आजच्या २१ व्या शतकात Work from home jobs ची demand खूप जास्त असण्याची बरीच कारणे आहेत. कारण सर्वप्रथम वर्क फ्रॉम होम मुळे तुमचा यायचा आणि जायचा वेळ वाचतो. त्याचबरोबर कंपनीचा खर्च देखील वाचतो जसे की बिल्डिंग, फर्निचर, वीज इ. चा खर्च देखील वाचतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही घरी काम करता त्यावेळेस काम करणे खूपच सोपे होऊन जाते. आज कम्प्युटरवर ऑनलाइन काम करणाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम एक वरदान ठरत आहे. मोठमोठ्या कंपन्या देखील लोकांना घरीच काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत.
गृहिणींसाठी हे काम एक वरदान ठरत आहे, तुम्ही Youtube ला बघितले असेल की बऱ्याचशा महिला फॅशन, रेसिपी, ब्युटी पार्लर, मेहंदी, डिजाईन इत्यादी ची माहिती देत असतात. काही महिलांनी तर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आपल्या देशामध्ये जर महिला सशक्तिकरणाला चालना द्यायची असेल तर वर्क फ्रॉम होम फॉर लेडीज सारख्या कामांना चालना दिली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया Benefit of Online Work Form Home
वर्क फ्रॉम होम चे फायदे – Benefit of Online Work From Home Jobs in Marathi
इंटरनेटच्या या जमान्यामध्ये आजकाल बरीच कामे आपण घरबसल्या करू शकतो. कारण कम्प्युटरशी संबंधित अशी बरीच कामे आहेत ज्यामध्ये फक्त तुम्हाला एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन ची गरज असते.
कम्प्युटरवर ऑनलाइन कामांची लिस्ट – List of Online Work
- ऑनलाइन सामान विकणे
- वेबसाईट बनवणे / ब्लॉगिंग
- ऑनलाइन टीचिंग जॉब्स
- ग्राफिक डिझायनिंग
- दुसऱ्यांसाठी लेख लिहिणे
- जेवण शिकवणे
- ऑनलाइन गेम खेळून
- ऑनलाइन व्हॉइस ओव्हर किंवा कॉमेंट्री करणे
- फोटो विकणे
- मनी ट्रान्सफर
- डेटा एन्ट्री जॉब्स
- Youtube वर व्हिडिओ बनवणे
- फेसबुक वर व्हिडिओ बनवणे
- ऑनलाइन टायपिंग जॉब्स
- मोबाईल ॲप बनवणे
अशा प्रकारची बरीच कामे तुम्ही घरबसल्या करू शकता.
मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पैसे कमवण्याचे अजून मार्ग शोधू शकता. तुम्हाला या section मध्ये सविस्तर माहिती भेटून जाईल.
१. ऑनलाइन सामान विकणे – Sell Good Online Work From Home Jobs
सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की घरबसल्या तुम्ही ऑनलाईन सामान कसे विकू शकता आणि पैसे कमावू शकता. जर तुम्ही ऑनलाईन कधी सामान मागवले असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की इंटरनेटच्या मदतीने आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओ मार्ट इत्यादी सारख्या वेबसाईटवरून आपले सामान ऑर्डर करून घरी मागवू शकतो.
पण तुम्हाला हे माहिती नसेल की हे सामान तुम्ही देखील स्वतः विकू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. याच कामाला अफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. तुम्ही फक्त ऑनलाईन पोर्टल वरूनच हे सामान विकू शकत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या बाजारातून होलसेल मध्ये माल आणून देखील विकू शकता.
२. वेबसाईट बनवून किवां तुम्ही ब्लॉगिंग करून पैसे कमवू शकता.
जर तुम्हाला लिहायची आवड असेल तर तुम्ही ब्लॉगिंग ची सुरवात करू शकता या साठी तुम्ही गूगल चे फ्री प्लॅटफॉर्म blogger.com चा उपयोग करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर लेख लिहू शकता आणि Google AdSense मदतीने दर महिन्याला डॉलर्स मध्ये पैसे कमवू शकता.
याव्यतिरिक्त जर तुम्हाला वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशन बनवता येत असेल तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना डोमेन होस्टिंग सारख्या सेवा देऊन चांगले पैसे कमावू शकता. GoDaddy, hostinger, big rock, blue host, HostGator and name cheap यांसारख्या वेबसाईट तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत कमिशन प्रोव्हाइड करतात.
३. Youtube वर व्हिडिओ बनवणे
तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर youtube वर व्हिडिओस तर नेहमीच पाहत असाल. पण तुम्ही कधी विचार केला आहेत का कि हे सर्व Youtube Video Creators पैसे कसे कमवतात तर, तुम्हाला सांगू इच्छितो कि हे सर्व Creators youtube videos वर येणाऱ्या ads मधून उत्पन्न प्राप्त करतात त्यामुळे तुम्ही youtube वर तुमच्या knowledge नुसार व्हिडिओस टाकून Google AdSense आणि Affiliate Marketing च्या मदतीने खूप चांगले पैसे घरात बसून कमवू शकता.
४. जेवण बनवून पैसे कसे कमवावे
जर तुम्ही एक गृहिणी असाल आणि घरबसल्या काम (work from home) करण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्हाला हे काम खूप आवडू शकते. भारतामध्ये अधिकांश महिला या गृहिणी असतात आणि जेवण बनवणे हे त्यांचे रोजचे काम असते. पण हजारो महिलांनी या गोष्टीला स्वतःच्या रोजगाराचे साधन बनवले आहे. लोकांना ऑनलाईन जेवण बनवणे शिकवून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
यासाठी तुम्ही रेसिपी व्हिडिओज बनवून youtube वर अपलोड करून पैसे कमवू शकता. यासाठी खूपच कमी भांडवलाची आवश्यकता असते तुमच्याकडे एक मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन ची आवश्यकता आहे. यानंतर तुम्ही जेवण बनवण्याच्या व्हिडिओज आपल्या यूट्यूब चैनल वर पोस्ट करून, पैसे कमवू शकता.
५. डेटा एन्ट्री जॉब्स – work from home jobs for students.
ज्या लोकांना डेटा एन्ट्री जॉब बद्दल अधिक माहिती नाही त्यांना आम्ही सांगू इच्छितो की यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचे आकडे किंवा इतर माहिती टाईप करून लिहावी लागते. यालाच तुम्ही टायपिंग जॉब देखील म्हणू शकता. जर तुम्हाला एखाद्या मेडिकल शॉप मध्ये डेटा एन्ट्री job करायचा असेल तर तुम्हाला तेथील औषधांची लिस्ट टाईप करावी लागेल. किती औषधे विकली गेली किती स्टॉक राहिलेला आहे इत्यादी सर्व माहिती कम्प्युटरमध्ये फीड करावी लागेल.
डेटा एन्ट्री जॉब ऑनलाइन देखील मिळू शकतो, या प्रकारच्या ऑनलाइन वर्कमध्ये कंपनी तुम्हाला काही फाइल्स, इमेज पीडीएफ च्या स्वरूपात देतात, ज्या तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एक्सेल मध्ये transform करायच्या असतात. या प्रकारचे डेटा एन्ट्री जॉब्स महिलांसाठी आणि स्टुडंट्स साठी खूप उपयोगी आहेत. कारण हे काम तुम्ही ऑनलाईन आणि पार्ट टाइम देखील करू शकता.
Fiver, Freelancing वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल ओपन करून देखील तुम्ही पार्ट टाइम जॉब मिळवू शकता.
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जेवढे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम जॉब्स यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे ते सर्व जॉब्स त्या लोकांसाठी ही आहेत ज्यांना कोणताही experience म्हणजेच अनुभव नाही. म्हणजेच हे सर्व जॉब्स फ्रेशर्स आणि स्टुडंट्स लोकांसाठी सुद्धा आहेत. जर तुमचे शिक्षण चालू असेल तरीसुद्धा हे जॉब तुम्ही पार्ट टाइम घरबसल्या करू शकता.
मित्रांनो जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब्स करायचे असतील तर तुमच्याकडे आज बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी तुमच्याकडे एखादा लॅपटॉप किंवा कम्प्युटर असणे खूप गरजेचे आहे त्याच बरोबर एक चांगले इंटरनेट कनेक्शन असणे देखील गरजेचे आहे. पण तुम्ही अशा कामांची सुरुवात तुमच्या मोबाईल फोन पासून देखील करू शकता आज बरेचसे युट्युबर्स आहेत ज्यांनी त्यांची सुरुवात एका मोबाईल फोन पासून केली जे आज लाख रुपये कमवत आहेत.
त्याचबरोबर तुम्ही स्वतःची वेबसाईट क्रिएट करून किंवा दुसऱ्या वेबसाईट साठी कॉन्टेन्ट रायटिंग करून देखील पैसे कमवू शकता, डिजिटल मार्केटिंग, affiliate marketing इत्यादी गोष्टी करून देखील तुम्ही पैसे कमवू शकता.
निष्कर्ष – Conclusion
आजच्या या Benefit of Online Work Form Home Jobs in Marathi च्या आर्टिकल मध्ये आपण ऑनलाइन वर्क फ्रॉम होम मध्ये कोणती कोणती कामे आहेत ते आपण घर बसल्या करू शकतो ते पहिले. या लेखात आपण महिला/गृहिणी देखील घर बसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवू शकतात ते पाहिले. मला आशा आहे तुम्हाला हा लेख वाचल्यामुळे work from home करून online earning करायला मदत होईल. काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.