आला उन्हाळा तब्बेत सांभाळा

Summer Care Tips

उन्हाळा म्हटला की, आपल्याला जाणवते ते ऊन वातावरणात होणारी तापमान वाढ. उन्हाळ्यात जीव कसा कासावीस होऊन जातो.  पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेने हा ऋतू आपल्या शरीरासाठी खूप त्रास दायक असतो असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. इतर ऋतूंच्या तुलनेने उन्हाळ्यात त्वचे संबंधी आजारात जास्त प्रमाणात वाढ होते.

उन्हाळ्याची चाहूल जरी जानेवारीच्या उतरार्थ होत असली तरी, उन्हाळा हा गुडीपाडव्या पासून म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाने होते. या ऋतूत झाडाची पाने गळूण झाडांना नवीन पालवी फुटू लागते, फुले बहरू लागतात. प्रत्येक ऋतू हा चार महिन्याचा असतो. आजच्या तुलनेने पूर्वी ऋतुमान हे वेळेनुसार बदलत होते, परंतु आता हल्ली ऋतुमानात बदल झाला असल्याने कोणताच ऋतू त्याच्या वेळे नुसार जाणवत नाही. याचा आपण सर्वाना अनुभव येत असेलंच.

आला उन्हाळा तब्बेत सांभाळा – Tips for Summer in Marathi

Summer

गर्मी पासुन बचाव करण्याचे उपाय – Tips For Prevent Heat

१) शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा – Maintain the Water Level

दिवसातुन कमीत कमी ३ ते ४ ग्लास पाणी अवश्य प्या. उन्हाच्या दिवसात आपल्या शरीरातील पाणी घामाच्या रूपात बाहेर पडतं, म्हणुन शरीरात पाण्याची कमतरता पडल्यास तब्येतीवर परीणाम होऊ शकतो, म्हणुन उन्हाळयाच्या दिवसांत पाणी भरपुर प्रमाणात प्यावं. पाण्यासोबत पॉलीकार्बोनेट पॉलीईथीलीन च्या मात्रेत स्थिर राहातं कारण पॉलीईथीलीन पाण्यात मिसळलं जातं. तुम्ही ट्रेवलिंग वाटर फिल्टर देखील वापरू शकता. बऱ्याच जणांना २, ३ ग्लास पाणी रोज लागतं आणि जास्त देखील लागु शकतं उन्हाळयाच्या दिवसांत व्यायाम करतांना घाम आल्यास जास्त तहान देखील लागु शकते.

२) उन्हापासून स्वतःला वाचवा – Protect Yourself From Heat

उन्हात बाहेर पडतांना स्वतःला उन्हाच्या तिव्र किरणांपासुन वाचवा याकरता आपण टोपी किंवा रूमालाचा उपयोग करू शकता किंवा एखादे नैसर्गिक तत्व असलेले सनस्क्रीन लावा ज्यात जास्त केमीकल्स नसतील. बाहेर जातांना आपल्यासोबत अॅलोव्हेरा जेल सोबत ठेवा त्यामुळे तुमचे उन्हापासुन संरक्षण होईल, घरीदेखील अॅलोव्हेरा चे रोप जरूर लावा. अॅलोव्हेरा चा उपयोग जळालेल्या कोणत्याही भागावर आपण करू शकता. अॅलोव्हेरा जखमांना गारवा देते आणि जखमांना लवकर भरण्यास मदत करतं. अॅलोव्हेरा जेल ला आपण सनबर्न वर देखील लावु शकता, फार कमी वेळात याचा गुण येतो.

३) सकाळी व्यायाम करा – Do Exercise in Morning

तुम्ही व्यायाम किंवा कसरती देखील करू शकता. हृदय आणि स्वास्थ्य चांगले ठेवण्याकरता व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही जास्त काम करत असाल तर तुम्हाला पायी लांब यात्रा, स्विमिंग किंवा टेनिस खेळायला हवे. हे केल्यास तुमचे शरीर सुदृढ राहील आणि मेंदु ही कार्यक्षम राहील.

४) नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्या – Enjoy Natural Beauty

मोसमी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे देखील लाभदायी असते. जी फळं शरीराला थंडावा देतात आणि शरीराकरता हलके असतात अशी ताजी फळं, भाज्या, ज्युस, सलाद आणि जास्तीत जास्त पाणी शरीराला या दिवसांत तंदुरूस्त ठेवण्यास सहाय्यक असतात. उन्हाळयात प्रोटीनयुक्त अन्नाचा आपल्या जेवणात समावेश असावा. आता बऱ्याच प्रकारचे प्रोटीन युक्त खादय पदार्थ येत आहेत, ज्यांचा समावेश स्वयंपाक करतांना करू नये.

फळ, भाज्या, बीया असलेले पदार्थ, मोड आलेली कडधान्य, सोयाबीन चे पदार्थ, दही, लस्सी आणि पनीर यांचे सेवनही उन्हाच्या दिवसात लाभदायक असते. उन्हाळयात आपण मास, मासोळया देखील खाऊ शकता.

५) बाहेर मित्रांसोबत वेळ घालावा – Spend Time With Friends

उन्हाळयाच्या दिवसात आपण आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत बाहेर वेळ घालवा. सक्षम असल्यास एखादया लांबच्या यात्रेला देखील आपण जाऊ शकता किंवा मैदानी खेळ खेळा, कॅंप ला जा, नदीकिनारी जाऊन मजा करा, कौटुंबिक नातेसंबंध जपा ज्यामुळे तुमचे आयुष्य आनंदी राहील.

६) शांत राहणे शिका – Live Calm

जेव्हा तुम्ही कठीण मेहनत केली असेल तेव्हा आरामात लांब श्वास घ्या. हा एक असा ऋतु आहे ज्यात तुम्ही शांत राहायला हवं आणि भरपुर सुर्य किरणांना आत्मसात करायला हवे जे तुमच्या हार्मोनल मॅसेज सेंटर ला उत्तेजीत करतील. तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप ला घरी सोडुन कुठेतरी आठवडाभर फिरायला जा.

या उपयांना जर आपण अमलात आणलं तर तुम्ही प्रकृतीचा अनुभव घेऊ शकाल. हे सगळं शहरातील बागेत जाऊन देखील आपण करू शकता, जेव्हां आपण लांब यात्रेला किंवा फिरायला जात असाल तर आपल्या सोबत प्रथमोपचार असुदया म्हणजे काही लागल्यास ते कामात येईल. जास्त उन्हात देखील कुठे जाऊ नका आणि जास्तीत जास्त पाणी प्या.

उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि त्यावरील उपाय – Sickness in Summer And Remedies

उन्हाळ्यात हवा उष्ण आणि कोरडी वाहू लागल्याने त्वचा कोरडी पडू लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तव्चेला खाज सुटू लागते, त्वचा लालसर होते. त्याच प्रमाणे त्वचा गरम होऊन काळी सुद्धा पडू लागते. इतर ऋतूंच्या तुलनेने उन्हाळ्यात शरीराची बऱ्याच प्रमाणात झीज होते.

तापमान वाढल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते. शरीराला जास्त घाम फुटू लागतो परिणामी त्वचेवर  घामोळ्या, तसेच मुरूम येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वचा निस्तेज होऊन त्यावर सुरकुत्या पडू लागतात. या प्रकारच्या समस्या उन्हाळ्यात होत असतात.

उष्माघात – Heat stroke

उन्हाळ्यात सूर्य जास्त तापत असल्याने त्याची जमिनीवर पडनारी किरणे वातावरणात जास्त उष्णता निर्माण करतात. वातावरण तापू लागते, त्यानुसार शरीरातील तापमानात देखील वाढ होत जाते. परिणामी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन आपल्याला थकवा जाणवतो, चक्कर येऊ लगते, डोक दुखणे उलटी या सारख्या समस्या होऊ लागतात.

उष्माघाताचे लक्षण म्हणजे, उष्णतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते परिणाम घाम शरीरा बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे त्वचा तापू लगते. आपल्या शरीराला सतत पाण्याची गरज असते कारण आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण ६० टक्के असते परंतु उन्हामुळे त्याची झीज होते. यातून स्मुतिभ्रंश, अस्वस्थता चिडचिडपणा, हृद्य संबंधी समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास, व्यक्तीच्या खांद्यावर, कपाळावर आणि मांड्यावर पाणी शिंपडत राहा.

मिठाच्या पाण्याच्या पट्या त्या व्यक्तीच्या कपाळावर ठेवा. तसेच त्याला भरपूर पाणी प्यायला द्या, तातडीने दवाखान्यात न्यावे.

घामोळ्या – Heat Rash

उन्हाळा म्हटला की गरमी आली, कारण उन्हाळ्यात सूर्य जास्त तापतो. उन्हामुळे जीव लाहीलाही होतो. शरीरातून घामाचे लोट वाहू लागतात.

यामुळे त्वचेची झाकलेली सूक्ष्म छिद्रे मोकळी होतात. आपल्या शरीरावर लाखो सूक्ष्म छिद्रे आहेत परन्तु ते आपल्याला दिसत नाहीत.

उन्हाळ्यात शरीराला घाम सुटतो त्यामुळे ही छिद्रे मोकळी होतात. घाम सुटल्याने आपले उष्णते पासून एक प्रकारे स्वरक्षण होते.

घामामुळे शरीराला थंडावा जाणवतो, परंतु घाम शरीरातच मुरल्याने त्याठिकाणी लहान लहान आकराचे पुरड येऊ लागतात. त्याला आपण घामोळ्या म्हणत असतो.

त्वचेला होणाऱ्या आजरा पैकी हा देखील एक आजार आहे घामोल्याने त्वचेला खूप खाज सुटते.

म्हणून उन्हाळ्यात दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करायला पाहिजे.

तसेच, आजकाल बाजारात घामोळ्या वर उपयुक्त पावडर देखील उपलब्ध आहे आपण त्याचा सुद्धा वापर करू शकतो.

शक्यतो उन्हाळ्यात सैल कपडेच परिधान केले पाहिजात. उष्णता विरोधक रंग असणाऱ्या कपड्यांचा जास्त वापर करावा.

डोकेदुखी – Headache

उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे हवेत सुद्धा उष्णता जाणवते.

घराच्या बाहेर गेल्यास आपल्याला उन्हाचे चटके सुद्धा जाणवतात.

उष्णतेमुळे आपल्या शरीरातून खूप मोठ्या प्रमाणात घामाचे लोंढे वाहू लागतात.

यातूनच आपल्याला थकवा जाणवतो, जीव नकोसा होऊन जातो.

रक्तदाबाचे प्रमाण कमी होते परिणामी डोके दुखू लागते.

याची काळजी घेण्यासाठी आपण उन्हात बाहेर जातांना डोक आणि चेहरा पूर्णपणे रुमाल किंवा दुपट्याने झाकून घ्यावा.

तसचं, आपल्या सोबत पाण्याची बॉटल ठेवावी. शक्य असल्यास उन्हात घराच्या बाहेर निघूच नये.

मोतीबिंदू – Cataracts

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते हे आपल्याला कळलच असेल, शरीराप्रमाणे सूर्यकिरणे सरळ आपल्या डोळ्यावर देखील पडत असतात त्यामुळे आपले डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळ्यांना खाज सुटते. यातून मोतीबिंदू , त्वचेचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते.

उन्हाळ्यात घ्यायची सर्वसाधारण काळजी – How to Care in Summer (Unhalyat Ghyaychi Kalaji)

कडक उन्हाळ्यात आपण आपलं शरीर पूर्णपणे झाकून घेऊ शकू अश्या प्रकारचे फिकट रंगाचे कपडे आपण परिधान केले पाहिजात.

पूर्ण बाह्याचे कपडे किंवा तरुणींनी सनकोट सुती स्टोल वापरावा.

  • घराच्या बाहेर जातांना आपण आपले डोक दुपट्याच्या सह्याने पूर्णपणे झाकून घेतलं पाहिजे.
  • कामानिमित्त घराबाहेर जातांना सोबत पाण्याची बॉंटल न्या.
  • उन्हाळ्यात जास्तीतजास्त पाण्याचे सेवन करा.
  • सुर्यकिरणामुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लोशन वापरावे. गरज असल्यास छत्रीचा वापर करा.
  • चहा, कॉफी, आणि मद्यपान या गोष्टीचे सेवन करणे टाळा. कारण यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते.
  • संत्री, कलिंगड आणि लिंबू यासारख्या रसाळ फळांचे सेवन करा.
  • जेवण एकाच वेळेला न करता दिवसातून थोड थोड घ्या.
  • शक्य असल्यास दुपारी झोप घ्यावी, यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.
  • उन्हाळ्यात शक्यतो मसाल्याच्या पदार्थ टाळावे, तेलकट पदार्थ वर्ज्य करा. साधे जेवण घ्या.

या वर्षीच्या उन्हाळ्यात आपण या टिप्सची अमलबजावणी करून आपलं शरीर निरोगी राखूया.

तर ह्या होत्या काही टिप्स ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला मदत करतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा.

तसेच आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरु नका.

धन्यवाद !

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here