Mansik Tanav
आठवणींचा समूह म्हणजेच विचार, असं म्हटल्या जात कि एका दिवसाला माणसाला साठ हजारांपेक्षा जास्त विचार येत असतात. निसर्गाने आपल्या मेंदूची रचना हि एका विशिष्ट प्रकारे केलेली आहे. ज्यामध्ये डावा भाग आणि उजवा भाग ह्या प्रकारचे दोन मुख्य भाग समाविष्ट आहेत.
तसेच निसर्गाच्या पाठीवर फक्त मनुष्यालाच विचार करण्याची क्षमता लाभलेली आहे. या क्षमतेवरच त्याने पूर्ण पृथ्वीतलावर आपले साम्राज्य निर्माण केले आहे.
मनुष्य त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेमुळे पृथ्वीवरून अवकाशात सुद्धा जाऊन आला आहे. विचार करण्याची क्षमता हि मनुष्याला निसर्गाची एक देणगीच लाभली आहे.
असे आपण म्हणू शकतो. आपल्या विचारांच्या बळावर मनुष्याने त्याच्या जीवनात असामान्य असे शोध लावलेले आहेत.
विचारांमुळेच माणसाची प्रगती तर होतेच सोबतच वाईट विचारांमुळे त्याची अधोगती सुद्धा होऊ शकते.
हे सर्वस्वी आपल्यावर निर्भर आहे कि आपण काय विचार करता.
मनुष्याला दिवसाच्या हजारो विचारांमध्ये काही वाईट तर काही चांगले विचार येत असतात.
या विचारांवर तर आपण आपले नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु त्या विचारांना आपण वळण देणे शिकू शकतो. ते वळण देण्यासाठीच आपण आजचा लेख पाहणार आहोत,
या लेखामध्ये आपण जाणून घेऊ कि कोणत्या गोष्टींमुळे आपण आपल्या नकारात्मक विचारांना चांगले वळण देऊ शकतो.
जेणेकरून आपले जीवन चांगल्या विचारांमुळे सार्थक होऊन जाईल.
खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या आपल्याला नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत करतील.
“टेन्शन फ्री व्हायचे आहे का? मग आवर्जून वाचा ह्या काही टिप्स” – Stress Management in Marathi
१) व्यस्त रहा:
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्थ रहा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा वाईट विचार घेरू शकणार नाही, व्यस्त राहिल्यामुळे आपल्या मेंदूला दुसऱ्या गोष्टीकडे वाटचाल करण्यास कमी वेळ मिळणार आणि त्यामुळे तो आपल्या कामात लक्ष देईल.
आणि आपला मेंदू कोणताही वायफळ विचार करायला असमर्थ होईल.
त्यासाठी आपल्याला जेवढे जास्त व्यस्त राहता येईल आपण तेवढे व्यस्त राहायचे प्रयत्न करावे.
२) रक्तप्रवाह वाढवा:
ज्यासाठी आपल्याला दररोज सकाळी उठून योगा प्राणायाम ह्या गोष्टींचा सहारा घ्यावा लागेल. जेणेकरून आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
तसेच आपण सकाळी काही अंतर धावण्याचा सराव सुद्धा करू शकता. त्यामुळे सुद्धा आपला रक्तप्रवाह वाढू शकतो.
रक्तप्रवाह वाढल्यामुळे आपल्या मेंदूची कार्य करण्याची क्षमता वाढते. म्हणून जास्त भर हा आपला रक्तप्रवाह वाढवण्यावर द्या.
३) सकारात्मक वातावरणात रहा:
आपल्याला जर नकारात्मक विचारांमुळे त्रास होत असेल तर आपण आपल्या भोवती असलेल्या सकारात्मक लोकांशी तसेच सकारात्मक ठिकाणांच्या सहवासात राहू शकता.
जसे आपल्याला फावला वेळ मिळेल तसे आजूबाजूला असलेल्या मंदिरात आपण आपला काही वेळ घालवू शकता.
जेणेकरून आपल्याला नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत होईल.
तसेच जे सकारात्मक लोक आपल्या आजूबाजूला राहतात, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकता.
त्यामुळे सुद्धा आपल्याला नकारत्मक विचारांपासून दूर राहण्यास मदत होईल.
४) स्वतःला प्रश्न विचारा:
आपल्याला येत असणाऱ्या नकारात्मक विचारांवर स्वतःला प्रश्न विचारा कि आपल्याला हे नकारात्मक विचार का येत आहेत? आणि त्या विचारांसाठी आपण कश्या प्रकारे चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो आणि त्यांना आपल्यापासून दुर करू शकतो.
बऱ्याच गोष्टींचे समाधान हे प्रश्न विचारूनच होत असते. त्यासाठी जीवनात कोणतीही गोष्ट करण्या अगोदर स्वतःला काही प्रश्न विचारा.
त्यांनतर च योग्य निर्णय घ्या आपल आयुष्य आणखी चांगले बनण्यास मदत होईल.
५) छोट्या गोष्टींचा पहाड बनवू नका:
बरेच लोकांना जीवनात सवय असते ती एखाद्या छोट्या गोष्टीला मोठी करण्याची, गोष्ट असते छोटी पण त्याला पहाडाएवढी बनवून स्वतःला खूप अश्या विचारांच्या विळख्यात अडकवल्या जाते.
भूतकाळात झालेल्या गोष्टींना विसरून पुढे चालत राहणे म्हणजे आयुष्य होय. आणि जो भूतकाळात झालेल्या गोष्टींना पकडून ठेवतो तो व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाही त्यासाठी आपण आपल्या जीवनात भूतकाळात झालेल्या गोष्टींना विसरून आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान काळात जगण्याचे प्रयत्न करा.
जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे आपले जीवन व्यतीत करू शकाल.
६) श्वासावर लक्ष केंद्रित करा:
आपल्याला नकारात्मक विचारांपासून लढण्यासाठी हि एक चांगली पद्धत आहे, ज्यामध्ये आपण आपल्या स्वसावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे आपल्या मेंदूला शांत राहण्यास मदत होते, तसेच त्या परिस्थितीमध्ये मेंदूला कोणतेही नकारात्मक विचार करायला वेळच मिळत नाही.
म्हणून बरेच मानसिक रोग तज्ञ या पद्धतीचा अवलंब करायला सांगतात. दिवसातून दोन वेळा आपण ह्या पद्धतीला आपल्या दैनंदिन जीवनात लागू करावे.
७) प्रार्थना करायला शिका:
जेव्हा आपल्याला वाटेल कि आपल्या जीवनात कुठे तरी वाईट होत आहे, तेव्हा प्रार्थना करायला शिका, आपण मनापासून प्रार्थना करायला शिकल्या नंतर आपण पाहाल कि आपल्या जीवनात एक अलौकिक चमत्कार घडून येत आहे.
कारण आपल्याला तेच मिळते जे आपण या सृष्टीला देत असतो. म्हणून प्रार्थना करायला शिका.
८) धन्यवाद द्यायला शिका:
आपण म्हणसाल हे काय नवीन तर, ह्यामध्ये नवीन काहीच नाही आहे, आपल्या जीवनात जे आपल्याजवळ आहे त्याला मिळवण्यासाठी बरेच लोक रात्रंदिवस मेहनत करत असतात.
जीवनात आपल्याला तेच मिळते जे आपण या सृष्टीला देत असतो. जीवनाविषयी काही गोष्टी बऱ्याच लोकांना माहित नाही आहेत,
या सृष्टीला दररोज उठल्या नंतर धन्यवाद द्या, आणि स्वतःशी सकारत्मक विचार बोला कि या दिवसाला माझा जीवनात आणल्या बद्दल मी आभारी आहे.
या दिवसाला मी चांगले बनविण्याचे प्रयत्न करेल.
धन्यवाद मला हा दिवस पाहायला मिळाल्या बद्दल. या प्रकारे आपण या सृष्टीला धन्यवाद द्यायला शिका. आणि दररोज स्वतःला त्याची सवय लावून घ्या.
आजच्या लेखात आपण आपल्याला तणावापासून वाचवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब कराल ते या लेखात सांगितले आहे.
तर आशा करतो आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल, आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
Thank You!