चक्क आईने केला आपल्या आजारी मुलासाठी २७०० किलोमीटर चा प्रवास

Latest Viral News  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सगळीकडे बंद ची परिस्थिती आहे. कोणीही घराच्या बाहेर आवश्यक काम नसल्यास निघू नये अश्या प्रकारच्या सूचना सरकार कडून देण्यात आल्या आहेत, कोरोना विषाणूचे संक्रमण पसरू नये म्हणून आपल्या देशात आधी २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि त्यानंतर दुसरा लॉकडाऊनला ३ मे पर्यंत वाढविण्यात आला असल्यामुळं कोणालाही घराबाहेर अनावश्यक कामासाठी निघता येणार नाही, आणि हा निर्णय सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार ने घेतला आहे.

मुलासाठी एका आईने केला तब्बल २७०० किलोमीटरचा प्रवास – 2,700 KM Mother Journey for Child

2,700 km Mother Journey for Child

अश्याच बातम्यांच्या मध्ये एक नवी बातमी समोर आली आहे, लॉक डाऊनच्या स्थितीत आपल्या मुलाची तब्येत चांगली नसल्याचे कळताच एका आईने आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी केरळपासून राजस्थान पर्यंत तीन दिवस २७०० किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण केला.

राजस्थान च्या जोधपूर ला बीएसएफ मध्ये कार्यरत असलेल्या अरुण कुमार या सैनिकाची तब्येत काही दिवसांपासून खराब राहत असल्याने जोधपूरच्या एम्समधील डॉक्टरांनी त्या सैनिकाच्या घरी फोन लावून परिवाराला सांगितले असता, त्या केरळच्या परिवारातील सदस्यांनी मुलाला भेटण्यासाठी जाण्याचा निर्धार केला आणि त्यांनी त्या मुलाच्या भेटीला निघताना आपल्या सुनेला सोबत घेऊन त्या सैनिकाच्या आईने सहा राज्यातून आपला हा  प्रवास पूर्ण केला.

सुरुवातीला ते केरळ मधून तामिळनाडूला आले आणि तामिळनाडू वरून कर्नाटकला आले. पुढचा प्रवास त्यांनी कर्नाटकापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून गुजरात आणि त्यानंतर राजस्थान या सहा राज्यांचा प्रवास करत त्यांनी जवळ जवळ २७०० किलोमीटर अंतर पार करून जोधपूरला तिसऱ्या दिवशी आपल्या मुलाजवळ पोहचले.

त्या सैनिकच्या आईचे नाव शिलम्मा वासन असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या मुलाच्या काळजीपोटी एका आईने तब्बल सहा राज्यांना पार करत आपल्या मुलाजवळ गेल्याच्या ह्या गोष्टीची सोशल मीडियावर सराहना केल्या जात आहे आणि आईच आपल्या मुलाविषयी असलेलं प्रेम हे या बातमीतून पुन्हा जगाच्या समोर आलं आहे.

अश्याच नवनवीन आणि विशेष बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top