सोप्या केक रेसिपीज

Cake Recipes

केक हा असा पदार्थ जो लहान्यांपासून तर मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडतो, आजकाल कुठलीही Anniversary असो किवां कुणाचाही बर्थडे असो केक हमखास असतोच, परंतु बरेचश्या लोकांना तो घरी बनवता येत नाही त्यासाठी आंम्ही आजच्या या खास लेखात घेऊन आलो आहे, तुंमच्यासाठी वेगवेगळ्या केक रेसिपी.

चला तर मग जाणून घेऊया केक बनवण्याच्या रेसिपी ……

सोप्या केक रेसिपीज – Cake Recipes in Marathi

Cake Recipes in Marathi
Cake Recipes in Marathi

5 केक रेसिपीज ख्रिसमससाठी – 5 Cake Recipes For Christmas

१) विना अंडयाचा केक – Egg-less Cake

तुम्हाला विना अंडयाचा हा केक खुप आवडेल याला बनवण्याचा विधी देखील सोपा आहे आणि या केक ला बनवण्याकरता अंडयाची बिलकुल गरज नाही.

 केक बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Cake

 • १ पाव कणीक
 • ८५ ग्रॅम माजरीन (बनावटी लोणी)
 • १ चिमुट मीठ
 • ४ चमचे बेकिंग पावडर
 • १०० ग्रॅम साखर
 • १ चमचा व्हेनीला इसेन्स
 • अर्धा कप दुध आणि पाणी

विना अंडयाचा केक बनविण्याची विधी – Egg-less Cake Recipe

कणीक, बेकिंग पावडर, मीठ यांना चांगल्याप्रकारे माजरीन मधे मिसळुन घ्या. मिसळयानंतर त्यात साखर आणि व्हेनिला इसेन्स टाकुन हळु हळु दुध पाणी टाकत मिश्रण फेटुन घ्या.

यानंतर ७ इंच टिन ला ग्रीस लावावे आणि एका मॉडरेट ओव्हन मध्ये साधारण १ तासापर्यंत शिजवा.

२) बदाम केक – Almond cake

बदाम ने भरलेला हा केक नक्कीच वेगळी चव तुम्हाला देईल.

बदाम केक बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Almond Cake

 • पेस्ट्री
 • अर्धा कप कणीक
 • अर्धा कप लोणी
 • अर्धा कप साखर
 • थोडे मिठ
 • १ चमचा व्हेनिला सार
 • फिलींग करता
 • पाउण कप साखर
 • अर्धा कप कॉर्न स्टार्च
 • अर्धा चमचा बेकिंग पावडर
 • अर्धा कप लोणी
 • 3 अंडे
 • १ कप बदाम कापलेले
 • चिमुटभर मीठ

बदाम केक बनविण्याची विधी – Almond Cake Recipe

पेस्ट्री करता:

एका भांडयात पेस्ट्री करता लागणारी सर्व सामग्री मिसळुन मऊ  कणीक भिजवा आता या कणकेला ३० मिनीटे फ्रिज मध्ये ठेवा. या मिश्रणाला बाहेर काढुन ११ ते १२ इंचाचे गोळे बनवावे आता या ११ ते १२ इंचाच्या गोळयांची एक लाईन बनवा. मग याच्या बेस ला छिद्र करा आणि १५ ते २० मिनीटे वाट बघा. पहिलेच ओव्हनला ३७५ डिग्रीवर गरम करून ठेवा.

स्टफिंग करता :

एका भांडयात लोणी गरम करा आणि त्यात कापलेले बदाम टाकुन मंद आचेवर हलका भुरा रंग येईपर्यंत गरम करा.

यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रणाला थंड होवु दया आता दुसऱ्या भांडयात उरलेल्या लोण्याला घ्या आणि त्यात बदाम आणि साखर टाकुन अंडे ही टाका टाकतांना मिश्रण चांगले हलवुन मिक्स करत राहा लक्षात ठेवा मिश्रण मुलायम व्हायला हवे.

आता नवीन भांडयात कॉर्न स्टार्च घेऊन त्यात बेकिंग पावडर आणि मीठ टाकुन त्यात बदामाचे मिश्रणही टाका आता या सर्व मिश्रणाला आधी बनवुन ठेवलेल्या बेस मधे मिक्स करावे आणि ओव्हन मध्ये १० ते १२ मिनीटांपर्यंत शिजु दया. शिजल्यानंतर लगेच कापलेले बदामाचे तुकडे यावर पसरवा आणि ओव्हनमध्ये २० मिनीटांपर्यत गरम होऊ दया तोपर्यंत पेस्ट्रीला भुरा रंग यायला हवा.

३) चॉकलेट एंजेल केक – Chocolate Angel Cake

चॉकलेट एंजेल बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Chocolate Angel Cake

 • अर्धा कप कोको पावडर
 • अर्धा कप गरम पाणी
 • अर्धा कप दाणेदार साखर
 • पाव कप मैदा
 • अर्धा चमचा मीठ
 • १२ अंडे
 • १ चमचा टार्टर क्रीम

चॉकलेट ऐंजेल केक बनविण्याची विधी – Chocolate Angel Cake Recipe

एका भांडयात कोको पावडर आणि गरम पाणी चांगल्या प्रकारे मिक्स करून बाजुला ठेवावे आता ओव्हन ला ३५० डिग्रीवर गरम करून ठेवा, आता एका भांडयात कणीक, अर्धा कप साखर आणि मिठ मसळुन यालाही बाजुला ठेवा फेसाळ होईपर्यत अंडे फेटावे आणि त्यानंतर त्यात टार्टर क्रीम मिसळावे आता या मिश्रणाला तोपर्यंत चांगले मिक्स करा जोपर्यंत ते त्याच्या अंतीम स्वरूपाला पोहोचत नाही आता अंडयाच्या मिश्रणात उरलेली साखर देखील मिक्स करून घ्या, आता हळुहळु अर्धी कणीक त्यात टाका जेव्हा कणीक चांगली एकजीव होईल तेव्हा उरलेली कणीक ही त्यात टाकुन हलवुन घ्या.

आता थोडे मिश्रण कोको पावडर मध्ये ही मिसळुन दया आणि मिसळयानंतर पावडर ला चांगले हलवत राहा. जेव्हा मिसळणे पुर्ण होईल तेव्हां एक अंडे आणि कोको पावडर च्या मिश्रणाला उरलेल्या अंडयासोबत आणि कणकेच्या मिश्रणात एकजिव करून घ्या आता ग्रीस न केलेल्या भांडयात याला पसरवा ५० मिनीटांपर्यंत शिजवा जेव्हां पुर्ण शिजेल तेव्हा याला पुर्ण थंड होऊ दया.

आता चाकुच्या सहाय्याने याला प्लेट मध्ये ठेवा आणि शेवटी व्हेनीला आईस्क्रीम आणि फ्रेश बेर्री सोबत सर्व  करा.

४) नारळाचा केक – Coconut cake

नारळाचा केक बनवणं अगदी सोप आहे याची चवही खपु गोड आणि चांगली लागते.

नारळाचा केक बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Coconut Cake

 • १७० ग्रॅम कणीक
 • ८५ ग्रॅम लोणी
 • १०० ग्रॅम साखर
 • थोडे दुध
 • २ छोटे अंडे
 • ८५ ग्रॅम कोरडे नारळ
 • १ छोटा चमचा बेकिंग पावडर

नारळाचा केक बनविण्याची विधी – Chocolate Coconut  Cake Recipe

लोणी आणि साखर चांगल्या त-हेने मिक्स करून क्रीम बनवा आणि मग त्यात अंडे टाका त्यानंतर कणीक बेकिंग पावडर, नारळ आणि शेवटी थोडे दुध टाकुन मिक्स करा आता या मिश्रणाला केक टिन मध्ये टाका आणि ओव्हनमध्ये अर्धा तास होउ दया.

५) स्ट्रॉबेरी केक – Strawberry cake

आता स्वादिष्ट स्ट्रॉबेरी केक बनविण्याची विधी माहीत करून घेऊया.

स्ट्रॉबेरी केक बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Strawberry cake

 • १ कप पांढरी साखर
 • २ अंडे
 • दिड चमचा बेकिंग पावडर
 • १ कप आईसिंग साखर
 • अर्धा कप दुध
 • अर्धा कप घट्ट झालेली स्ट्रॉबेरी
 • १ व्हेनिला पुडिंग कप
 • अर्धा कप कणीक
 • अर्धा कप लोणी
 • २ चमचे व्हेनीला चा सार

स्ट्रॉबेरी केक बनविण्याची विधी – Strawberry cake  Cake Recipe

या कृती ची सुरूवात साखर पावडर कपात घट्ट स्ट्रॉबेरी ला पातळ करून घेण्याने होते. आता एका भांडयात साखर आणि लोणी क्रीमी होईपर्यंत फेटुन घ्या आता याच्या नंतर यात अंडे पण मिसळुन घ्या आणि नंतर त्यात व्हेनिला पुडिंग पण टाका. टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्या जर लोणी जास्त घट्ट असेल तर त्यात दुध टाका, ओव्हनला आधीच ३५० डिग्रीवर गरम करा आता एक ९ बाय ९ च्या भांडयात मिश्रण घ्या आणि जवळजवळ ३० ते ४० मिनीटं शिजु दया. तुमचा स्ट्रॉबेरी केक तयार आहे.

तर आपण आज पाहिले काही वेगवेगळे केक बनविण्याच्या विधी तर आजचा लेख कसा वाटला आम्हाला कळवा, तसेच या लेखाला आपल्या मित्रांना सुद्धा शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here