चिकन एंड एग स्प्रिंग रोल बनवण्याची रेसिपी

Chicken And Egg Spring Roll

भारतीय पदार्थामध्ये खुप वेगळेपणा आढळतो, तो आपापल्या राज्यानुसार सुध्दा आलेला आहे आणि भारतीय हे पदार्थ खुप आवडतात देखील त्या पदार्थांची चव, त्याचे स्वरूप, बनवण्याची पध्दत, त्यात पडणारे जिन्नस या सगळयात वेगळेपणा असतो. इतकेच काय तर विदेशातील पदार्थांनी देखील भारतीयांना भुरळ पाडली आहे यात चायनीज पदार्थांनी तर आपल्याला अक्षरशः दिवाना बना दिया है.

आपल्याकडे चायनिज खुप आवडीने खाल्ल्या जाते आणि पसंतही केल्या जाते, चिकन अॅंड एग स्प्रिंग रोल तर आजकाल लहानांपासुन तर मोठयांपर्यंत सर्वांनाच आवडतं परंतु बनवणे ब-याच जणांना माहीती नसेल तेव्हां आज आपण पाहुया चिकन एग अॅण्ड स्प्रिंग रोल कसा बनवायचा ते. याची सामग्री आणि बनवण्याचा विधी पुढे दिला आहे.

चिकन एंड एग स्प्रिंग रोल बनवण्याची रेसिपी  – Chicken And Egg Spring Roll Recipe in Marathi

Chicken Egg Rolls Recipe

 

चिकन एंड एग स्प्रिंग रोल बनवण्याकरता सामग्री – Ingredients of Chicken And Egg Spring Roll 

पैनकेक करता:

  • १ कप कॉर्नफ्लोर
  • अर्धा कप मैदा
  • १ फेटलेले अंडे
  • आवश्यकतेनुसार पाणी

स्टफिंगकरता सामग्री:

  • अर्धा कप चिकन चे छोटे छोटे तुकडे
  • चिमुटभर मीठ
  • २ चिमुट काळीमीर्च पावडर
  • १ फेटलेले अंडे
  • आवश्यकतेनुसार तेल

चिकन एंड एग स्प्रिंग रोल बनविण्याचा रेसिपी – Chicken And Egg Spring Roll Recipe 

पॅनकेक करता लागणारी सर्व सामग्री एकत्र करा नॉनस्टिक पॅन मधे थोडेसे तेल लावुन थोडा थोडा घोळ पसरवुन दोन्ही बाजुनी ब्राउन होईपर्यंत शेका आता गॅसवरून खाली उतरवुन घ्या. पॅनकेक ला चिपकु नये म्हणुन थोडे कॉर्नफ्लोवर भुरका.

स्टफिंग बनविण्याची विधी:

नॉनस्टिक पॅन मध्ये ३ ते ४ थेंब तेल टाकुन कापलेले चिकन, मीठ आणि कालीमीर्च टाकुन परता, गॅसवरून काढुन थंड होण्यासाठी ठेवा त्याच पॅन मधे ३ ते ४ टीस्पुन तेल टाकुन अंडयाचे ऑमलेट बनवा आणि कापुन ठेवा. ऑमलेट चे तुकडे आणि परतलेल्या चिकनला मिक्स करून मिश्रण बनवा.

रोल्स करता:

पॅनकेक वर चिकन अंडयाच्या मिश्रणाला एका किना-यावर ठेवा आणि रोल करा. अंडयाचे पांढरे मिश्रण किंवा कॉर्नफ्लोवर पेस्ट ने सील करून मध्यम आचेवर ब्रॉंउन होईपर्यंत डीप फ्राय करा.

तयार आहेत आपले चिकन रोल.

तर कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी आवड्लीच असेल आवडली तर या लेखाला फेसबुक वर आपल्या मित्रांना शेयर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top