आई साठी लिहिलेली एक छोटीशी सुंदर कविता

Mazi Aai Marathi Kavita

जिच्या उदरातून आपला जन्म झालेला आहे,  प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपली आई, जी माऊली फक्त आपल्याला जन्मच देत नाही, तर वेळ आली तर आपल्या मुलांसाठी जीवाच रान सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही.

या जगाच्या पाठीवर ती एकच व्यक्ती अशी असते जी सगळ्यांपेक्षा ९ महिने जास्त आपल्याला ओळखत असते, तिला आपल दुखः कधीही सांगायचं काम पडत नाही, म्हणतात ना या जगात देव प्रत्येकाजवळ जाऊन त्याची समस्या सोडवू शकत नाही, म्हणून त्याने आपल्याला आई दिलेली असते.

खरच त्या माऊली विषयी जेवढे पण लिहायचे तेवढे कमीच, जसे कि समुद्राची शाही करून आणि आकाशाचा कागद करून सुद्धा तिचे उपकार मांडल्या जाऊ शकत नाही. अश्या त्या माउलीचे वर्णन मी माझ्या या कवितेद्वारे करू पाहत आहे. चला तर पाहूया Aai Kavita in Marathi

आई साठी लिहिलेली एक छोटीशी सुंदर कविता – Poem on Mother in Marathi

Poem on Mother in Marathi

आई ह्या शब्दाचा अर्थ जर सांगायला बसलो तर त्या माऊलीचे गुणगान करणे शक्य नाही. आई हा दोन अक्षरी शब्द आ आणि ई पासून बनलाय,

“आ म्हणजे आकाश आणि ई म्हणजे ईश्वर”

आकाश आणि ईश्वराचे एकत्रीकरण असलेला शब्द म्हणजे आई होय. तिच्या एवढं काळजी करणार सुध्दा आपल्या जीवनात कोणीच नसत. आईच्या हृदयात आपल्या लेकरासाठी जे प्रेम असते, ते मोजता न येणार प्रेम असते. आपल्याला एखादी ठेच लागते ना तेव्हा आपल्या मुखातून सर्वात आधी आपल्या आईचे नाव बाहेर येते. आई विषयी कितीही बोलायला बसले तरीही शब्द कमीच पडतात. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे आपण विचार करू शकतो की आईचे महात्म्य किती मोठे आहे, जगाचा नियंता परमात्मा ज्याच्या सत्तेने विश्वातील झाडाचे पान सुध्दा हालत नाही तो परमात्मा आई विना भिकारी आहे. तर आपण समजू शकतो आई म्हणजे काय असेल. त्याच आईवर खाली एक कविता (Poem on Mother) लिहिलेली आहे. तर चला ती पाहूया..

आई वर सुंदर कविता – Aai Kavita in Marathi

किती करावे तुझे कौतुक

शब्द अपुरे पडती माझे।

परतफेड नाही करू शकत

त्या उपकारांची तुझे ।।

 

अमृतवाणी मला तू

पाजीलास ग पान्हा।

जसे यशोदेच्या मांडीवर

कृष्ण बाळ तान्हा।।

 

गुण अवगुणांचा माझ्या

केला तू विलय।

सर्व गुन्हे माफ होती

असे तुझे न्यायालय।।

 

तुझ्या कुशीतली झोप

आजच्या संसारात नाही।

पुढचा जन्मही तुझ्या गर्भात मिळो

हि वाट मी पाही।।

 

जगावे पुन्हा पुन्हा

येऊनी तुझ्या मी पोटी।

सर्वच दुनिया तुझ्या विना

वाटे मला खोटी।।

 

तूच माझ्या जीवनाची

पालटलीस ग काया।

साष्टांग नमन करुनी

पडतो तुझिया पाया।।

 

प्रेम तुझे आहे आई

या जगाहून भारी।

म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा

आई विना भिकारी।।

 

                                युवाकावी

                                                – वैभव कैलास भारंबे

वरील कवितेत लिहिलेल्या ओळींमध्ये आपल्याला आईच्या प्रेमाची अनुभूती झालीच असेल, आणि आईच्या प्रेमाची बरोबरी या जगात कुठेही होऊ शकत नाही हे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छित आहे, आईच प्रेम हे इतरांच्या प्रेमापेक्षा खूप मौल्यवान असतं, प्रत्येकाच्या नशिबात हे प्रेम असतं असे नाही आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला आईच प्रेम मिळालं आहे.

माझ्या सारख्या पामराने आई वरती लिहिलेली हि कविता (Aai Kavita in Marathi) सर्व मातांना समर्पित. आणि आपल्याला लिहिलेली कविता आवडल्यास या कवितेला आपल्या आई सोबत शेयर करा आणि त्यावर आईचा प्रतिसाद काय आला त्या प्रतिसादाला आमच्यासोबत शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन कविता आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top