WiFi Debit Card
धावपळीच्या जगात माणूस दिवसेंदिवस स्मार्ट गोष्टीचा वापर करताना दिसत आहे, स्मार्ट गोष्टी माणसाचा जेवढा वेळ वाचवतात तेवढा त्या गोष्टींपासून माणसाला धोका सुद्धा आहे,
माणूस सुरुवातीला पैसे काढण्यासाठी बँकेत जात असे आणि बँकेतून पैसे काढून तो त्या पैशांचा वापर करत असे, त्यानंतर साधे क्रेडीट आणि डेबिट कार्ड आले, मग माणसाने पैसे काढण्यासाठी या गोष्टीचा वापर केला, हि पद्धत माणसासाठी तोपर्यंत सुरक्षित होती जोपर्यंत त्या डेबिट किंवा क्रेडीट कार्ड चा पिन कोणाला माहिती होत नव्हता.
आता त्याच्यापेक्षाही स्मार्ट पद्धत आली. ते म्हणजे Wi-Fi क्रेडीट किंवा डेबिट कार्ड, या कार्ड ला आपण सोबत कुठेही घेऊन तर जाऊच शकता पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची लांब प्रोसेस करायचे काम नाही.
पण या Wi-Fi क्रेडीट किंवा डेबिट कार्ड चा पिन काहीहि न करता चोरी जाण्याची शक्यता आहे, तर आजच्या लेखात आपण या पिन ला सुरक्षित कसे ठेवल्या जाईल त्याविषयी माहिती पाहूया.
तर चला जाणून घेवूया.
आपल्याकडे असे क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असेल तर बाळगा हि सावधगिरी – WiFi Debit Card

हे कार्ड साधारण कार्ड पेक्षा खूप वेगळं असत. या कार्ड ला कॉन्टेक्टलेस कार्ड सुद्धा म्हणतात. ह्या कार्ड वर आपल्याला Wi-Fi चा सिम्बॉल असल्याचे दिसते. या कार्डच्या पिन चा उपयोग न करता पिओएस मशीन च्या माध्यमाने या कार्ड मधून २००० रुपयांची रक्कम काढल्या जाऊ शकते.
जर आपल्या खिशातही हे Wi-Fi चे कार्ड आहे तर आपल्या खिशाला पिओएस मशीन लाऊन आपल्या खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते. आणि अश्या कार्ड ची रेंज हि ४ सेंटीमीटर आहे.
या कार्ड ला जरीही आपण Wi-Fi कार्ड म्हणत असू पण हे कार्ड Wi-Fi वर पूर्ण पणे काम करत नाही. अश्या प्रकारचे कार्ड एनएफसी (नियर फिल्ड कम्युनिकेशन) आणि RFID म्हणजेच रेडियो फ्रिकवेंसी आइडेंटिफिकेशन च्या तंत्रज्ञानावर काम करते.
या कार्ड मध्ये एक चीप असते जी एक पतल्या मेटल एन्टीना सोबत जुळलेले असते, आणि याच एन्टीनाच्या सिग्नलच्या मदतीने हे कार्ड पिओएस मशीन सोबत कनेक्ट होत असत. आणि हे कार्ड पिओएस मशीन च्या संपर्कात येताच आपल्या खात्यातून २ हजार रुपयांची रक्कम निघू शकते.
आपल्या Wi-Fi कार्ड चा कोणी चुकीचा फायदा उचलू नये म्हणून काय करायला हवे – How to Secure WiFi Enabled Credit and Debit Card
- सर्वात आधी आपल्या कार्ड ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मेटल ने बनलेल्या पाकीटाचा वापर करू शकता.
- आपले कार्ड हरविल्यास त्याची माहिती पोलिसांना अवश्य द्या.
- कार्ड ची एसएमएस सर्विस सुरु ठेवावी.
- जेव्हा आपण या कार्डचा वापर करणार तेव्हा आपल्या हातानेच करा.
- आपले कार्ड कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या हाती देऊ नये.
- या कार्डचा वापर केल्यानंतर आपल्याला आलेला एसएमएस नक्की चेक करावा, कारण आपल्या खात्यातून किती रक्कम वजा झाली ते आपल्याला कळेल.
तर वरील काही गोष्टींचे आपण योग्य प्रकारे अनुसरण केले तर आपले Wi-Fi चे कार्ड पूर्णपणे सुरक्षित राहील. आपल्या एखाद्या मित्राकडे जर अश्या प्रकार चे कार्ड असेल तर त्या व्यक्तीला या लेखाला शेयर करायला विसरू नका,
आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्र आणि परिवारातील काही व्यक्तींना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!