जर तुम्ही स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात SAIL मध्ये काम करू इच्छिता, तर तुमच्या साठी एक चांगली संधी आली आहे. SAIL मध्ये काही जागा निघाल्या आहेत ऑपरेटर-कम-टेकनिशियन साठी, तर तुम्ही वेळ राहता अप्लाय करू शकता, आणि SAIL मध्ये काम करण्याच आपल स्वप्न पूर्ण करू शकता.
SAIL मध्ये ११० जागांसाठी भरती! जाणून घ्या कोण आहे पात्र, आणि कसा करायचा अर्ज?
भरती करणारी संस्था / कंपनीचं नाव : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL)
जाहिरात क्रमांक / सूचना क्रमांक: जाहिरात क्र. 08/2023
एकूण रिक्त जागा: 110
पदाचं नाव:
- ऑपरेटर-कम-टेकनिशियन (बॉयलर ऑपरेटर),
- ऑपरेटर-कम-टेकनिशियन (इलेक्ट्रिकल सुपरवायझर),
- अटेंडंट-कम-टेकनिशियन (ट्रेनी)
पात्रता:
- ऑपरेटर-कम- टेकनिशियन (बॉयलर ऑपरेटर):
शिक्षण: मॅट्रिक व प्रमाणित शासकीय संस्थेतील (फुल टाईम) 03 वर्षांचे डिप्लोमा मॅट्रिकुलेशन आणि मॅकेनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल / पॉव्हर प्लांट / प्रोडक्शन / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग डिसिप्लिनमध्ये.
अनुभव: फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र. - ऑपरेटर-कम-टेकनिशियन (इलेक्ट्रिकल सुपरवायझर):
शिक्षण: मॅट्रिक आणि शासकीय प्रामाणिकी विद्यापीठातील (फुल टाईम) 03 वर्षांचे डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये.
अनुभव: प्रमाणित इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र (मायनिंग) आणि कमीत कमी 01 वर्षाचा अनुभव ह्यामध्ये हवा – HT/LT सिस्टम / इन्स्टॉलेशन, HT/LT मशिनरी, उपकरणे आणि गॅजेट्स इन्स्टॉलेशन, संचार लाइन्स, केबल्स, ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर्स, पॅनल्स, स्विच बोर्ड आणि त्यांचे संबंधित सहाय्यक उपकरणे. - अटेंडंट-कम- टेकनिशियन (ट्रेनी):
शिक्षण: मॅट्रिक व सरकार मान्य विद्यापीठातील ITI (फुल टाईम) Electrician / Fitter / Electronics / Machinist / Diesel Mechanic / Computer Operator & Programme Assistant (CoPA) / Information Technology (IT).
वय मर्यादा:
- ऑपरेटर-कम- टेकनिशियन (बॉयलर ऑपरेटर): १८ ते ३० वर्षे
- ऑपरेटर-कम-टेकनिशियन (इलेक्ट्रिकल सुपरवायझर): १८ ते २८ वर्षे
- अटेंडंट-कम-टेकनिशियन (ट्रेनी): १८ ते २८ वर्षे
कामाचे ठिकाण:
राउरकेला स्टील प्लांट (RSP) किंवा ओरिसा ग्रुप ऑफ मायन्समध्ये (i) बोलाणी ओअर मायन्स (BOM) (ii) बरसुआन आयरन मायन्स (BIM) आणि (iii) काल्टा आयरन मायन्स (KIM).
अर्ज शुल्क:
- ऑपरेटर-कम- टेकनिशियन (एस-३): सामान्य/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹500/- आणि SC/ST/PwBD/ESM/विभागीय उमेदवारांसाठी ₹150/-
- अटेंडंट-कम-टेकनिशियन(ट्रेनी): सामान्य/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹300/- आणि SC/ST/PwBD/ESM/विभागीय उमेदवारांसाठी ₹100/-
अर्जाची शेवटची तारीख आणि वेळ: 16/12/2023
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सुरुवातीची तारीख: 20/11/2023
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख: 16/12/2023
- कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT)साठी तारीख, वेळ आणि स्थान: प्रवेश पत्र आणि ईमेल/एसएमएस/SAIL वेबसाइटद्वारे सूचित केल्याजाईल।
अप्लाय कस करायच?
तुम्हाला SAIL मध्ये अप्लाय करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरायला लागेल, ते हि SAIL च्या अधिकृत वेबसाइट www.sail.co.in च्या “career” पेज वर, किवां www.sailcareers.com वर जाऊन. इतर कुठल्या हि मार्गाने फॉर्म भरू नये.
ह्या गोष्टी लक्षात ठेवा:
- तुमच्या कडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असावे, जो एक पुढे एक वर्ष तरी चालू राहील.
- तुमच्या कडे लेटेस्ट पासपोर्ट साईजची कलर फोटो आणि तुमच्या सिग्नेचरची डिजिटल फोटो असावी, जे फॉर्म सोबत अपलोड करायला लागेल.
- तुम्ही ऑनलाइन पेमेंट करा नेट बँकिंग / क्रेडिट कार्ड / एटीएम-कम-डेबिट कार्ड माध्यमाने.
- फॉर्म भरताना सर्व लक्षपूर्वक वाचून घ्यावे आणि सर्व माहिती भरावी. तुमचा पात्रता मापदंड पूर्ण झाला तरच फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्ही सिस्टम जेनरेटेड अॅप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा आणि अॅप्लिकेशन आयडी / नंबर ठेवा.
लक्षात ठेवा, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे: १६/१२/२०२३
अर्ज करण्याकरीता काही टिप्स
अर्ज करण्याकरिता काही टिप्स, ज्या तुमच्या कामात येतील. ह्या टिप्स ला नेहमी लक्षात ठेवा –
- अप्लिकेशन साठी शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, आधीच अप्लाय करा, वेळेवर अडचण होऊ शकते.
- अर्जात आपल्या योग्यता, अनुभव आणि उद्देश यांचा स्पष्ट आणि संक्षिप्त वर्णन करा.
- आपल्या संपर्काची माहिती, साक्ष्यांची प्रती आणि कोणतीही इतर मागणी असल्यास पूर्ण करा.
- अर्जात आपल्या शिक्षणाच्या आणि कामाच्या प्रमाणपत्रांची कॉपी जोडा, जर आवश्यक असेल तर.
महत्वाची Note: अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात नक्की आणि लक्षपूर्वक वाचा, आणि मगच पाऊल उचला आणि निर्णय घ्या. तुमच्यापर्यंत माहिती पोहचवणं हे आमच कर्तव्य आहे.
जाहिरात लिंक : इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: इथे क्लिक करा