Home / Marathi Biography / “माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi

“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र | Dashrath Manjhi Story In Marathi

Dashrath Manjhi – दशरथ मांझी यांना “माउंटन मन” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी सिद्ध केल कि मनात दृढ इच्छाशक्ती असल्यास कोणतेही कार्य अशक्य नाही.

दशरथ मांझी हे अत्यंत गरीब होते त्यांनी स्वतः एका विशाल पहाडाला खोडून त्याच्या मधातून रस्ता बनविला. त्यांच्या या पराक्रमा पासून आपण सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळते. त्यांनी २२ वर्षे कठीण परिश्रम करून उंच पहाडास मध्यभागातून खोडून तेथे रस्ता बनविला होता.

Dashrath Manjhi
“माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र – Dashrath Manjhi Story In Marathi

दशरथ मांझी हे बिहार येथील गया जवळील गहालौर या गावाचे एक गरीब कुटुंबात जन्मलेले कामगार होते. त्यांचे वडील खाणीत खानिकाचे काम करायचे वडिलांच्या मृत्यू नंतर ते घरातून पळून गेले होते पटना शहरात राहिल्यानंतर ते गावी परतले होते. आणि गावातील फाल्गुनी देवी सोबत त्यांनी विवाह केला.

खाणीवर काम करताना गर्भस्थ पत्नी त्यांच्या साठी जेवणाचा डबा घेवून जातांना तिचा पाय घसरला व ती पहाडावरून खाली पडली त्यात तिचा मृत्यू झाला. पहाडा पलीकडे गया शहर होते परंतु पहाडावरून खाली रस्ता नव्हता दवाखान्यात जाई पर्यत खूप उशीर झाला.

याचा प्रतिशोध घेण्यासाठी दशरथ मांझी ने ठरवले कि या पहाडातून एक मोठा रस्ता बनला पाहिजे ज्यामुळे शहरात जाण्यास सरळ रस्ता तयार होईल त्यांनी मनात संकल्प घेवून आपल्या कामाला सुरुवात केली.

प्रथमता लोक त्यांना वेद समजून नाकारत त्यामुळे मांझीची इच्छाशक्ती अधिकच प्रबळ होई. त्यांनी कुदळी, फावड आणि घमेले घेवून विशाल पहाडास खोदायला सुरुवात केली.

मध्ये त्यांनी सरकार कडे याबाबत बरीच निवेदनही दिली परंतु कधीच कोणती कार्यवाही झाली नाही. परंतु मांझी कधीच निराश झाले नाही.

सुमारे २२ वर्षे ( १९६० – १९८२ ) अथक परिश्रम करून त्यांनी ३६० फुट लांब, २५ फुट खोल, आणि ३० फुट रुंदीचा रस्ता गहलौर पहाडातून बनवून जवळील वजीरगांज ह्या शहराचे ५५ किमी चे अंतर १५ किमी करून एक महान कार्य केले.

काही लोक त्यांच्या मदतीला आले तर काहींनी त्यांची आलोचना केली परंतु जे महान कार्य त्यांनी केले ते सर्वांसाठी प्रेरणेचा झरा सिद्ध झाले.

दशरथ मांझीची मृत्यू – Dashrath Manjhi Death

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्ली येथे पित्ताशयाच्या कॅन्सर मुले ७३ वर्षीय मांझीच १७ ऑगस्ट २००७ रोजी निधन झाले.

त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी बिहार सरकार ने त्यांना पुरस्कृत केले होते.त्यांना पद्मश्री देवून सन्मानित केले गेले.

चित्रपट प्रभागाने यावर एक वृत्तचित्र चित्रपट “ द मन हु मूव्ह द माउंटन” बनवून संपूर्ण जगास मांझी यांच्या कार्याची माहिती दिली.

२०१५ मध्ये “मांझी: द माउंटन मन” हा चित्रपट केतन मेहता या निर्मात्याने बनवला मांझीचे कार्य जगासमोर आले एवढेमोठे कार्य त्यांनी एकट्याने केल्यामुळे त्यांच्या कार्यास सर्वत्र सराहना केली गेली.

आपल्या देशात असे अनेक मांझी आहेत ज्यांची कहाणी कधी सर्वांसमोर आली नाही. अश्या वीर पुत्रांचा या मायभूमीस नेहमी अभिमान आहे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ दशरथ मांझी  बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “माउंटन मन” दशरथ मांझी यांचे जीवनचरित्र  – Dashrath Manjhi Story In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट: Dashrath Manjhi Biography – दशरथ मांझी  यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

About Editorial team

Check Also

Michael Jordan

प्रसिद्ध बास्केटबाल खेळाडू मायकल जार्डन | Michael Jordan Biography in Marathi

“मी खूप असफलता अनुभवली आहे आणि त्यामुळे मी आज सफल आहे” – MICHAEL JORDAN हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *