वैज्ञानिकांच्या हिशोबानी चंद्र ग्रहण हि फक्त एक भौगोलिक घटना आहे, परंतु ज्योतिष शास्त्रात चंद्र ग्रहणाला अशुभ मानल जात हे तुम्हाला माहिती असेल कदाचित. पण तुम्हाला हे माहितीये का कि चंद्र ग्रहणाला अशुभ का मानल जात? ग्रहण लागल्यावर अगदी घराबाहेर निघणं सुद्धा अशुभ मानल जात, पण तुम्हाला माहितीये का चंद्र ग्रहण म्हणजे नक्की काय? चला तर जाणून घेऊया.
चंद्र ग्रहण का लागत? ग्रहणात मुळीच करू नका हे काम…
चंद्र ग्रहण म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. चंद्र जणू काही पृथ्वीच्या सावली मध्ये येतो, आणि लपल्यासारखा होतो, आणि तसेच दुसरीकडे सूर्याची किरणे पृथ्वीच्या वायुमंडळाला टकरावून चंद्रावरती पडते, ज्यामुळे चंद्र चमकतो.
ग्रहणाचा मनुष्यावर काय परिणाम होतो?
जेव्हा चंद्र कमजोर अवस्थे मध्ये असतो, त्याचा परिणाम मनुष्याच्या जीवावर सुद्धा होऊ शकतो, मानसिक व शारीरिक रित्ये. ह्यामध्ये डोळ्यांच्या समस्या, पचनक्रियेशी संबंधित समस्या, व इतर अनेक समस्या येऊ शकतात.
चंद्र ग्रहणात हे काम मुळीच करू नका
चंद्र ग्रहण असताना कुठले हि शुभ काम करण्यास मनाई केली जाते. तस तर चंद्र ग्रहणात पुष्कळ अशे काम आहेत जे नाही केले पाहिजे, पण त्यात काही काम तुम्हाला सांगतो, जसे –
- चंद्रग्रहणामध्ये भोजन करू नये.
- पूजा पाठ करू नये.
- गर्भवती महिलांना तर घराच्या बाहेर न निघण्याचे सांगितले जाते.
- कुठले हि शिवण काम हे चंद्र ग्रहणामध्ये करू नये.