मोदींजीनी २१ दिवसच का मागितले लॉकडाऊन साठी?

Coronavirus Effect:  India is lockdown for 21 Days

चीन मधून सुरुवात होऊन सर्व जगामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे,

या संकटाच्या काळात प्रत्येक राष्ट्राला आपल्या देशातील नागरिकांची काळजी होत आहे.

या सर्व गोष्टींना पाहता भारत सरकार ही आपले योग्य ते पाऊल उचलत आहे.

कोविड-१९ (COVID-19) ही एक गंभीर संसर्गजन्य बिमारी आहे, या सर्व गोष्टींना लक्षात घेता.

२४ मार्च च्या रात्री ८ वाजता संपूर्ण देशाला संबोधन करताना माननीय मोदींजींनी काही गोष्टी देशापुढे मांडल्या.

त्यामध्ये सुरुवातीला जनता कर्फ्युचे योग्यरित्या पालन केल्याने त्यांनी सर्व जनतेचे आभार व्यक्त केले,

आणि  सोबतच बोलतांना त्यांनी सांगितले की हा आजार किती भयंकर आहे,

आणि जगामध्ये या आजाराने आपले पाय खूप गंभीररीत्या पसरवले आहेत.

कोरोनाचा कहर २१ दिवसांसाठी भारत राहणार बंद – Coronavirus Effect:  India is lockdown for 21 Days

21 Days Lockdown India

जनतेला संबोधन करताना त्यांनी जनतेकडे २१ दिवसांचा कालावधी मागितला, कारण कोरोना विषाणूची देशामध्ये साखळी निर्माण होऊ नये, व त्याचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होऊ नये,

त्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल सरकार ला उचलावे लागले.

दिवसाला एका व्यक्तीस या विषाणूची लागण झाल्यास तो व्यक्ती देशातील अंदाजे ६०,००० व्यक्तींसाठी हानिकारक आहे. इटली, अमेरिका या सारख्या प्रगतिशील देशांमध्ये सर्वात मोठी चूक त्यांनी केली ती म्हणजे लोकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखले नाही आज त्या देशांमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा हजारोपर्यंत पोहचला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारतात पाळलेल्या जनता कर्फ्युचे कौतुक करताना म्हटलं कि भारताकडे कोरोना ला हरविण्याची क्षमता आहे.

भारताने याआधीही चांगल्या प्रकारे संकटांवर मात केली आहे.

तर कोरोना च्या संक्रमनापासून वाचण्यासाठी जेवढे लोकांच्या कमी संपर्कात येणार तेवढे चांगले, स्वतःची काळजी घ्या, घरी राहून आपल्या परिवाराला तसेच देशाला सुरक्षित ठेवा.

सोबतच या बातमीला आपल्या प्रियजनांना शेयर करा आणि समाजात जागरूकता पसरविण्यासाठी आपले योगदान द्या! अश्याच ताज्या बातम्यांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here