Benefits of Pineapple for Skin
सुंदर दिसावे असं कोणाला वाटत नाही? सर्वांनाच वाटत. आपण छान दिसाव, आपल्या दिसण्याचं कौतुक व्हावं ही भावना सहज सुलभ आणि चांगली भावना आहे आणि जो तो आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत असतो. खरतर छान दिसण हे थोडं नाही तर जास्त खर्चीक देखील होऊ शकतं आणि ते प्रत्येकाच्या खिशाला परवडेलच असं सुध्दा नाही पण जर छान सुंदर दिसण्याकरता काही घरगुती टिप्स् मिळाल्या तर?
आज प्रत्येकाला गोरी स्कीन हवी आहे आणि त्याकरता घरगुती टिप्स् चा शोध घेतल्या जातो. विशेषतः आजकाल मुलींच्या डोक्यावर गोऱ्या स्किनचे भुतच पसरलेले असते. बाजारात बरेच ब्युटी प्रोडक्ट्स विक्री करता उपलब्ध असतात परंतु त्यामध्ये असलेल्या केमिकलमुळे स्कीन चांगली होण्याऐवेजी आणखीन खराब होण्याची शक्यताच जास्त असते. आपल्या आजीबाईच्या बटव्यातील उपायच बरेचदा जास्त फायदेशीर असतात. मागील लेखात आम्ही तुम्हाला सौंदर्याकरता केळाचा उपयोग कसा करावा हे सांगितले, चला तर आज आम्ही आपल्याला असाच एक घरगुती उपाय सांगतो आहोत ज्यात एका फळाचा उपयोग आपण करणार आहोत.
आपल्याकडे पायनॅपल अर्थात अननस अगदी सहजतेने उपलब्ध होते, हे फळ फक्त खाण्याकरताच फायदेशीर नसुन याचे आणखीही फायदे आहेत. हे फळ तुमच्या सुंदरतेला वाढवण्यातही उपयोगी आहे. आणि याच्या वापराने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. अननसाचा ज्युस काढुन आपल्या फेस पॅक मध्ये मिसळुन चेहेऱ्याला लावा किंवा त्याचा पल्प काढुन चेहेऱ्याला थेट लावा. काही दिवसातच असर दिसायला लागेल. आणखीनही काही टिप्स ची माहिती घेऊया अननसाच्या बाबतीत.
पायनॅपल अर्थात अननसाच्या या उपयोग मुळे मिळावा सुंदर, नितळ त्वचा – Pineapple for Skin Whitening in Marathi

गोरी त्वचा मिळवण्याचे जबरदस्त उपाय – Benefits of Pineapple for Skin
१) हे फळ आपल्या चेहेऱ्यावरील ब्लॅकहेडस् आणि चेहेऱ्यावर पडलेले काळे डाग मिटवण्यास मदत करतं. नैसर्गिक पध्दतीने चेहेऱ्याला हिल करतं.
२) चेहेऱ्यावरील पुटकुळया आणि मुरूम घालवण्याकरता अननसाच्या रसाला फेसपॅक मधे मिक्स करून चेहेऱ्याला लावा. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थेट पल्प काढुन देखील मुरूमांवर लावु शकता चांगला रिझल्ट मिळतो. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहेरा धुवुन काढावा.
३) पायनॅपल मधे ब्लिचींग एजंट असतं ज्यामुळे चेहेरा स्वच्छ होतो.
४) ज्यामुळे ईम्युनिटी अर्थात प्रतिकार शक्ती वाढते असे व्हिटामीन सी आणि अँटीऑक्सिडंट पायनॅपल मध्ये असतं यामुळे मृत त्वचा निघुन जाते. याला लावण्याचा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे पायनॅपल च्या तुकडयाला किसुन त्यात लिंबाचा रस मिसळुन हलक्या हाताने चेहेऱ्याला लावा.
५) एका वाटीत एक टिस्पुन पायनॅपल पल्प आणि २ टिस्पुन मीठ आणि १ टिस्पुन मध घालावे. हा स्क्रब तेलकट चेहेऱ्याकरता खुप फायदेशीर आहे. तेलकट त्वचेकरता स्क्रब पायनॅपल मध्ये मोठया प्रमाणात व्हिटामीन सी असतं. आणि याला आठवडयात एकदाच लावावे.
मित्रांनो हा होता पायनॅपल अर्थात अननसाचा उपयोग जो आपल्या आरोग्यासोबतच नैसर्गिक सौंदर्यातही वाढ करतो. हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या चेहेऱ्याचा ग्लो आणखीन वाढवा. अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझीमराठी सोबत. आम्हाला आशा आहे की हे उपाय तुम्हाला नक्की आवडतील. आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!