Sambar Recipe
सांबर सर्वत्र भारतात पसंत केली जाणारी डिश आहे. ही दक्षिण भारतीय डिश आहे. चला तर जाणुन घेउया सांबर कसे बनवायचे. सांबर, ईडली, डोसा, वडा, उपमा आणि दक्षिण भारतीय पक्वान्नासोबतही खायला चांगले वाटते.
घरच्याघरी झटपट टेस्टी सांबर रेसिपी – Sambar Recipe in Marathi
Ingredients of Sambar
सांबरा साठी लागणारी सामग्री:
- 100 ग्रॅम तुरदाळ
- शेवग्याच्या शेंगा 2 ( बारीक तुकडे)
- 4, 5 भोपळयाचे तूकडे
- 50 ग्रॅम तेल
- 1 चमचा मोहरी
- 6, 7 गोडनिम
- 2 चिमुट हिंग
- 1, 2 कापलेले टोमॅटो
- 8 लहान कांदे
- 2 चमचे चिंचेची चिंचोणी
- 3 चमचे सांबर मसाला
- 2 चमचे मिरची पावडर
- 1 चमचा हळद पावडर
- स्वादानुसार मिठ
- कापलेली हिरवी कोथींबीर
Sambar Recipe
सांबर बनविण्याचा विधी:
सर्वप्रथम तुरदाळ धूवून कुकरमध्ये 4, 5 शिट्टया देवून उकळुन घ्या. कढईत तेल गरम करा त्यात मोहरी, गोडनिम, आणि हिंग टाकुन मंद आचेवर होऊ द्या.
त्यात टोमॅटो टाका व 2, 3 मिनीटे उष्ण आचेवर होऊ दया. त्यात भोपळा व शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घाला व त्यांना होईपर्यंत होऊ द्या त्यात चिंचेचे पाणी मिठ सांबर मसाला, लाल तिखट, हळद टाकुन 1, 2 मिनीटे होउद्या.
त्यात उकडलेली डाळ सोडा व 5, 10 मिनीटे होऊ दया. वरून ताजा कापलेली कोथिंबीर टाकुन सजवा.
Read More:
लक्ष्य दया: Sambar – सांबर रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्