आपण बरेच जणांकडून ऐकले असेल कि घरी समोसे बनविणे फार कठीण काम आहे.परंतु आपण आम्ही सांगितलेल्या कृती प्रमाणे तुम्ही घरीच चविष्ट समोसे – Samosa बनवू शकता. चला तर जाणुया कि समोसे बनविण्याची विधी.
समोसे बनविण्याची विधी – Samosa Recipe in Marathi

Ingredients of Samosa
समोस्यासाठी लागणारी सामग्री:
आवरणासाठी
- मैदा – 100 ग्रम
- जीर – ½ चमचा
- तेल – 1 चमचा
- मीठ – स्वादानुसार
आलू भरण्यासाठी सामग्री
- कांदा – 1 (बारीक चिरलेला)
- हिरव्या मिरची – 2-3 (बारीक चिरलेला)
- अद्रक पेस्ट – 1 चमचा
- कोथिंबीर – गरजेनुसार
- आलू – 4-5 (उकडलेले)
- हळद पावडर – ½ चमचा
- धणेपूड – 1 चमचा
- जिरे पावडर – 1 चमचा
- तेल – आवश्यकतानुसार
Samosa Recipe
समोसा बनविण्याचा विधी:
समोस्याचे बाहेरील आवरण आधी बनवु या.
सर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
मसाला बनविण्याची विधी
आळूची साल काढून त्याच्या गरास चांगले बारीक करून घ्या. कढईत तेल घेवून त्यात कांदा, जीर, अद्रक पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या होऊ द्या व त्यात आलूचा गर घाला. 2-3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून होऊ द्या. नंतर 5 मिनिटांनी काढून घ्या. थंड होऊ द्या.
आट्याच्या पुरयामध्ये आलूची चटणी भरा व समोस्याचा आकार देवून तयार करावे. कढईत तेल घेवून त्यात हळूहळू समोसे टाका व तपकिरी रंगाचे होई पर्यंत तळा व गरमागरम खायला द्या.
लक्ष्य दया: Samosa Recipe in Marathi – समोसे बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
एकदम झकास सोपी रेसिपी मी नक्की बनवणार टेस्ट करायला ये मग