Home / Health / उज्जायी प्राणायाम | Ujjayi Pranayama
Loading...

उज्जायी प्राणायाम | Ujjayi Pranayama

Ujjayi Pranayama

पद्मश्री रामदेव बाबा योगजगाात योगगुरू या नावाने ओळखले जातात त्याच्या विविध योगप्रकारांमध्ये आपले शरीर स्वस्थ आणि दमदार राहण्यासाठी अनेक प्राणायाम सांगितले आहेत. चला तर मग अशाच एका प्राणायाम प्रकारा बद्दल जाणूया

उज्जायी प्राणायाम – Ujjayi Pranayama

Ujjayi Pranayama
Ujjayi Pranayama Image

उज्जयी प्राणायाम आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवीण्यासाठी अभ्यासला जातो. शरीराच्या श्वसनतंत्रास नियंत्रित करण्यासाठी उज्जयी प्राणायाम केला जातो. याचे इंग्रजी नाव विक्टोरियस ब्रेथ असे आहे. याचा अभ्यास करतांना समुद्राच्या पाण्यासारखा आवाज येतो म्हणून याचे ओशियन ब्रेथ असेही नामकरण केले आहे. या प्राणायामामुळे शरीरात गरम हवा शरीरात जाते आणि शरीरातील दुषित आणि विशजन्य पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत मिळते. या प्राणायामात श्वसनाच्या दोन्ही क्रिया नाकाव्दारेच केल्या जातात. श्वास घेताना व सोडतांना समुद्राच्या पाण्यासारखा आवाज होतो. गळयाची श्वास नलीका छोटी असल्यामुळे हवा मंद गतीने आत व बाहेर केली जाते त्यामुळे असा आवाज येतो.

उज्जायी प्राणायाम करण्याची विधी – How To Do ujjayi Pranayama:

 • सर्वप्रथम आसनावर आरामात बसावे.
 • पद्मासनात किंवा आरामात बसता येते.
 • तोंड बंद करून श्वास नाकाव्दारे घ्यायचा व सोडायचा आहे. श्वास लांब घेणे व हळूहळू सोडणे.
 • हळूहळू श्वास घेण्याची व सोडण्याची गती वाढत न्यावी.
 • जास्त जोरात श्वास घेउ व सोडू नका. नियंत्रित स्वरूपाचा आणि सोडण्याची व घेण्याची वेळ समान असावी.
 • कमीत कमी 3 मिनीटे सराव करावा.
 • हळूहळू सरावाची वेळ 15 – 20 मिनीटे वाढवत न्यावी.

हे करतांना मेंदू शांत ठेवत कोणताही विचार न करता शांततेने करावा.

यामुळे मनाची एकाग्रताही वाढते आणि सकारात्मकता वाढते.

भस्त्रिका प्राणायामात श्वास बाहेर सोडतांना जोरात सोडावा लागतो त्यामुळे या प्राणायामात श्वास जेवढा लांब घेतला तेवढाच लांब सोडतांना हळूवार सोडावा.

नाडी शुध्दि प्राणायामास इंग्रजीत अल्टरनेट नोस्ट्रिल असे म्हणतात. यामध्ये दोन्ही नासिकेतून एकदाच श्वास घ्यावा लागतो एकाच नासिकेतून जर श्वास घेतल्यास तब्येत खराब होउ शकते. दोन्ही पैकी उजव्या नासिकेतून श्वास घेतल्यास मानसिक त्रास होउ शकतो तर डाव्या नासिकेतून श्वास घेतल्यास मानसिक कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे उज्जायी प्राणायामात श्वास नियंत्रण करणे फार आवश्यक आहे.

उज्जायी प्राणायामास विक्टोरियस ब्रेथ आणि ओशियन ब्रेथ म्हणतात या प्राणायामात फू – फू चा आवाज होतो. ही एक महत्वपूर्ण श्वसनक्रिया आहे. हवा गळयाशी घर्षण पावते त्यामुळे असा आवाज निघतो.

उज्जायी प्राणायाम करण्याचे लाभ – Benefits Of ujjayi Pranayam

 • उज्जायी प्राणायाम करण्यामुळे शरीरात उष्णता वाढते यात निघणा-या आवाजामुळे मेंदू एकाग्रतेचे काम करतो.
 • या प्राणायामामुळे उच्च रक्तदाब आणि हदयासंबधी रोगांवर फार लाभदायक फायदे होतात.
 • उज्जायी प्राणायामामुळे शरीरातील वेदना मायग्रेन, इन्सोमिया, आणि सांधेदुखी हया व्याधी दूर होतात.
 • शरीरातील आंतरीक संस्था स्वस्थ राहतात.
 • फुुफूसासंबधी संक्रमणास व अस्थमा आणि टि.बी स ठीक करण्यास मदत मिळते.
 • पचनतंत्रास व श्वसनतंत्रास शक्ती मिळते.
 • दमारोगींसाठी फारच लाभदायक मानले जाते. कारण यामुळे फुफूस आणि ब्राॅचिलेस ची क्षमता वाढते.
 • उज्जयी प्राणायाम करत्या वेळी काही गोष्टींचे लक्ष ठेवावे.
 • श्वास घेतांना जोरात घेउ नये.
 • तोंडाने श्वास घेउ नये. तोंड बंद ठेवावे.
 • श्वास नियंत्रीत घेत तेवढयाच वेळात सोडावा.
 • डोक्यात विचारांची वर्दळ नसावी.
 • हा प्राणायाम शक्यतो पहाटे व पूर्व उत्तर दिशांमध्ये बसून करावा.
 • उपाशी राहूनच हा प्राणायाम करावा.
 • उज्जयी प्राणायाम नियमित केल्यास शरीर आतून शूध्द होते. याचा सराव आपणांस स्वस्थ आणि क्रियाशील बनविते.

हे पण नक्की वाचा :

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Ujjayi Pranayama चे फ़ायदे असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा उज्जायी प्राणायाम – Ujjayi Pranayama in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Ujjayi Pranayama in Marathi – Ujjayi Pranayama या लेखात दिलेल्या उज्जायी प्राणायामच्या फायद्यांन Ujjayi Pranayama बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Loading...

Check Also

How To Get Rid Of Cockroach

झुरळांपासून सुटका हवी आहे मग करून पहा हे उपाय | How To Get Rid Of Cockroach

How To Get Rid Of Cockroach काॅकरोच जगातील सर्वसाधारण किटकांपैकी एक किटक आहे. खादयपदार्थांच्या ओढीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *