Home / Health / दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi

दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय | Teeth Care Tips In Marathi

Teeth Care Tips

सर्वांना हसरा चेहरा प्रिय असतो दातांच्या स्वास्थामुळे हसरा चेहरा अधिकच सुंदर दिसतो त्यामुळे दातांचे आरोग्य टिकविणे फार जरुरी आहे दातांचे आरोग्य ठीक नसल्यास अनेक आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दैनिक दिनचर्येत दातांचे आरोग्य टिकविणे जरुरी आहे.

Teeth Care Tips

 

दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय – Teeth Care Tips In Marathi

1. चांगल्या प्रकारे दात घासावेत –

आपल्या दातांना दररोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी नियमित ब्रश करणे फार जरुरी आहे. दातांमध्ये दिवभराची घाण जमलेली असते त्यामुळे रात्री झोपण्याआधी ती घाण साफ करणे आवश्यक असते सकाळी ब्रश केल्याने दिवसभर मुखात दुर्गंधी राहत नाही ताजेतवाने वाटते.

ब्रश ची निवडही योग्य असावी तसेच योग्य पेस्ट ची ही निवड करावी.

तोंडात प्रत्येक भागात दातांची साफसफाई करण्यास किमान पाच मिनिटे द्यावीत दातांची भतत आपल्या जिभेची ही साफसफाई करणे फार जरुरी आहे त्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. काही लोक दिवसातून जेवढ्या वेळा अन्न ग्रहण करतात त्यानंतर ब्रश करतात ही एक चांगली सवय आहे परंतू आपण किमान दिवसातून दोन वेळा तरी ब्रश करावा.

2. दातांची अंतर्गत सफाई –

दातांची अंतर्गत सफाई करणे फार जरुरी आहे यासाठी रेशमी धागा घेऊन तोंडात समोरील दातांच्या फटीमधील घाण बाहेर काढण्यास मदत होते.

ज्या ठिकाणी ब्रश पोहोचू शकत नाही व या ठिकाणाची सफाई माऊथवॉश ही करू शकत नाही त्यासाठी ही प्रक्रिया करणे जरुरी आहे परंतु यात फार वेळ जातो आठवड्यातून किमान दोन वेळा ही प्रक्रिया नक्की करावी.

3. माऊथवॉश चा वापर –

माऊथवॉश चा वापर करणे खर्चिक पण चांगली सवय आहे. माऊथवॉश मुळे तोंडातील अपायकारक जीवाणू दूर केले जातात अडकलेल्या पदार्थांचा दुर्गंधी नष्ट होतो व दातांना पोषण मिळते. आपला माऊथवॉश मध्ये लीस्त्रीन व क्लोरिनची मात्र चांगली असायला हवी. ब्रश केल्यानंतर माऊथवॉश दातांना निरोगी बनवण्यास नक्कीच मदत होते. माऊथवॉश ने आपणास ताजेतवाने वाटते आपल्या मुखातून चांगला गंध येतो.

4. कॅल्शियम व जीवनसत्वे युक्त पेस्टचा वापर –

बाजारात कॅल्शिअम व जीवनसत्त्वे युक्त पेस्ट असल्याचा दावा बरेच ब्रेंड करतात परंतु तुम्ही या सर्वांमध्ये योग्य ब्रेंड ची निवड करावी वापरल्यामुळे फायदा होत असल्यावरच त्याचा वापर सुरू ठेवावा.

5. कॅल्शियम व जीवनसत्वे युक्त आहार –

आपल्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थाचे सेवन जास्त करावे गोड पदार्थाचा वापर कमी करावा खाल्ल्यानंतर पाण्याने गुळणी करून दातांची काळजी घ्यावी. दही, दुध, संत्रा ज्यूस, सुकामेवा, हिरव्या भाज्या यांचा वापर जास्त करावा. दात सडण्यापासून वाचवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त पदार्थाचा वापर करावा लहान मुलांमध्ये दातांची वाढ नीट ठेवण्यासाठी त्यांना जीवनसत्वे युक्त आहार नक्कीच द्यावा. कॉपर,झिंक,आयोडीन आणि पोटॅशियम युक्त आहार घ्यावा.

6. आपल्या जिभेचे साफ करावे –

आपल्या जिभेस साफ करावे कारण खाल्लेला पदार्थांचे सूक्ष्म कण जिभेवर राहतात त्यामुळे मुखाची दुर्गंधी सारखे विकार होऊ शकतात दररोज जिभेची योग्य प्रकारे साफसफाई होणे जरुरी आहे

7. तंबाखू खाऊ नये –

तंबाखूमध्ये निकोटिन असते त्यामुळे आपले मुख दुर्गंधीने व अपायकारक घटकांचे निशाण्यावर येते तंबाखू मुखाच्या कर्करोगासाठी जो मुख्यतः दातांच्या सडन्यामुळे जास्त वाढतो त्याची सुरुवात दात सडणे व त्यातून रक्तही येण्यापासून सुरू होते. तंबाखू सेवनामुळे मुखाचा आंतरिक भागाशी संबंधित रोगांची होण्याची शक्यता वाढते.

8. सोडा, कॉफी आणि मद्य यांचे सेवन शक्यतो फार कमी करावे –

सोडा, कॉफी आणि मद्य यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण फार असते त्यामुळे हे आपल्या दातांच्या आरोग्याला अपायकारक मानले जाते त्यामुळे यांचे सेवन कमी करावे

9. दातांच्या दुखण्यास दुर्लक्ष करू नये –

दातांमध्ये दुखण असल्यास त्याचीही तपासणी व उपचार घेणे आपली प्राथमिकता असायला हवी. कोणतही दुःख दुर्लक्ष करू नये त्यामुळे समस्त वाढून मोठ्या समस्याची निर्मिती होते त्यामुळे दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी दातांच्या तज्ज्ञांना दाखवावे.

10. दातांची नियमित तपासणी –

आपल्या दातांचे नियमित तपासणी करून घ्यावी त्यामुळे होणारा समस्यांचे निराकरण करता येते डॉक्टरांचा सल्ला नेहमीच पाळा व त्यानुसार आपली दिनचर्या असावी.

दात आपल्या सौंदर्याचा एक अभिन्न अंग आहे त्यामुळे त्यांचे सौंदर्य टिकवणे फार जरुरी आहे.

लक्ष्य दया: Teeth Care Tips In Marathi दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Check Also

Cancer Symptoms

हि लक्षणं दिसल्यास तो कॅंसर असू शकतो? | Cancer Symptoms

Cancer Symptoms आपलं आरोग्य हे सर्वात मोठ आपल्याला मिळालेलं धन आहे. खरतर असं म्हणतात की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *