आपल्या सर्वांनाच वाटत कि आपल स्वतःच घर असाव, पण हे इतक सोप्प आहे अस वाटत नाही, खास करून जेव्हा आपण शहरी भागात राहतो. पण जर सरकार ची योजना तुम्हाला तुमच्या स्वप्नातल घर मिळवून देण्यात मदत करत असेल, तर किती आधार होईल न?
तुम्ही कदाचित प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल तर ऐकल असेल. तशीच प्रधानमंत्री आवास योजना अर्बन(शहरी), PMAYU हि आहे, आणि ह्या योजने अंतर्गत तुम्हाला सरकार तर्फे आपल्या स्वतःच्या घरासाठी मदत मिळू शकते. आता ती मदत कशी आणि कोणाला मिळेल, नेमकी योजना काय आहे, किवां काय लाभ मिळतील, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAYU)
योजनेचे नाव – प्रधानमंत्री आवास योजना शहरी(PMAYU)
प्रधानमंत्री आवास योजना काय आहे?
PMAYU ही एक सरकारी योजना आहे, ज्यात शहरी भागातील गरीब आणि मध्यम वर्गाचे लोकांना आपल्या स्वतःच्या घर घेण्यासाठी किवां बांधण्यासाठी मदत मिळते. हि योजना २०१५ मध्ये सुरू झाली आणि त्यात EWS (Economically Weaker Section), LIG (Low Income Group), MIG I (Mid Income Group 1) आणि MIG II (Mid Income Group 2) यांच्या आय वर्गांसाठी विविध लाभ उपलब्ध आहेत. ही योजना शहरी भागातील सर्व लोकांना घर मिळवण्याच्या हिशोबांनी तयार केलेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
ही योजने मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले पात्रता मापदंड आवश्यक आहेत:
- तुम्हाला आधी कुठल्याही सरकारी योजनेमध्ये घराची मदत मिळालेली नसली पाहिजे.
- तुमच लग्न झाल असेल तर तुम्हाला एकच घर मिळणार.
- तुम्ही EWS, LIG, MIG I किवा MIG II या आय वर्गात असले पाहिजे.
- आपल्या कुटुंबात कोणाकडे हि देशातील कुठल्याही भागात पक्के घर नसले पाहिजे.
- तुम्हाला आपल्या कुटुंबाचा सर्व सदस्यांचा आधार नंबर सबमिट करावे लागेल.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ह्या योजने साठी तुम्हाला खालील पद्धतीनुसार ऑनलाइन अर्ज करायचा आहे:
- सर्वात प्रथम, PMAY Urban ची अधिकृत वेबसाइट https://pmaymis.gov.in/ वर जा, आणि लॉगिन करा.
- Citizen Assessment मध्ये Slum Dwellers किवा Benefits ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला आधार नंबर साठी विचारेल, तर तुमचा आधार नंबर आणि नाव एंटर करा.
- नंतर बाकीचे डिटेल्स भरा, आणि सबमिट करा.
- आपल्या अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी तुम्ही Track your Assessment Status या ऑप्शनचा वापर करू शकता.
जस तुम्ही पाहूच शकता, कि अर्ज करण अतिशय सोप्प आहे, आणि अगदी सहज भरण्यासाठी हा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र
ह्या योजने साठी खालील प्रमाणे कागदपत्रे सबमिट करावी लागतात, किव्हा महत्वाची असतात:
- आधार कार्ड
- इनकम प्रमाणपत्र
- बँक खात्याचे डीटेल्स
- पॅन कार्ड
- जातीच प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- जमीन किंवा घराचे कागदपत्र(जर लागू असेल तर)
प्रधानमंत्री आवास योजनेचे अंतर्गत लाभ
ह्या योजनेमध्ये तुम्हाला खालीलप्रमाणे लाभ मिळतील:
- तुम्हाला घर घ्यायला किवा बांधायला कर्ज मिळेल आणि त्यावर व्याज अनुदान मिळेल.
- EWS आणि LIG वर्गासाठी ६.५%, MIG I साठी ४% आणि MIG II साठी ३% व्याज अनुदान मिळेल.
- तुमच्या घराचा जास्तीतजास्त कारपेट क्षेत्र EWS साठी ३० चौ.मी., LIG साठी ६० चौ.मी., MIG I साठी १६० चौ.मी. आणि MIG II साठी २०० चौ.मी. असेल.
- तुम्हाला घरातील ग्राउंड फ्लोर वर प्रिफरेन्स मिळेल जर तुम्ही वयोवृद्ध किवा विकलांग असाल तर.
- घर बांधण्यासाठी इको-फ्रेंडली आणि सस्टेनेबल टेक्नॉलॉजी चा वापर केला जाईल.
- तुम्हाला घरात पाणी, विद्युत, आणि गॅसची कनेक्शन मिळेल.
PMAYU ही एक चांगली आणि उपयुक्त योजना आहे, ज्यात तुम्हाला आपल्या स्वप्नांचे घर मिळविण्यासाठी सरकारी तर्फे मदत करण्यात येते. ही योजना तुमच्या आर्थिक आणि सामाजिक दृष्टिने सुधारण्यासाठी संधी देते आहे. तुम्ही योजनेची पात्रता पूर्ण करता असाल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करून तुम्हाला मिळणारे लाभ घेऊन घर मिळवा.
महत्वाची सूचना: योजनेमध्ये बदल होऊ शकतात, म्हणूनच योजनेमध्ये अर्ज करण्या पूर्वी योजनेशी संबंधित अधिकृत दस्तावेज लक्षपूर्वक नक्की वाचा.