तुम्हाला कॉफी, चहा किवा ग्रीन टी प्यायला आवडतो? तर तुम्हाला हे नक्की ऐकायला आवडेल कि चहा कॉफी वैगेरे तुम्हाला तुमच्या वृद्ध वयात Strong ठेवतात. एक रिसर्च मध्ये हे सिद्ध झाल कि आपल्या जीवनाच्या मध्यम वयात चहा, कॉफी प्यायल्याने म्हातारपणी होऊ शकणाऱ्या शारीरिक दुर्बलतेची संभावना कमी होते. ह्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे “कॅफिन”.
ह्या लेखाद्वारे तुम्हाला थोडक्यात सांगतो कि चहा कॉफी पिण चांगल कि नाही?, चला तर मग पाहूया…
तुम्हाला कॉफी, चहा पिण्याला आवडतं? जाणून घ्या सायंटिस्ट काय म्हणतात?
सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी च्या एक टीमने हे रिसर्च केलं. त्यांनी जवळपास २० वर्षांच्या कालावधी मधे १२,००० लोकांच अनुसरण केला. या टीमने त्या लोकांच्या कॉफी, चहा, कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेट सारख्या कॅफीन युक्त पदार्थांच्या सवयींविषयी विचारले आणि त्यांचं वजन आणि ऊर्जा स्तर पण नापलं. तसेच त्यांच्या हाताची शक्ती आणि टाईम अप अँड गो (TUG) टेस्ट पण घेतल्या.
त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले कि जे लोक दिवसात चार कपापेक्षा जास्त कॉफी, चहा किवा ग्रीन टी पितात त्यांना म्हातारपणी होणारी weakness कमी होते. त्याच एक कारण म्हणजे “कॅफिन” असू शकत.
कॅफिन शारीरिक दुर्बलता कमी कसं करतो?
रिसर्च मध्ये हे सांगितले की कॅफिन हे weakness कमी करण्यासाठी सहायक असू शकतो, तसेच ते मांसपेशियांचे बल आणि सहनशीलता वाढवतो. कॅफिन तणावग्रस्त तंत्राचा उत्तेजक असू शकतो आणि उर्जा बनवून आपली मानसिक कार्यक्षमता वाढवतो. त्यांनी हे पण सांगितले की हे परिणाम खरे आहेत कि नाही याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.
कॉफी किवा चहा किती घ्यावा?
आता तुम्ही म्हणाल कि चहा आणि कॉफी कितीही पिल तर चांगल आहे. नाही नाही थांबा रिसर्च मध्ये हा सुद्धा निष्कर्ष निघाला कि चहा आणि कॉफी पिण तुमच्या व्यक्तिगत पसंदीचे आणि सहनशीलतेवर अवलंबून आहे. पण त्यांनी हा पण इशारा दिला की खुप कॅफिन तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकतो. त्यामुळे अनिद्रा, चिंता, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या बरेच आजार उद्भवू शकतात.
म्हणून तुम्ही कॉफी किवा चहा कमी मात्रा मधे प्यावा आणि दिवसात 400 मि.ग्रॅ. पेक्षा जस्त कॅफिन घ्यायला नको. तर तुम्ही कॉफी किवा चहा कमी मात्रा मधे आनंद घ्या आणि त्या सोबत स्वस्थ आहार आणि जीवनशैली पाळा.