Saturday, June 3, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

पिझ्झा बनविण्याची रेसेपी | Pizza Recipe In Marathi

Pizza – पिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं. मित्रहो आपण नेहमी टि. व्ही वर पिझ्झाची जाहिरात पाहातो अन् आपल्यालाही तो खावा अशी ईच्छा असते. आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल नाही का? मग चला तर आपण आज शानदार पिझ्झा बनविण्याची रेसेपी जाणून घेणार आहोत.

पिझ्झा बनविण्याची रेसेपी – Pizza Recipe In Marathi

Pizza

Ingredients of Pizza
पिझ्झासाठी लागणारी सामग्री:

  • आटा
  • टमाटर
  • चीज

पिझ्झा बेससाठीची सामग्री

  • मैदा अडीच कप ( व्यक्तीनुसार 1 कप प्रती व्यक्ती )
  • सुखा ईस्ट ( किन्वन )
  • करडीचे तेल दिड चमचा
  • शहद
  • मिठ चविनुसार
  • इटालियन मसाला अर्धा चामचा ( बाजारात मिळतो )
  • पाणी ( कोमट ) 1 कप
  • सूजी 2, 3 चमचे

पिज्जा साॅस साठी आवश्यक सामग्री

  • कांदा – 1 चांगल्या प्रकारे बारीक कापलेला
  • लसूण – 3 – 4 पाकळया
  • टमाटर – 2 बारीक कापलेले
  • लाल मिरच्यांची चटणी अर्धा चमचा
  • साखर अर्धा चमचा
  • काळे मिरे पावडर अर्धा चमचा
  • सुकं जिरं अर्धा चमचा
  • टमाटर पल्प 1 कप
  • ताजी तुळस पानं . . . 2-3 पानं
  • स्वादानुसार मिठ

वरील थरासाठी

  • शिमला मिरची 1 बारीक कापलेली
  • ताजी तूळस पानं 2 – 3
  • मोजरेला चिज 50 ग्रॅम
  • पार्मेसन चीज 100 ग्रॅम

Pizza Recipe
पिझ्झा बनविण्याचा विधी:

सर्व प्रथम एका मोठया भांडयात मैदा, मिठ, इटालियन मसाला, साखर, मध, ईस्ट आणि करडीचे तेल सर्व मिसळून चांगले मिश्रण तयार करावे. या मिश्रणात हळूहळू 1 कप पाणी घालावं. त्याची चांगली घट्ट कणिक तयार करून घ्यावी. हे काही वेळ फ्रिज मध्ये ठेवा. नंतर त्यास बाहेर काढून परत चांगली मालीश करावी, करडीच्या तेलाने त्यांची मालीश करून 2 , 3 गोल बनवून घ्यावे. एका प्लास्टीक कव्हर च्या मदतीने या गोलांना पिझ्झाच्या आकारात हाताने पसरवा. लक्षात ठेवा की जास्त जाड नको व पातळ नको. त्यावर सूजी पसरवा त्यामुळे पिझ्झा कुरकुरीत होईल.

आता कूकी शीटवर हा कच्चा पिझ्झा ठेवा, तो पूर्णपणे झाकला गेला पाहिजे. त्यावरील किनारे करडीच्या तेलाने ब्रश करा. त्यानंतर 2 चमचे पिझ्झा साॅस पिझ्झा वर पूर्ण भागात पसरवा. यानंतर मोजरेला चीज किसून त्यावर शिंपडा.

पिझ्झा साॅस बनविण्याची विधी

मोठया भांडयात करडईचे तेल घ्या, मंद आचेवर गरम होवू दया. नंतर कापलेला लसुण, जिरे, कांदा काप, 5 मिनीटे परतून घ्या, त्यात कापलेले टमाटर टाका. 5 मिनीटं परत होउ दया, नंतर 5 , 10 मिनीटापर्यंत टमाटर चांगले होउ द्या. त्यानंतर त्यात टमाटर पल्प, मिरची पावडर, तुळस पाने टाकून चांगले तिव्र आचेवर होऊ द्या. नंतर थंड होउ दया. पिझ्झास पिझ्झा साॅस टाकून झाल्यावर त्यावर कापलेली शिमला मिरची, पार्मेसन चीज किसून व तुळशिची पाने कापून टाका व मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये 30 मिनीटां साठी होउ दया. नंतर बाहेर काढून गरमागरम खायला द्या.

टिप्स – Tips

  • आपण पिझ्झाच्या कणकेत लसूणही टाकू शकता.
  • पिझ्झाची कणिक बनवितांना त्यास 5 – 10 मिनीटे फ्रिज मध्ये ठेवा.
  • पिझ्झास वरील थरावर आपण आपल्या पध्दतीने सजवू शकता.
  • तयार पिझ्झा कणिक 3 – 4 दिवसापर्यंत फ्रिज मध्ये चांगली राहाते.
  • ओव्हन मध्ये जास्त वेळ ठेवून कूरकूरीत पिझ्झा तयार होवू शकतो.
  • पिझ्झाचा बेस बनविल्यानंतर ओव्हन मध्ये 5 मि. ठेवा नंतर काढून वरील सर्व पदार्थ टाकावे व परत ओव्हन मध्ये टाकावे.
  • पिझ्झा गरमागरम खावा.

लक्ष्य दया: Pizza Recipe in Marathi – पिझ्झा बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Previous Post

मार्टिन लूथर किंग चे भाषण | Martin Luther King Speech

Next Post

साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography

Editorial team

Editorial team

Related Posts

Seviyan Kheer Recipe in Marathi
Recipes

“शेवयांची स्वादिष्ट खीर रेसिपी”

Seviyan Kheer Recipe in Marathi शेवयांची खीर हीशेवया  एक भारतीय दिश आहे जी दुध आणि शेवळ्यापासून बनते. भरपूर सारे ड्रायफ्रुट...

by Editorial team
April 29, 2021
Khandoli Recipe in Marathi
Recipes

खांडोळीची भाजी बनविण्याची रेसिपी

Khandoli chi Bhaji मराठवाडा म्हणजे खाण्यासाठी खास आणि त्यात खांडोळीची भाजी सुटलनं तोंडाला पाणी. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मराठवाड्यातील खास...

by Editorial team
September 21, 2020
Next Post
Sakshi Malik

साक्षी मलिक एक फ्रीस्टाईल कुस्तीपटू | Wrestler Sakshi Malik Biography

P. V. Sindhu

बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिन्धू

Barack Obama Speech

बराक ओबामांचे नोबेल पुरस्कार स्विकारतांनाचे भाषण | Barack Obama Speech

Eiffel Tower

एफिल टॉवर चा इतिहास | Eiffel Tower History Information in Marathi

Besan Sev Recipe

बेसन शेव बनवायची विधी | Besan Sev Recipe

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved