Veg Wonton Soup
सुप हा भारतीय आहारातील पदार्थ नसला तरी त्याने भारतीय स्वयंपाक घरात वेगाने आपले स्थान पक्के केले आहे. आज आपल्याकरता चायनिज रेसीपी व्हेज वॉण्टन सुप कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत.
व्हेज वॉण्टन सूप बनविण्याची रेसिपी – Veg Wonton Soup Recipe in Marathi

व्हेज वॉण्टन सूपसाठी लागणारी सामग्री – Ingredients of Veg Wonton Soup
- ६ वॉण्टन शीटस्
- १ चमचा कांदा बारीक कापुन
- २ चमचे हिरव्या शेंगा बारीक कापुन
- ३ चमचे गाजर बारीक कापलेले
- १ चमचा लसणाची पेस्ट
- अर्धा चमचा सेलरी बारीक कापलेली
- तेल आवश्यकतेनुसार
- मीठ गरजेनुसार
सिजनिंगसाठी:
- १ चमचा साखर
- २ चमचे अजिनोमोटो
- १ चमचा काळे मिरे पावडर
- अर्धा कप मक्याच्या आटयाचे पातळ मिश्रण
- ४ कप पाणी
- १ मोठा चमचा व्हेज स्टॉक
- १ चमचा बारीक चिरलेला कांदा
व्हेज वॉण्टन सूप बनविण्याची विधी – Veg Wonton Soup Recipe
सर्वप्रथम पॅनमधे तेल गरम करून त्यात लसणाची पेस्ट आणि सॅलरी हलके सोनेरी होईपर्यंत होऊ द्या. सर्व भाज्या आणि सिजनींग ची सामग्री फक्त कांदा सोडुन एकत्र मिसळुन चांगली होऊ द्या. सर्व मिश्रण एकजीव झाल्यास काढुन घ्या, वॉण्टन शिट च्या किनाऱ्यांवर थोडेसे हे मिश्रण ठेवुन रोल करावेत आणि दोन्ही बाजुंना मक्याच्या आटयाच्या मिश्रणाने बंद करून घ्या.
पाणी आणि व्हेज स्टॉक मधे टाकुन गॅसवर १५-२० मिनीटे होऊ द्या.सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर ते मिक्सर मधुन काढुन घ्यावे आणि गरमागरम खायला द्यावे वरून कापलेल्या कांदयाने त्यास सजवावे.
तर तयार आहे तुमचे व्हेज वॉण्टन सुप, कशी वाटली हि रेसिपी आम्हाला अवश्य कळवा, अश्याच नवीन रेसिपी साठी कनेक्ट रहा माझीमराठी सोबत.
धन्यवाद !