Shev puri – शेवपुरी हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. तुमच्याही तोंडाला पाणी आले कि नाही मित्रहो शेवपुरी आपण बाजारात जावून खातोच पण जर ती घरी बनविता आली तर किती मजा येईल नाही, चला तर आज आपण घरीच शेवपुरी कशी बनवायची ते जाणुया,
शेवपुरी बनविण्याची विधी – Shevpuri Recipe in Marathi

Ingredients of Shev puri
शेवपुरीसाठी लागणारी सामग्री:
- १० – २० मैद्याच्या छोट्या पुऱ्या ( बाजारात तयार मिळतात )
- २५ ग्रम बारीक शेव
- 1 – 2 उकडलेले बटाट्याचा गर
- 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा
- सांभार कापून (गरजेनुसार )
- 1 छोटा कांदा बारीक कापून
- स्वादानुसार मीठ
- काळे मीठ १/२ चमचा
- चिंचेचे पाणी 2 चमचे
- हिरव्या कांद्याची पात ( बारीक चिरलेली )
Shev puri Recipe
शेवपुरी बनविण्याचा विधी:
सर्व प्रथम बटाट्याच्या गरात हिरव्या मिरचीचा ठेचा, कापलेला कांदा, मीठ, काळे मीठ, सांभार टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
प्लेट मध्ये पुऱ्या घेवून त्याला वरून छिद्र पाडून त्यात आलूचे मिश्रण घाला त्यावर चिंचेचे पाणी व बारीक शेव घालून त्यास सजवा त्यावर बारीक चिरलेला हिरव्या कांद्याची पात टाका व चटपटीत शेवपुरी खायला द्या.
टीप
- शेव नेहमी ताजी आहेत कि नाही याची खात्री करूनच खरेदी करावे.
लक्ष्य दया: Shev puri Recipe in Marathi – शेवपुरी बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्