Home / Recipes / साबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi

साबुदाणा वडा बनविण्याची विधी | Sabudana Vada Recipe in Marathi

Sabudana Vada – साबुदाणा वडा ज्याला सागोवडा सुद्धा म्हटले जाते. साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाहार आहे. उपवासाच्या दिवसात महाराष्ट्रात विशेषतः नवरात्री महोत्सवात साबुदाणा वाडे बनवले जातात.

Sabudana Vada

साबुदाणा वडा बनविण्याची विधी – Sabudana Vada Recipe in Marathi

साबुदाणा वडा इतर वड्याप्रमाणे असतो फक्त हा साबुदाण्या पासून बनविला जातो. साबुदाणा वडा बनविण्यासाठी आधी साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवावा लागतो आणि आलू उकडून घ्यावे लागतात.

यास बनविणे फार सोपे आहे यास बनविण्यासाठी जास्त प्रक्रिया करावी लागत नाही. चला जाणुया साबुदाणा वाडे कसे बनवायचे.

Ingredients of Sabudana Vada
साबुदाणा वड्यासाठी लागणारी सामग्री :-

1. साबुदाणा – 400 ग्राम ( रात्रभर भिजवून ठेवा )
2. उकडलेले व गरास एकजीव केलेले आलू – 2
3. शेंगदाणे भाजून – 100 ग्राम ( बारीक पावडर करून )
4. हिरव्या मिरच्या – 2-3 ( बारीक कापून )
5. साखर – 1 चमचा
6. मीठ – गरजेनुसार
7. निम्बुरस – 1 चमचा
8. तळण्यासाठी तेल – गरजेनुसार

Sabudana Vada Recipe
साबुदाणा वडा बनविण्याचा विधी:-

सर्व प्रथम आलू उकडून घ्यावे आणि त्याचा गर एकजीव करून प्याची पेस्ट बनवावी. साबुदाणा रात्रभर बिजावून ठेवावा नंतर त्यास नरम झाल्याची तपासणी करून घ्यावी.

आता एक भांड्यात साबुदाणा, आलूचा गर, मिरच्या कापून, साखर, मीठ व शेंगदाण्याचे कुट एकत्र करून मिश्रण बनवून घ्या.

नंतर वड्याच्या आकारात गोल गोळे तयार करून घ्या.

एका बाजूने गैस वर कढईत तेल गरम होऊ द्या, नंतर आपल्या तळ हाताला थोड तेल लावून साबुदाण्याच्या मिश्रणाचे बनविलेले गोळे दोन्ही तळ हाताच्या मधात दाबून वडए बनवा आणि तेल गरम झाल्यास त्यामध्ये एक एक करत सोडा हलके हलके डीप फ्राय करा.

एक लक्षात ठेवा वाडे तळतांना गैस कमी करावा त्यामुळे तुमचे वडे कुरकुरीत होतील. थोडे सोनेरी रंगाचे झाल्यास काढून टिशू पेपर वर ठेवावे. त्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघून जाईल.

तुमचे साबुदाण्याचे वडे तयार आहे गरम गरम खायला द्या. हे वडे तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खायला देवू शकता.

लक्ष्य दया: साबुदाणा वडा – Sabudana Vada रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

About Editorial team

Check Also

Chicken Biryani

घरच्या घरी रेस्टॉरंट सारखी चिकन बिरयानी बनविण्याची विधी | Chicken Biryani Recipe

Chicken Biryani खवय्येगिरी करता आपला भारत फार प्रसिध्द आहे वेगवेगळया प्रांतातील पक्वान्न बनवुन त्यावर ताव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *