व डाग पडले आहे, हे काम करेल ना.
  धन्यवाद।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here