Sukhi Vaivahik Jeevan
आपल्या समाजाने लग्न संस्था खुप विचार पुर्वक निर्माण केली आहे. स्त्री पुरूषाने एकत्र येउन नव्या जिवाला जन्माला घालणं हीच एक गरज त्या लग्नामागे नसुन एक चांगला समाज निर्माण करतांना आदर्श वैवाहिक जीवन जगत समाजासमोर आदर्श निर्माण करणे हा देखील या लग्नसंस्थेमागचा महत्वाचा उद्देश यामागे आहे.
आजकालची तरूण पिढी स्ट्रेस, तणाव, इगो, वाद, छोटयाछोटया कारणांनी विभक्त होतांना दिसतात. असे न करता दोघांनी जर एकमेकांना समजुन घेतलं, लग्न टिकवतांना थोडं तुझं थोडं माझ असं करत जर संसार टिकवला तर मतभेदांना कुठे जागाच उरणार नाही.
मित्रांनो लग्न एका सुंदर नात्याचे नाव आहे. असं म्हणतात की लग्न फक्त दोन व्यंक्तीचं नात नसुन दोन परिवार या सुंदर नात्याने एकत्रित येतात. या नात्यांची गाठ एकीकडे नवरदेव म्हणजे पती आणि दुसरीकडुन नवरी म्हणजे पत्नी या दोघांमध्ये बांधली जाते. म्हणुन पती पत्नींचे नाते जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले गेले आहे.
पण कधीकधी करियर बनवायच्या नादात आपण या नात्याकडे दुर्लक्ष करत आहोत ज्यामुळे पतीपत्नी च्या नात्यात दुरावा निर्माण होतो. या दुराव्याला दुर करण्याकरता आणि तुमच्या मॅरीड लाईफ ला आणखीन हॅप्पी बनवण्याकरता आम्ही तुमच्याकरता घेउन आलो आहोत काही हॅप्पी मॅरेज टिप्स्, ज्यांना वाचुन तुमची मॅरेज लाईफ आणखीन हॅप्पी होईल. तर चला वाचुया.
तुमच्या वैवाहिक जीवानाला आणखी सुंदर बनवायचं? वाचा ह्या काही टिप्स – Tips for Happy Married Life in Marathi
-
प्रामाणिकता – Authenticity:
कोणत्याही नात्यात आणि खास करून वैवाहीक नात्यात सगळयात आवश्यक आहे प्रामाणिकपणा. जसं संत्र्यासोबत त्याची साल जोडलेली असते तसं लग्नासोबत प्रामाणिकपणा जोडलेला असतो. आनंदी वैवाहिक जीवनात कोणतेही सिक्रेटस् नसावेत. असु ही नये! काय?
-
प्रेम – Love
लग्नाच्या नात्यात सगळयात आवश्यक आहे प्रेम. पण असं का? कारण असं पाहण्यात येतं की लोकं प्रेम रहीत लग्नाला आयुष्यभर वाहात असतात कधी मुलांकरता तर कधी स्वतःच्या स्वार्थाकरता.
त्यांना पाहतांना तुम्ही कदाचीत म्हणाल की यशस्वी वैवाहीक जीवन यांनी व्यतीत केलं पण अस कधीही म्हणू शकणार नाही की ते आनंदी वैवाहीक जीवन व्यतीत करत होते. काळासोबत प्रेमाच्या व्याख्येत बदल होत असतो पण लग्नसंस्थेत प्रेम खुपच आवश्यक आहे.
-
सन्मान – Honor
लग्न टिकवतांना एकमेकांप्रती सन्मान असणं खुप आवश्यक आहे. पतीचा पत्नीप्रती आणि पत्नीचा पतीप्रती सन्मान असायला हवा. लग्नाला कितीही वर्षे उलटली तरी माणुस म्हणुन त्या दोघांचा एकमेकांप्रती आदर सन्मान कधीही कमी व्हायला नको.
-
स्टॅमिना आणि डीटरमिनेशन:
अर्ध्यापेक्षा जास्त विवाह याकरता तुटतात. सुखी वैवाहिक जिवनाकरता हे समजुन घेणं आवश्यक आहे की हा प्रवास म्हणजे सोपी यात्रा नाही.
-
निष्ठा:
कसं टिकवायचं एक यशस्वी लग्न? नेहमी पहीला मुद्दा लक्षात ठेवा ‘प्रामाणिकपणा’. लग्नाचा पायाच एकमेकांप्रती प्रेम, समंजसपणा, आणि विश्वास यावर आधारीत आहे.
-
भांडा पण प्रामाणिक पणाने:
योग्य त-हेने भांडणं म्हणजे आपला मुद्दा मांडायचा पण कोणत्याही गोष्टीला किंवा वादाला पर्सनल इगो किंवा आपल्या पार्टनर चा अपमान करणे या टोकापर्यंत घेउन न जाणे. नेहमी याची काळजी घ्या, कधीही उभं राहुन वादविवाद करू नका कारण अश्या स्थितीत तुम्ही तुमचे हात जास्त हलवता आणि रागाचा आवेश मोठयाप्रमाणात समोर येतो.
-
अपेक्षा ठेवा पण विचार करून:
खुप जास्त अपेक्षा ठेवल्याने गोष्ट बिघडु शकते. आपल्या पार्टनर कडुन अश्या अपेक्षा ठेवा ज्या वस्तुस्थितीला धरून असतील अवास्तव अपेक्षा नको. असाधारण गोष्टी त्यांना करायला लावु नका आणि तुम्ही ही करू नका. छोटया मोठया भांडणांना वैय्यक्तिक घेउ नका.
आपल्या जोडीदाराचा मान राखा आणि त्याची काळजी घ्या. काही वर्षांनंतर थॅंक यु आणि आय लव्ह यु कुठे हरवतात कळत नाही. आपल्या जोडीदाराला नेहमी हे वाटु दया की तो स्पेशल आहे.
-
संवाद साधा:
एकमेकांसोबत संवाद साधान्याकरता वेळ काढणं खुप आवश्यक आहे. संवाद नसतांना कोणतीही टिम सोबत काम करू शकत नाही मग हे तर वैवाहिक जीवन आहे. एकमेकांप्रती संवेदना व्यक्त करा आपली आर्थिक स्थिती सुध्दा शेयर करा.
या टिप्स् चा प्रयोग करून तुम्ही तुमच्या वैवाहीक जीवनाला आणखीन आनंदी बनवु शकता. आपलं जीवन आनंदी करा.
Thank you!
हा लेख आवडल्यास आपला अभिप्राय देण्यास विसरू नका, कारण आपला अभिप्राय हा आमच्याकरता मौल्यवान आहे…