बटरफ्लाय केक… रेसिपी

Butterfly Cake

केक हा सगळयांनाच आवडतो अगदी लहानांपासुन तर वृध्दांपर्यंत! त्याचे प्रकारही खुप आणि आकारही खुप. वेगवेगळे जिन्नस टाकुन बनवण्यात येणारा हा केक लहान मुलांचा तर जीव की प्राण असतो. वाढदिवस असल्यास कधी केक कापतो आणि त्यावर ताव मारतो असे मुलांना होऊन  जाते.

आज आपण बनवणार आहोत केक जो लहानांपासुन मोठयांपर्यंत सर्वांना आवडतो. वाढदिवसाला तर केक पाहिजे म्हणजे पाहिजे.

तर चला मग पाहुया घरच्या घरीच बटरफ्लाय केक कसा बनवायचा.

बटरफ्लाय केक… रेसिपी – Butterfly Cake Recipe in Marathi

Butterfly Cake Recipe

बटरफ्लाय केक बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Butterfly Cake

  • १२० ग्रॅम मैदा
  • बटर आणि कॅस्टर शुगर
  • २ अंडे २ टेबलस्पुन कोको पावडर
  • १ टिस्पुन बेकिंग पावडर
  • वेनीला इसेंस

टाइसिंग करता – 

  • १०० ग्रॅम बटर
  • १ टेबलस्पुन दुध
  • २०० ग्रॅम आइसिंग शुगर
  • १ टिस्पुन वेनीला इसेंस
  • खाण्याचा रंग

आईसिंग ची विधी

बटर ला चांगले फेटुन घ्या त्यात आईसिंग शुगर टाका आणि इसेंस, कलर, आणि दुध मिसळुन फेंटुन घ्या.

बटरफ्लाय केक बनविण्याचा विधी – Butterfly Cake Recipe

मैदा, कोको पावडर, आणि बेकिंग पावडर ला सोबत चाळुन घ्या बाकी सगळी सामग्री मिसळुन बिटर ने बिट करा जर मिश्रण घट्ट वाटले तर थोडे गरम पाणी टाकुन बिट करा.

बेकिंग टिन मध्ये टाकुन ३० मिनीटांपर्यंत बेक करा. केक ला बटरफ्लाई आकारात दोन तुकडयात कापुन घ्या. याला आईसिंग च्या मिश्रणाने कोट करून घ्या आता उरलेल्या आईसिंगमधे तीन वेगवेगळे कलर टाकुन कोन मधे भरून बटरफ्लाई चे पंख आणि डोळे बनवा.

तयार आहे आपला बटरफ्लाय केक. तर हि होती केक बनवण्याची रेसिपी, कशी वाटली आम्हाला कळवा, तसेच या रेसिपी ला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here