लाखो रुपये कमविते हि महिला, पहा काय करते.

Woman Start Salad Business

रोजच्या जेवणातील एक पदार्थ तो म्हणजे सलाद. वेगवेगळ्या कच्च्या भाज्यांचं मिश्रण करून त्यांना बारीक चिरून मीठ मसाला योग्य प्रमाणात टाकून बनविलेला खाण्याचा पदार्थ म्हणजेच सलाद. आपण हॉटेल मध्ये जे सलाद खातो आपल्याला वाटत ते तर जेवणासोबत फुकट येत,

हो येतही असेल, पण याच सलाद ला एका व्यक्तीने आपला रोजगार म्हणून पाहिले आणि सुरुवात केली एका नवीन स्टार्टअप ची. तर चला या स्टार्टअप विषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ, कि कश्या प्रकारे या स्टार्टअप ची सुरुवात झाली होती आणि हा स्टार्टअप कोणी सुरु केला.

तर चला जाणून घेवूया या स्टार्टअप विषयी.

लाखो रुपये कमविते हि महिला, पहा काय करते – Woman Start Salad Business

Woman Start Salad Business
Woman Start Salad Business

काय आहे हा स्टार्टअप विषयी Keep Good Shape Startup

पुण्याच्या राहणाऱ्या एका महिलेने या स्टार्टअप ची सुरुवात केली आहे, त्या महिलेचे नाव मेघा बाफना आहे, मेघाने २०१७ मध्ये घरी सलाद बनविण्याच्या आपल्या छंदाला त्यांनी सुरुवातीला सोशल मिडियावर आपल्या मित्रांसोबत शेयर केले तेव्हा त्यांच्या मित्रांपैकी काही मित्रांनी याला पसंती दर्शवली.

त्यानंतर त्यांना सुरुवातीला ५ ऑर्डर मिळाल्या आणि लोकांना त्यांच्या सलाद ची टेस्ट आवडायला लागली आणि त्यानंतर त्यांना भरपूर ऑर्डर मिळायला लागल्या. आणि त्यांनी या व्यवसायासाठी फेसबुक वर आपल्या व्यवसायाचे पेज तयार केले.

त्यानंतर लोकांनी या व्यवसायाला पसंती दाखवली आणि व्यवसाय वाढायला लागला, त्यांनी या व्यवसायाची सुरुवात फक्त ३ हजार रुपयांच्या गुंतवणुकीने केली होती.

आजपर्यंतची त्यांची कमाई हि २२ लाख रुपये झाली आहे, त्या सकाळी ४ वाजता उठून सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या. भाज्यांना विकत घेणे, मसाले तयार करणे, आणि त्यांचे सलाद बनवून पाकीट मध्ये भरणे.

कधी कधी तर त्यांना या व्यवसायामध्ये तोटा सुद्धा झाला आहे पण तरीही त्यांनी या व्यवसायाला सुरु ठेवले, आज त्यांच्या व्यवसायाने एक चांगले रूप घेतले आहे. लॉकडाऊन सुरु व्हायच्या आधी त्यांच्या कडे २०० रेगुलर ग्राहक होते, त्यांची एका महिन्याची बचत हि ७५ हजार ते १ लाख रुपये इतकी आहे.

त्यांच्याकडे जवळ जवळ २२ वेगवेगळ्या सलाद चे प्रकार आहे, आणि त्यांची सर्विस हि २४ तास उपलब्ध आहे. मेघा यांनी व्हाट्सएप ग्रुप च्या सहाय्याने सुद्धा आपल्या व्यवसायाला आजूबाजूला पसरविण्यासाठी मेहनत घेतली.

आज ते ९-११ व्हाट्सएप ग्रुप ला चालवितात, आणि त्यांनी या ग्रुप च्या सहाय्याने आपल्या बिजनेस ला  एक वेगळे रूप दिले आहे. आज त्यांच्या सोबत १५ वेगवेगळे लोक काम करतात. यामध्ये मग त्यांचे डिलिव्हरी बॉय यांचा सुद्धा समावेश आहे.

आज त्यांच्या व्यवसायाने एक उंच भरारी घेतली आहे, आणि या महिलेने आपल्या व्यवसायाला एक वेगळे वळण दिले आहे. मेघा बाकी महिलांसमोर एक प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांनी जगाला दाखवून दिले कि हिम्मत करणाऱ्या व्यक्तींना कधीही काहीही करू शकतात. फक्त आपल्यात करण्याची जिद्द असायला हवी.

तर अश्या प्रकारे त्यांनी आपला व्यवसाय उभा केला, आणि बाकी महिलांसाठी त्यांनी एक उदाहरण उभे केले. तर आशा करतो आपल्याला हा लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top