• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, August 19, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Information

“नरकात जाने परवडले पण उत्तर कोरिया मध्ये नाही.”

 

 

Shocking Facts about Korea

शीर्षक वाचल्यावर आपण चकित झाले असणार कि, असे कसे नियम आहेत उत्तर कोरिया चे, ज्यांची तुलना नर्कासोबत केल्या गेलेली आहे !

हो मित्रहो पृथ्वीवरील नर्कच आहे उत्तर कोरिया, तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया त्या धक्कादायक नियमांविषयी ज्यांचे उत्तर कोरिया मध्ये कठोरपणे पालन करावेच लागते. आणि त्या नियामंचे पालन केल्या गेले नाही तर तेथील नागरिकांना शिक्षेच्या स्वरुपात मरण सुद्धा पत्करावे लागते.

या नियमांना वाचल्यानंतर आपल्याला नशीबवान असल्याची अनुभूती येईल कि, आपला जन्म अश्या देशात झाला ज्या देशात लोकशाही लागू आहे. आपल्याला एवढ व्यक्तीस्वातंत्र्य आहे कि आपण मोकळेपणाने आपल्या देशात काहीही करू शकतो तसेच कसेही वागू शकतो. तरीही आपल्या देशात काही असे लोक आहेत जे आपल्या देशाच्या व्यवस्थेमुळे नाखूष आहेत, आणि देश सोडून जायच्या गोष्टी करत असतात. अश्या लोकांनी आजचा लेख आवर्जून वाचायला हवा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल कि, किती सुखी आहोत आपण इतरांपेक्षा!

“नरकात जाने परवडले पण उत्तर कोरिया मध्ये नाही.” – Shocking Facts about Korea

Shocking Facts about Korea
Shocking Facts about Korea

१) आपली कंपनी शनिवार ला सुद्धा आपल्याजवळून काम करून घेते का? तर उत्तर असेल होय! वाईट वाटते ना!

आपण विचार करत असाल कि ह्यात नवीन काय, तर मित्रहो उत्तर कोरिया मध्ये शनिवारच नाही तर रविवारी सुद्धा काम करावे लागतं. म्हणजेच आठवड्याला सातही दिवस कामच करावे लागतं.

तिथे सहा दिवस स्वतःसाठी तर एक दिवस आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी काम करावे लागतं.

२) तुम्हाला हजारो TV चॅनल असून सुद्धा योग्य माहिती मिळत नाही का? मग हे वाचा.

आपण हि गोष्ट जाणून आश्यर्यचकीत होणार कि उत्तर कोरिया मध्ये फक्त ३ TV चॅनल्स आहेत, आणि तेही फक्त त्यांच्या सरकारने लावलेले.

त्यामागचे कारण असे आहे कि उत्तर कोरिया चे सरकार त्यांच्या जनतेला बाहेरच्या जगाची माहिती न मिळावी यासाठी त्यांनी त्यांच्या जनतेला जगापासून दूर ठेवले आहे.

३) चारचाकी गाडी घ्यायची सुद्धा परवानगी नाही !

हो खरच ! उत्तर कोरिया मध्ये आपण चार चाकी गाडी सुद्धा विकत घेऊ शकत नाही. इथे फक्त सरकारी नोकर, तसेच ऑफिसर लोक स्वतःजवळ चार चाकी गाडी ठेऊ शकतात. कोणत्याही सामान्य माणसाला इथे स्वतःजवळ गाडी ठेवण्याची परवानगी नाही.

४) आपले इंटरनेट हळू चालतेय का ?

आपले इंटरनेट हळू चालत असले तर आपल्याला अस्वस्थ वाटते, विचार करा जर इंटरनेटच नसले तर !

हो मित्रहो उत्तर कोरिया मध्ये सामान्य जनतेसाठी इंटरनेट ची सुविधाच उपलब्ध नाही.

यामागचे कारण असे आहे कि तेथील जनतेला जगापासून दूर ठेवण्यासाठी तेथील सरकारने असे नियम जनतेवर जबरदस्ती लादले आहेत.

५) आपण शाळेत जगाचा इतिहास शिकले आहे ना ?

मित्रांनो आपण जेव्हा शाळेत असणार तेव्हा आपण आपल्या देशाचा तसेच सोबत पूर्ण जगाचा इतिहास वाचला असेल आणि शिकले सुद्धा असणार.

परंतु उत्तर कोरिया मध्ये तेथील लोकांना कोणत्याही बाहेरील देशाचा किंवा जगाचा इतिहास शिकविल्या जात नाही.

तेथे फक्त तेथील तानाशाह किम जोंग पहिला आणि किम जोंग दुसरा यांचाच इतिहास शिकविल्या जातो.

तेथील सरकारला बाहेरील जगाचे काहीही घेणे देण नाही.

६) उत्तर कोरिया सरकार ने लावले आहेत प्रत्येक घरी सरकार नियंत्रित रेडीओ.

आपल्या भारतात आपण जसे वाटेल तसे करू शकतो. परंतु उत्तर कोरिया मध्ये तसे नाही.

त्यांच्या इथे प्रत्येक नागरिकाच्या घरी तेथील सरकार ने स्वतः सरकारचे रेडीओ लावलेले आहेत जे फक्त तेथील सरकार च्या आणि उत्तर कोरीया च्या विकासाविषयी सांगत असतात.

तसेच कोणत्याही नागरिकाला परवानगी नाही कि ते त्यांच्या घरचे रेडीओ बंद करतील.

७) अश्लील विडीओ पहिला तर जाऊ शकते आपला जीव.

उत्तर कोरिया मध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे नियम आहेत ज्या नियमांचा विचार सुद्धा केला तर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. त्याच नियमांमध्ये हा एक आगळा वेगळा नियम आहे.

ज्यामुळे तेथील नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागू शकतो. तेथील नागरिकांमध्ये जर कोणीही अश्लील विडीओ पाहण्याचे साहस केले तर त्या नागरिकाला त्याच्या मोबदल्यात स्वतःचा जीव द्यावा लागतो.

तसेच तेथील नागरिकांना त्यांच्या घरी बायबल सारखे ग्रंथ ठेवण्यास मनाई आहे, जर तेथील नागरिकांनी हे ग्रंथ त्यांच्या घरी ठेवण्याचे साहस केले तर त्यांना सुद्धा जीवघेणी शिक्षा मिळते.

८) पर्यटकांना मोबाईल ची बंदी.

आपल्या देशात येणाऱ्या पाहुण्यांना आपण “अतिथी देवो भवं” म्हणून त्यांचे स्वागत करतो. तसेच त्यांचे आदरातिथ्य चांगल्या प्रकारे करतो. पण उत्तर कोरीया मध्ये असे काहीही नाही तिथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना बऱ्याच गोष्टींची पाबंदी आहे.

जसे कि आपण पर्यटक म्हणून जर उत्तर कोरिया ला भेट दिली तर आपल्याला तेथील विमानतळावरच आपल्याजवळ असणारे मोबाईल तसेच कॅमेरा आपल्याकडून घेऊन घेतल्या जातात, त्यानंतर आपल्याला तिथे फिरण्यास परवानगी मिळते.

आणि कॅमेरा आणि बाकी गोष्टी यासाठी आपल्या जवळून घेऊन घेतल्या जातात कारण तेथील स्थिती आपण जगासमोर आणू शकणार नाही.

९) किम जोंग उन ला पूर्ण जगात क्रूर हुकूमशहा म्हणून ओळखल्या जाते.

इतिहासाच्या पानांमध्ये आपण जर शोधले तर बरेच व्यक्तित्व असे मिळतील कि ज्यांनी लोकांवर खूप अत्याचार केलेत, आपल्या डोक्यात काहींचे नाव सुद्धा आले असतील, जसे अ‍ॅडॉल्फ हिटलर.

ज्याने यातना कॅम्पमध्ये लाखो नागरिकांना तडपून त्यांचा जीव घेतला होता. काहींना अबू बकर अल बगदादी चे नाव आठवले असेल. ज्याने लोकांचा किड्या मुंग्यांसारखा जीव घेतला आहे.

ह्यांच्या पेक्षाही एक क्रूर हुकुमशाहा आहे किम जोंग उन.

क्रूरच नाही तर त्याही पेक्षा एखादा मोठा शब्द असेल तरीही त्याचा उल्लेख केला जाऊ शकत नाही. असा तो किम जोंग उन.

kim jong-un rules

त्याचे नियमच कठोर नाहीत तर त्या नियमांचे उल्लंघन केल्यास मिळणारी शिक्षा हि त्यापेक्षाहि कठोर आहे.

आपल्या जीवाचे पाणी होऊन जाईल अश्या आहेत काही कठोर शिक्षा.

ज्या शिक्षेपेक्षा आपण मरण पत्करणे कधीही स्विकाराल.

समोर मी तुम्हाला त्या शिक्षांविषयी सांगणार आहे.

जर आपण हृदयाने कमजोर असाल तर कृपया करून हा लेख आपण पुढे वाचू नये. ते यासाठी कि जसजसे आपण पुढे वाचत जाणार तसे आपला माणुसकी वरून विश्वास कमी होत जाईल. कारण ह्या लेखात त्या शिक्षांविषयी सांगितले जाणार आहे.

ज्यामध्ये किम जोंग उन आपल्या कैद्यांच्या शरीरालाच नाही तर त्यांचा आत्मा सुद्धा थरथरून उठेल अशा भयानक जखमा देत असतो.

उत्तर कोरिया च्या जेल मधून पळून आलेल्या एका महिलेने एका इंग्रजी मिडीयाच्या मुलाखती मध्ये बोलत असताना सांगितले होते कि, मी पूर्ण जगाला म्हणू इच्छिते कि देवासाठी तेथील लोकांना वाचवा जे लोक उत्तर कोरीया च्या जेल मध्ये आहेत.

तिथे माणसांचं निवासस्थान नसून तिथे हैवानांच राज्य आहे.

ह्या भाषेत त्या महिलेने त्या ठिकाणांचे वर्णन केले होते. कारण त्या ठिकाणच्या यातना त्या महिलेने भोगल्या होत्या.

सांगताना ती महिला म्हणाली होती कि तेथील जेलमध्ये कैदी उभेहि राहू शकत नाही,

तसेच बसूहि शकत नाही, आणि झोपणे तर दूरच! तेथील कैद्यांना जेवणाच्या नावावर सडलेले अन्न खायला देतात,

तेथील कैद्यांना कुत्र्यांपेक्षाही वाईट वागणूक दिल्या जाते. असे त्या महिलेचे म्हणणे होते.

जर कैदी महिला असेल तर तेथील शिपाई त्या महिलेवर रोज बलात्कार करतात.

त्या महिलेने स्वतःच्या डोळ्याने हजारो महिलांवर बलात्कार होताना तसेच हजारो महिलांचा जीव जातांना पाहिले आहे.

जर महिला कैदी गर्भावती असेल तर तिच्या पोटावर लाथा मारल्या जायच्या. त्यांना गर्भपातासाठी बळजबरी केल्या जायची.

तरीही त्या महिलांना मुल झाल तर त्या मुलाला जिवंत जमिनीत गाढल्या जायाचे.

काहींना तर जिवंतच जाळल्या जायचे. त्या महिलेने तेथील वागणुकीविषयी खूप भयानक तसेच चित्तथरारक होते तिने सांगितलेले त्या ठिकाणाचे वर्णन.

या सगळ्या कठोर शिक्षा किम जोंग उन च्या आदेशावरूनच दिल्या जातात.

१०) केलेल्या चुकीची सजा येणाऱ्या दोन पिढ्यांना भोगावी लागते.

उत्तर कोरिया मध्ये जर एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला तर त्यालाच नाही तर त्याच्या येणाऱ्या दोन पिढ्यांना त्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागते.

तेथील सगळ्या शिक्षा ह्या एवढ्या यातनादायी आहेत.

कि यमराजाच्या दरबारात सुद्धा एवढ्या यातना मनुष्याला मिळत नसतील.

तर मित्रहो वरील लेख वाचून आपल्याला एवढी जाणीव नक्कीच झाली असेलच कि, आपण ज्या देशात राहतो तिथे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला व्यक्तिस्वातंत्र आहे, ज्यामुळे आपण आपल्या हक्कांसाठी लढू शकतो,

सरकारविरोधात बोलू शकतो. पण उत्तर कोरीया मध्ये तसे काहीही शक्य नाही.

जर तेथील नागरिकांनी सरकार विरोधात तोंडातून एक शब्दहि बाहेर काढला तर त्यांना स्वतःचा जीव गमावण्याची वेळ येते.

त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडणे करणे बंद करा. आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन चला.

आशा करतो आजचा लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल,

आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद !

Thank You So Much And Keep Loving  Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

जाहिरात लेखन कसे करावे
Information

जाहिरात लेखन कसे करावे

Advertising Writing आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत  किंवा स्थानिक असोत....

by Editorial team
July 10, 2022
Koyna River Information in Marathi
Information

कोयना नदीची माहिती

Koyna Nadi कोयना म्हटले, की आपल्या नजरेपुढे येते, ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि वरदान ठरलेले कोयना धरण. हे धरण  कोयना नदीवर...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved