Chocolate Balls Recipe in Marathi
साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे पण सध्याच्या काळात आपण इतके हेल्थ कॉन्शस झालो आहोत की बरेचजण साखरेकडे पाहात देखील नाही पण लहान मुलांना कितीही अडवायचे म्हंटले तरी त्यांना गोड फार आवडते त्यातही चॉकलेट, केक अश्या गोष्टी त्यांच्या जीव की प्राण असतात.
आज आपण चव घेऊया चॉकलेट फ्रुट बॉलची. चॉकलेट फ्रुट बॉल लहानांपासुन तर मोठयांपर्यंत सगळयांनाच आवडतात, ब्राउनीला खुप जास्त पसंती असते.
तर चला बघुया चॉकलेट फ्रुट बॉल कसे बनवायचे.
चॉकलेट फ्रुट बॉल बनवायची विधी – Chocolate Balls Recipe in Marathi
चॉकलेट फ्रुट बॉल बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Chocolate Balls
- ४ टेबलस्पुन कापलेले अक्रोड
- २ टेबलस्पुन कापलेले बदाम
- किशमिश २ टेबलस्पुन
- २ टेबलस्पुन बारीक केलेली संत्र्याची साल
- ६० ग्राम बारीक केलेले डार्क चॉकलेट
- १८० ग्राम डार्क चॉकलेट (एक्स्ट्रा)
चॉकलेट फ्रुट बॉल बनविण्याची विधी – Chocolate Balls Recipe
अक्रोड, बदाम, किशमिश, संत्र्याची साल आणि बारीक केलेले डार्क चॉकलेट मिक्स करा. एक एक टिस्पुन या प्रमाणात घेऊन याचे छोटेछोटे बॉल बनवुन घ्या, याला रात्रभर फ्रिज मध्ये ठेवा. एक्स्ट्रा उरलेल्या डार्क चॉकलेट चे तुकडे करून घ्या.
सॉस पॅन मध्ये पाणी गरम करा, पाणी चांगले गरम झाल्यावर त्यात तुप आणि डार्क चॉकलेट चे तुकडे टाकुन मिश्रण तोपर्यंत हलवा जोपर्यंत ते चांगले मिक्स होत नाही. आता या मिश्रणात फ्रिजमधे ठेवलेले फ्रुटबॉल एक एक करून अश्याप्रकारे मिक्स करा की फ्रुटकेक वर डार्क चॉकलेट चे मिश्रण ची परत चांगल्याप्रकारे जमेल. डार्क चॉकलेट लावलेल्या या बॉल ला फाईल कवर केलेल्या ट्रे मध्ये ठेवा. थोडया वेळाने या चॉकलेट बॉल ला बंद डब्यात फ्रिज मध्ये स्टोअर करा. तयार आहेत तुमचे टेस्टी चॉकलेट फ्रुट बॉल.
तर कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी आम्हाला कळवा, तसेच हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!