Home / Marathi Biography / करिष्मा कपूरचा जीवन परिचय | Karishma Kapoor Biography In Marathi

करिष्मा कपूरचा जीवन परिचय | Karishma Kapoor Biography In Marathi

करिष्मा कपूर / Karishma Kapoor  भारतीय बॉलीवूड चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. नावाजलेले कपूर कुटुंबाची ती तिसऱ्या पिढीची सदस्य आहे. अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची प्रथम कन्यारत्न करिश्माच्या अंगा रक्तातच अभिनय असल्यामुळे ६ पासूनच शिक्षण सोडून अभिनयात आपले करियर करायचे ठरविले. आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या १७ व्या वर्षी १९९१ मध्ये “प्रेम कैदी” या चित्रपटापासून केली. त्यानंतर त्यांनी लगातार जिगर (१९९२) अनाडी (१९९३) राजाबाबू, सुहाग (१९९४) कुली न.१, गोपी किशन (१९९५) साजन चले ससुराल (१९९६) सारखे यशस्वी चित्रपट केले.

 करिष्मा कपूरचा जीवन परिचय / Karishma Kapoor Biography In Marathi
Karishma Kapoor

करीश्माचा जन्म मुंबई मध्ये झाला त्यांचे आईवडील त्यांना “लोला” म्हणून हाक मारायचे. त्यांची आई ख्रिश्चन आणि वडील हिंदू सिंधी होते. अभिनेता हरी शिवदासानी यांची भाची आणि महान अभिनेता राज कपूर याची नात.आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर यांची बहिण आहे.

करिष्मा कपूरची आई बबिता एक अभिनेत्री होत्या त्यांची मोठी बहिण “साधना”ह्या एक चांगल्या अभिनेत्री होत्या . आपल्या वडिलांकडून पंजाबी समुदायाशी चांगले संबंधित आहेत तर आई कडून सिंधी आणि ब्रिटीश समुदायाशी सबंधित आहेत. करिष्माने कॅथेड्रल अंड जोन केनन स्कूल मधून आपले शिक्षण ग्रहण केले.

वयक्तिक जीवन –

पंजाबमधील सिंधी परिवाराची संबंध असलेली करिष्मा कपूर १९९२ ते १९९५ मध्ये संबंध तुटेपर्यंत चित्रपट “जिगर”मधील सहकलाकार “अजय देवगण” यांच्या प्रेम संम्बंधात अडकली होती. यानंतर साल २००२ मध्ये अभिषेक बच्चन यांच्याशी त्यांचे सुत जुळून काही महिन्यांनी साखरपुडा सुद्धा झाला होता, मात्र हे नात सुद्धा जास्त वेळ टिकले नाही.

शेवटी २९ सप्टेंबर २००३ मध्ये तिने उद्योगपती संजय कपूर यांच्याशी विवाह केला जे सिक्स्ट इंडिया नावाच्या कंपनीचे संचालक आहेत.करिष्मा कपूर यांना एक मुलगी समीरा जिचा जन्म २००५ मध्ये झाला आणि एक मुलगा कियान ज्याचा जन्म २०१० मध्ये झाला होता. २०१४ मध्ये दोघांमध्ये स्वमताने घटस्फोट करिता न्यायालयात अर्ज केला होता.२०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

फिल्मी करियर

१९९६ मध्ये करिष्मा कपूर हिने राजा हिंदुस्तानी साठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवार्ड जिंकला होता.हि तिच्या फिल्मी करीयरची फिल्म होती. त्यानंतर तिने रोम्यांटिक ड्रामा असलेला “दिल तो पागल है” (१९९७) साठीचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नेशनल फिल्म अवार्ड जिंकला. यानंतर तिने फिजा (२०००) आणि जुबेदा (२००१) मध्ये वेगळ्या भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना फिल्म फेअर सेरेमनी मध्ये उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) चा अवार्ड सुद्धा मिळाला. याप्रकारे करिष्मा कपूर हिने स्वतःला मुख्य नायिका म्हणून सिद्ध केले.बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्र्यांमध्ये करिष्मा कपूरची गणना केली जाते. वोग स्टेट्स यांच्या अनुमानानुसार आपल्या वेळेस करिष्मा राष्ट्रीय स्टाईल आईकोन या नावाने प्रसिद्ध होत्या.बॉक्स ऑफिस इंडिया च्या टोप 5 एकट्रेस ऑफ 1990-90 मध्ये करिष्मा कपूर पहिल्या क्रमांकावर होत्या. आपल्या करियर मध्ये करिष्मा कपूरने एक राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि चार फिल्मफेअर अवार्ड जिंकले. आणि सहा वेळा त्यांना फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले होते. फिल्मी अभिनयासोबत करिष्मा कपूरने टेलीविजन सिरीज करिष्मा – दि मिरयाकल्स ऑफ डेस्टिनी (२००३) मध्ये मुख्य भूमिका केली होती. रियालिटी शो “नच बलिये” आणि “हंस बलिये” मध्ये जबाबदार जज सुद्धा बनल्या होत्या.

२००३ मध्ये संजय कपूर सोबत विवाहानंतर २००४ नंतर त्यांनी चित्रपट केले नाही.साल २०१२ मध्ये पदार्पण करीत डेंजरस इश्क मध्ये दमदार भूमिका केली.

सामाजिक कार्य

नायिका म्हणून काम करण्यासोबतच करिष्मा अनेक सामाजिक कार्य पण करतात. त्या अनेक सामाजिक संस्थांशी संपर्कात असतात. ज्यामध्ये सलमान खान यांच्या “बेइंग हुमन” फौंडेशन चा समावेश आहे. यासोबत त्या स्तन कॅन्सर विषयी जनजागृती साठी २०१२ मध्ये पिंकथोने याचि गुडविल एम्बेसेडर बनल्या होत्या. २०१३ मध्ये करिष्मा ने प्रियांका चोपडा यांच्या सोबत मिळून भारतात मुलींच्या हक्कांसाठी चालविल्या गेलेल्या अभियानामध्ये भाग घेतला.यासोबत त्या इंटरन्याशनल स्कीन केअर ब्रांडस सोबतही काम करत असतात.सध्या करिष्मा इंटरन्याशनल कॉस्मेटिक अंड ब्युटी ब्रांड “गार्नियर कलर” चा प्रमुख चेहराही आहेत. त्यासोबतच त्या मुख्य डिजाईनर मनीष मल्होत्रा, अर्पित मेहता, विक्रम फडणीस यांच्यासाठी राम्पवॉक पण करतात यासोबतच करिष्मा अर्जुन रामपाल, ह्रितिक रोशन, करीना कपूर आणि आफताब शिवदासानी यासोबत युनायटेड स्टेट (U.S.A.) मध्ये एका लाइव कंसरट मध्येही भाग घेतला होता.

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी करिष्मा कपूर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा करिष्मा कपूर यांची जीवनी / Karishma Kapoor Biography In Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Karishma Kapoor Biography – करिष्मा कपूर यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

About majhimarathi-wp

Check Also

Udit Narayan

प्लेब्लैक सिंगर उदित नारायण यांचे जीवन – चरित्र | Udit Narayan Biography In Marathi

Udit Narayan – उदित नारायण झा हे एक नेपाली प्लेब्लैक गायक आहेत. त्यांनी नेपाली आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *